इस्माईल बेगची दुर्दशा आणि मराठ्यांचा वचक..!
जुलै १७९० मध्ये महादजी शिंदे यांच्या फौजेने मुघल सरदार इस्माईल बेगची अशी कोंडी केली होती की, त्याला आपला सर्व सरंजाम सोडून जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला.
मराठ्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे आणि वाढत्या दबावामुळे इस्माईल बेगची मोठी फौज विस्कळीत झाली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, अखेर तो केवळ चौदा घोडेस्वारांनिशी जयपूरकडे पळून गेला. त्याचे इतर साथीदारही घाबरून सांबरपर्यंत माघारले.
महादजी शिंदे यांच्या फौजेचा उत्तर हिंदुस्थानात निर्माण झालेला दबाव आणि दरारा किती मोठा होता, याची ही घटना स्पष्ट साक्ष देते.
"हल्लीं इकडील वर्तमान तरी, मिर्जा इस्मालवेग चौदा स्वारानिसों पळोन छ ९ तारखेस जेपुरांत दाखल जाला व सोभाराम भंडारी वगैरे राठोर हिरासा होऊन सांबरपावेतों गेले."
संदर्भ : दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें, भाग २ रा., संपादक — दत्तात्रय बळवंत पारसनीस, लेखांक १८, जुलै १७९०.

No comments:
Post a Comment