डीगच्या लढाईत मराठ्यांचा महापराक्रम आणि नवलसिंग जाटाचा धुव्वा!
एप्रिल १७७० मध्ये रामचंद्र गणेश, तुकोजी होळकर आणि महादजी शिंदे यांच्या संयुक्त मराठा फौजेने डीगच्या किल्ल्याजवळ नवलसिंग जाटाचा दारुण पराभव केला.
नवलसिंग तब्बल ५०,००० घोडेस्वार आणि अफाट तोफखाना घेऊन मोठ्या गर्वाने मराठ्यांवर चालून आला होता. पण मराठ्यांच्या आक्रमणापुढे त्याची दाणादाण उडाली. परिस्थिती इतकी भयानक झाली की, सर्व सरंजाम सोडून नवलसिंगाला आपला जीव वाचवण्यासाठी अनवाणी पायांनी तीन कोस पळून जाऊन डीगच्या किल्ल्यात आश्रय घ्यावा लागला.
या ऐतिहासिक लढाईत मराठ्यांनी ७,००० तुर्की आणि ताजी घोडे, बाण आणि रहकले लादलेले ३,००० उंट, ५० मोठ्या तोफा आणि ११ अंबारीचे हत्ती अशी प्रचंड लूट मिळवली. या दणदणीत विजयानंतर मराठा फौजेने मथुरा आणि वृंदावन येथे आपला मुक्काम ठोकला.
"On 9th Zilhijja 1183 (5 April 1770) Rao Ramchandra Ganesh, Tukoji Holkar subahdar and Mahadji Sindhia, uniting together, gave battle to Nawal Singh Jat... and inflicted a great defeat on him, and captured nearly 7,000 Turki and Tazi horses, 3,000 camels laden with rockets and rahkalas, and 50 big guns, 11 elephants..."
संदर्भ:- Persian Records of Maratha History I : Delhi Affairs (1761-1788), Translated by Jadunath Sarkar (Letter A 9 - Sevak Ram to Peshwa Madhav Rao, 18th April 1770).
फोटो-१)महादजी शिंदे
२)तुकोजी होळकर
३)डीग किल्ला
४)नवलसिंग जाट





No comments:
Post a Comment