विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 August 2026

महादजी शिंदे यांच्या नावाने दिल्लीत झालेला करार..!!

 


महादजी शिंदे यांच्या नावाने दिल्लीत झालेला करार..!!

​इंग्रजांना दिल्लीत येण्यापासून थांबवण्यासाठी मराठ्यांनी एक महत्त्वाचे काम केले. त्यांनी दिल्लीचे नवाब नजबखान यांच्यासोबत एक करार करण्याचे ठरवले. हा करार खास महादजी शिंदे यांच्या नावाने लिहून घेण्याचे ठरले.
​मे १७८१ च्या एका पत्रात या कराराबद्दल माहिती दिली आहे. मराठ्यांच्या वकिलांनी नवाबाला स्पष्ट सांगितले होते की, हा करार महादजी शिंदे यांच्या नावानेच द्यावा लागेल.
"ज्याप्रमाणे श्रीमंतांस लिहून दिधलें आहे, त्याप्रमाणेच लिहावें. परंतु, इंग्रेजांचे पारपत्याचें लिहून राजश्री महादजी शिंदे यांचेच नांवें इमानप्रमाण लिहून देणे."
इंग्रजांना हरवण्यासाठी नवाब आणि मराठे एकत्र येतील. पण नवाबाला हा शब्द खास महादजी शिंदे यांच्या नावाने लिहून द्यावा लागला. यावरून दिल्लीत महादजी शिंदे यांच्या नावाला किती मोठे महत्त्व होते, हे आपल्याला समजते.
​संदर्भ : दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग १), संपादक – दत्तात्रय बळवंत पारसनीस, लेखांक ३० (मे १७८१).

No comments:

Post a Comment

ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार

  ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार ग्वाल्हेरचे जहागीरदार आणि सरदारांचा इतिहास खूप मोठा आहे. श्रीमंत महादजी शिंदे यांना ग्वाल्हेर आणि राजस्थ...