विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 28 August 2026

महादजी शिंदे आणि दिल्लीचे राजकारण..!


 महादजी शिंदे आणि दिल्लीचे राजकारण..!

​दिल्लीच्या राजकारणात महादजी शिंदे यांचे खूप मोठे स्थान होते. इंग्रजांना रोखण्यासाठी आणि दिल्लीचा कारभार नीट चालवण्यासाठी त्यांचे तिथे असणे सर्वांना गरजेचे वाटत होते.
​जून १७८२ मध्ये पेशव्यांचे वकील पुरुषोत्तम महादेव हिंगणे यांनी एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी महादजी शिंदे यांच्या दिल्लीत येण्याने काय आणि किती फायदा होईल, हे स्पष्ट केले आहे.
​"या प्रसंगीं राजश्री पाटीलबावांचें येणें बहुतच उपयोगी... या प्रसंगीं येथे येणें जाल्यास विपुल द्रव्य हातीं लागेल, व विना लढाई कार्य व्हावे, हा प्रसंग येथील आहे."
​या पत्रावरून आपल्याला समजते की, प्रत्यक्ष युद्ध न करताच केवळ महादजी शिंदे यांच्या दिल्लीत येण्यानेच मोठी कामे होतील आणि आर्थिक फायदे मिळवता येतील, असा मोठा विश्वास मराठ्यांच्या वकिलांना होता.
​संदर्भ : दिल्ली येथील मराठ्यांचीं राजकारणें (भाग १), संपादक – दत्तात्रय बळवंत पारसनीस, लेखांक ६४ (जून १७८२).

No comments:

Post a Comment

ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार

  ग्वाल्हेर दरबारचे सरदार जहागिरदार ग्वाल्हेरचे जहागीरदार आणि सरदारांचा इतिहास खूप मोठा आहे. श्रीमंत महादजी शिंदे यांना ग्वाल्हेर आणि राजस्थ...