तासगाव_संस्थानाधिपती
#श्रिमंतपरशुरामभाऊपटवर्धन_तासगांवकर
कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज आणि परशूराम भाऊ पटवर्धन यांच सैन्य पट्टणकुडीच्या मैदानावर एकमेकांवर येऊन आदळल भीषण लढाई आणि रक्तपात होऊन पेशवा सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन यांचा वध कोल्हापूर सरदार विश्वासराव गायकवाड यांनी केला आणि लढाईचा अंतिम निर्णय लागला यात कोल्हापूर छत्रपतींचा दमदार विजय झाला
पेशव्यांचे सरदार रामचंद्रराव पटवर्धन आणि पुणे येथील खाजगीवाले लिमये घराण्यातील जानकीबाई यांच्यापोटी १७४० रोजी परशुराम भाऊंचा जन्म झाला होता तासगाव येथील जोग घराण्यातील राधाबाई या त्यांच्या पत्नी होत्या त्यांना चार मुली तर पाच पराक्रमी पुत्र होते
श्रिमंत परशुराम भाऊंना तासगाव व कोरेगाव ही दोन गावे इनाम म्हणून देण्यात आली त्यातील तासगाव येथे भव्य असा वाडा बांधून तासगाव येथे ते स्थायिक झाले तर पुढे जमखंडी या वतन गावात किल्ला व वाडा बांधून काढला
भाऊंनी अनेक लोकोपयोगी कामे केली यात तासगाव शहरात बाजारपेठा बांधल्या, गावोगावी अन्नछत्रे, विहीरी, धरणे बांधली, चिंचणी (तासगाव) येथे परशुरामेश्वराचे मंदिर बांधले, पंढरपूरला सभामंडप उभारला, भिलवडी (तासगाव) येथे कृष्णानदीवर घाट बांधला, पुण तांबे येथे गोदावरी काठी शिवालय व वाडा बांधला
परशुराम भाऊ जसे शूर होते तसे ते स्वामिनीष्ठ ही होते भाऊंची स्वामीनिष्ठा मतलबी नसून प्रेमळ आणि कळकळीची होती भाऊ आले आहेत म्हणून हजामतीच अर्थ डोक तसच घेऊन धावत येणारे नाना फडणवीस सारखा जिवलग साथीदार राजकारणात भाऊंविरूध्द झाला आणि भाऊंचे दिवस फिरले भाऊंना कैद झाली जप्ती आली कर्ज वाढून भाऊ आजारी पडले तशातच उठून पट्टणकुडीच्या मैदानावर उभे राहिले आणि इथेच त्यांचा शेवट झाला 🙏🙏🙏
©Zunjar babar

No comments:
Post a Comment