#शिवराज्याभिषेकसिद्धीसनेणारे_गागाभट्ट
गागाभट्ट हे काशीत राहणारे एक विद्वान ब्राह्मण होते. त्यांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक गागाभट्ट यांनी केला
महाराष्ट्रांत पैठण हें १४ व्या व १५ व्या शतकांत विद्वानांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होतें. भट्ट आणि शेष हीं तेथील दोन घराणी तत्कालीन विद्वानांत विशेष मान्यता पावलीं होती.
भट्ट घराण्यांतील गोविंदभट्ट १६ व्या शतकाच्या आरंभी पैठणहून काशीस जाऊन राहिले. त्यांच्या ५ व्या पिढीत गागाभट्ट जन्माला आले.
गागाभट्टांनी धर्मशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले होते. राजपुतान्यांत अभिषेक समारंभ होत, ते भट्ट घराण्यांतील विद्वानांच्या हातून करण्याचा प्रघात होता. काशींत धर्मसभा भरत; त्यांत अग्रपूजेचा मान भट्ट घराण्यास मिळत असे.
या घराण्याने काशी येथे एक विद्यापीठ चालवलें व शिवाजी महाराजांच्या काळांत या विद्यापीठाचे कुलगूरुपद गागाभट्टांकडे आलें; त्यामुळे एक गुरु - शिष्यपरंपरा उत्पन्न झाली.
महाराष्ट्रांत अनेक शतकांत राज्याभिषेक झाला नव्हता व अल्लाउद्दीन खिल्जीच्या
दक्षिण भारतांतील आक्रमणानंतर असा राज्याभिषेक करण्याची पात्रता असलेलीं विद्वान, धर्म, वेद जाणकार माणसेही उरलीं नव्हतीं. पैठण, पंढरपूर इत्यादि जागीं असलेलीं विद्यापीठें नाहीशी होऊन विद्वान् लोक काशीक्षेत्रीं
जाऊन रहाण्याची प्रथा व परंपरा उत्पन्न झाली होती. देव, धर्माधिकारी, शेष, भट्ट, मौनी हीं घराणी मूळ महाराष्ट्रांतील, पण ती मान्यतेने काशीक्षेत्रीं नांदत असून वेदविद्या महाराष्ट्रांत लुप्त झाल्यासारखे झालें होते.
शिवाजी महाराजांच्या मनाला शेषांचे तत्त्वज्ञान पटणारे नव्हते; एवढेच नव्हे तर असलें पुराणे, एकांगी, अप्रागतिक तत्त्वज्ञान जाहीररीत्या निषिद्ध मानलें पाहिजे, असा त्यांचा ठाम ग्रह होता. श्रीकृष्णाने भगवत् गीतेच्या रूपाने सांगितलेलें चार वर्ण समाजरचना पुन्हा प्रस्थापित करण्याची शिवाजी महाराजांची भावना होती.
भारतांत जर क्षत्रिय नाहीत, तर भारतीय राज्य करू शकत नाहीत; पर्यायाने, भारतांतील लोक स्वतंत्र नांदू शकत नाहीत; त्यांनी क्षत्रियां अभावी परतंत्र, गुलामच राहीलें पाहिजे, हा विचारच शिवाजी महाराजांना नाहीसा करावयाचा होता व शूद्राचारशिरोमणी मधील तत्त्वज्ञानास कायमची मूठमाती द्यावयाची होती.
गागाभट्ट व त्याच्या शिष्य परंपरेने नेमकें हेच कार्य केलें होतें. त्यांनी कृष्णशेषाच्या मतांचे पूर्ण खंडन केलें.
नीलकंठभट्ट कृत व्यवहारमयूख, कमलाकरभट्टकृत निर्णयकमलाकर ऊर्फ निर्णयसिंधू, दिनकरभट्टकृत दिनकरोद्योत इत्यादि अनेक ग्रंथ गागाभट्टांच्या विद्वत्परंपरेंत तयार झाले व त्यांनी कृष्णशेषाच्या मतांचे अत्यंत मार्मिक खंडन केलें.
महाराष्ट्रांत क्षत्रिय वंश नष्ट झाला नसून तो अजून कायम आहे, हेंच सिद्ध करता यावें या विचाराने बाळाजी आवजी चिटणीस, केशवभट्ट पुरोहित, भालिंद्रभट्ट, सोमनाथभट्ट कात्रे यांस उदेपूर येथे व जेथे जेथे अजून क्षत्रियवंश धुगधुगी धरून होता, तेथे तेथे धाडलें. ही ब्राह्मण मंडळी बाळाजीपंत चिटणिसांच्या प्रमुखत्वाखाली उत्तर हिंदूस्थानांत हिंडली.
शिवाजी महाराज हे शिसोदिया वंशाचे आहेत हे सिद्ध करणारी क्षत्रियत्व सिद्ध करणारी राजपूतांपासूनची आपली वंशावळ प्रथम शोधून घेतली. गागाभट्टांनी कायस्थधर्मप्रदीप नावाचा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला आहे. त्यांत त्यांनी शूद्राचारशिरोमणी या ग्रंथांतील मतांचा पुन्हा एकदा समाचार घेतला असून कायस्थ हे क्षत्रिय होत, असा निर्वाळा दिला आहे. शिवाजी महाराजांनी
गागाभट्टांशी राज्याभिषेकाबाबत विचार विनिमय केला व त्यास अभिषेका साठी रायगडावर बोलावलें. गागाभट्टांना शिवाजी महाराजांचा लौकिक व पराक्रम ठाऊक होता. त्यांनी दक्षिणेत येऊन ठिकठिकाणच्या विद्वानांच्या अनुमतीने हा
राज्याभिषेक सिद्धीस नेण्याचे निश्चित केलें.
गागाभट्टांनी लिहिलेले विविध ग्रंथ
कायास्थधर्म दीपिका
निरूढ पशुबंधप्रयोग
भट्टचिंतामणी
मीमांसाकुसुमांजली
राकागम
राज्याभिषेकप्रयोग
समयनय
सुज्ञानदुर्गोदय
लेखनसीमा...
संदर्भ -
Chhatrapati Shivaji
लेखक : Rana, Bhawan Singh (2005).
Emperors Of The Peacock Throne: The Saga of the Great Moghuls
लेखक : Eraly, Abraham (2007-09-17).
रायगडाची जीवनकथा
लेखक : शांताराम विष्णू आवळस्कर
संकलक
आयशा आस्मा
(९६१९९७१४९५)
बा रायगडा तुझ्या चरणातील मी एक धुलीकण...
अलंकारण्याला परी चरण तुझे धुळीचेच आहे मज भूषण...!!!

No comments:
Post a Comment