विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 June 2019

मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान स्त्री .... द्धारकाबाई संताजीराव घोरपडे

मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान स्त्री .... द्धारकाबाई संताजीराव घोरपडे
सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना दोन पत्नी होत्या पहिल्या सोयराबाई दुसर्‍या द्धारकाबाई होय. सोयराबाई यांना राणोजी तर द्धारकाबाई यांना पिराजी हे पुत्र होय तारिख दिलकुशा मध्य भीमसेन सक्सेना लिहिते की, "संताजीच्या निधनानंतर पुढे 5/6वर्ष राणोजीने आपल्या वडिलांप्रमाणे मुघल सैन्याशी निकराची झुंज दिली शिपाईगिरीत तो आपल्या वडिलांच्या पेक्षा दोन पावले पुढे होता, त्यावरुन 1701ते1702हे वर्षे राणोजी घोरपडे यांना गाजवून सोडले होते।।
सन 1702 मध्य कनार्टकतील वाकीनखेड्याच्या लढाईत चंदनगढीला मराठ्यांच्या वेढा घातला असता बेडरविरूध्द राणोजी बंदुकीच्या गोळी लागून वीर झाले राणोजीला पुत्र संतती नाहीत त्याच्या मृत्यूनंतर आई सोयराबाई या आपल्या दिराकडे म्हणजे बहिर्जी उर्फ हिंदुराव घोरपडे कडे गजेंद्र गड येथे राहत होती तिच्या नेमणुकीस मौज गंगावती प्रांत हुक्केरी व आणखी काही गावे लावून दिली होती...... राणोजीच्या पत्नी संतूबाई होत्या राणोजीच्या निधनानंतर तिला कसबा कापशी सुभा आजरे हा गाव व इतर आणखी उत्पन्न नेमून दिले होते. त्या संताजीची द्वितीय पत्नी द्धारकाबाई जवळ राहत होती राणोजीच्या अकाली निधनानंतर सेनापती घोरपडे च्या घराण्यावर संकटातून बाहेर काढले तो संताजीच्या द्वितीय पत्नी द्धारकाबाई यांना.. अशा अवघड प्रसंगी त्यांना साथी दिले तो संताजीची मानसपुत्र नारो महादेव घोरपडे यांना होय.. छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर राजपुत्र शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून महाराणी ताराबाई साहेब यांना राज्यकारभार व सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली वर सेनापती पदी अनुभवी व पराक्रमी धनाजीराव जाधवराव यांना दिले तो योग्य होते सेनापती राणोजीचा सेनापती धाकटा भाऊ पिराजी यास दया हे मागणी केला पण पिराजी हा नेणता (लहान) होता म्हणून शक्य झाले नाही पण महाराणी ताराबाई साहेब यांना इ. स. 1703मध्य पिराजीच्या नावे वडिलोपार्जित सरंजामदार चालु ठेवण्यासाठी 13नोव्हेबंर रोजी नवा जाबता मातोश्री द्धारकाबाई साहेब घोरपडे यांनी करुन दिला .. पण सेनापती पदी दिलो नाही याची रुखरुख द्धारकाबाई यांना लागुन राहिली पण पण या काळात औरंगजेब बादशहा इरेला पेटला आहे व मराठ्यांच्या अंत्यत आणीबाणी च्या कालावधीत सेनापती पदाचा विचार सोडून मानसपुत्र नारो महादेव कडे सैन्य देऊन औरंगजेब विरोधात महाराणी ताराबाई साहेब यांना साथी दिले व सरंजामाचा कारभार आपल्या हातात घेऊन योग्य उत्पन्न मिळत ठेवला कारण सैन्यात पगार हे वेळेवर देऊन औरंगजेब विरोधात जोरदार लढाईत पुढाकार घेतला तसेच बहिर्जी घोरपडे याच्या शी समजूत शीर भूमिका घेतली महाराणी ताराबाई साहेब यांना भेटून छत्रपती घराण्यावर निष्ठा कायम ठेवत असे आशिर्वाद घेतला 1710नंतर छत्रपती च्या 2गादी सातारा व कोल्हापूर स्थापना झालेला महाराणी ताराबाई साहेब यांना पिताजी घोरपडे हे 11/12 वर्षेचा आहेत म्हणून सेनापती पदी बहिर्जी घोरपडे गजेदगड कर याचा पुत्र शिदोजीराव घोरपडे याच्या कडे दिले कापशीकर घराण्यातील सेनापती पदी घोरपडे च्या दुसऱ्या शाखेकडे गेल्यामुळे मोताश्री द्धारकाबाई या नाराजी झालाय।।
पण आपल्या सरंजामचा कारभार करताना स्थानिक लोकांनी मदत करून न्यायनिवाडा दिले. विविध धार्मिक उत्सव साजराकरण्यासाठी आर्थिक मदत केला आपल्या जहागिरी मध्य लोकांच्या अडचणीत धुऊन येणे मातोश्री अशी सरसेनापती संताजीराव घोरपडे याचा पत्नी द्धारकाबाई साहेब यांना लोक ओळखले जाऊ लागल्या इकडे दोन्ही छत्रपती घराण्याकडे पिराजीसाठी सेनापती मिळवा म्हणून प्रयत्न व चिकाटी सोडली नाही पण पिराजी हे आपल्या पराक्रमाने 1715ले सेनापती पदी नियुक्ती झाली पिराजीला प्रांत मिरज चा देशमुख वतन 5फेब्रवारी 1715अशी तारीख दिलेली असून त्यात राजश्री पिराजी घोरपडे सेनापती असा उल्लेख आहे पुढे 1728ला मौजे नागनूर कर्योत नूल येथील छत्रपती ना पाळेगराचा करण्यासाठी गेलावर तेथील देशमुख शी लढाईत पिराजी वीर झाले त्याचा निधनानंतर मुलगा राणोजी (2)यास सेनापती पदी नियुक्ती केली संताजीची द्वितीय पत्नी द्धारकाबाई या त्या काळातील कर्तबगार व दूरदृष्टी असलेले स्त्री होत्या।।
संताजीच्या निधनानंतर त्यांनी 60वर्ष घोरपडे घराण्याच्या प्रतिष्ठा आणि लौकिक टिकवून ठेवले इतकेच नाही तर त्याच्या चिकाटीमुळे सेनापती पदी पुन्हा कापशीकर घोरपडे घराण्याकडे आले ..औरंगजेबाच्या कालखंडातील आणीबाणी च्या प्रसंगात आपल्या कुळाचा मोठेपणा व कर्तत्वावर झळ पोहोच दिली नाही प्रथम आपल्या नेणत्या पिराजीची सेनापती पदीवर नेमणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले त्याचा कारकिर्द यशस्वी केली.. त्याच्या अकाली निधनामुळे खचून गेल्या नाहीत आपल्या नातवाला राणोजी घोरपडे ला सेनापती पदी मिळावे म्हणून पुन्हा एकदा चिकाटी ने प्रयत्न केला त्या वेळी देखील राणोजी नेणता होता त्याचे वय पाच वर्षे पेक्षा जास्त नाहीत प्रथम सातारा कर छत्रपती शाहू महाराज थोरले व नंतर कोल्हापूर कर संभाजीराजे कडे सातत्याने प्रयत्न करून मातोश्री द्धारकाबाई साहेब यांना कोल्हापूर च्या छत्रपती कडुन पाच वर्षे वय असलेल्या नातू राणोजी ला सेनापती पदी मिळवुन दिला यावरून मराठ्यांच्या राजकीय ठेवपेच करण्यात किती यशस्वी झाले आहे त हे लक्षात येईल हे शक्य झाले दोन गोष्ट मुळे एक कायम आपल्या सरंजामात लढवय्ये फौज उभी केली व सरंजामाचा कारभारी स्वत बंदोबस्तात ठेवले होते त्याचे अनेक न्यायनिवाडा ही उपलब्ध आहेत
मराठ्यांच्या इतिहासातील मातोश्री जिजाऊ साहेब, महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई, याच्या खालोखाल याच्या सेनापती संताजीराव घोरपडे याच्या पत्नी द्धारकाबाई साहेब याचा उल्लेख कर्तृत्ववान स्त्रिया असा गौरवपूर्ण उल्लेख केला तर वावगे ठरणार नाही त्या मे महिन्यात 1762 मध्य निधन झाले त्याची साध्वी म्हणून ख्याती होती निधनानंतर त्यांच्या दहभूमीवर त्याच्या पादुका स्थापन करून समाधी बांधण्यात आले त्याचा निधन वैशाख शुद्ध द्धावदशी रोजी झाल्यानंतर सेनापती कापशी येथे दरवर्षी त्याच्या पुण्यतिथीनिमित्त चा उत्सव पाच दिवस मोठ्या समारंभापुर्वक आज पण साजरी केली जाते द्धारकाबाई साहेब यांना जर या अथक प्रयत्नाने साथ दिली असेल तर तो सेनापती संताजीराव याचा मानसपुत्र नारो महादेव याने होय।।
द्धारकाबाई साहेब यांना पण संताजी नंतर नारो महादेव यास आपल्या वडिलांच्या इच्छा नुसार जहागिरी तील भाग दिले पुढे घोरपडे हे आडनाव पण दिले कारण नारो महादेव आडनाव जोशी होते तो ब्राम्हण होते देवगड तालुक्यातील वरघडे गावचे होय सलाम या माऊलीच्या कर्तृत्व व नेतृत्व यास आपले।।।
सरसेनापती संताजीराव घोरपडे याचा पत्नी द्धारकाबाई साहेब याचा बददल सोशल मीडियावर पोस्ट नाही हे पहिले पोस्ट आहे यांचा नोंदी घ्या
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे 9049760888

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...