विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 June 2019

!!लढाई पलिकडे सेनापती संताजी घोरपडे !!

!!लढाई पलिकडे सेनापती संताजी घोरपडे !!
!!सातव्या शतकात हिंदुस्थानात येऊन गेलेला" युआन श्वान " या चिनी प्रवाशाने लिहिता " मराठे हे शरणागतास जीवनदान देणे हा युध्दधर्म मानतात " " संताजी हा युध्दधर्म मानणारा सेनापती होता" दोड्डेरीच्या लढाईत सर्वात मोठा विजयानंतर ( महाराष्ट्रात आले पासुन हे औरंगजेब यांचा सर्वात मोठा पराभव होय) शरण आलेल्या मोगल सरदारांना व सैनिकांनी त्याने अभय दिले : पण किल्ल्याच्या बाहेर पडल्यावर एक बाजूने भाकरी व दुसऱ्या बाजूने पाणी अशी त्यांची अन्नपाणीची व्यवस्था करून कित्येक दिवस उपासमारीने तडफडणाया मोगल सैनिकांना सेनापती संताजी घोरपडे चा औदार्य आयुष्यभर स्मरण राहिले असेल.....!!
!!नारो महादेव जोशी या ब्राम्हण मुलास सेनापती संताजी घोरपडे ने आपल्या पदरी ठेवून त्यास आपला पुत्र मानले, तेव्हा आपल्या धन्याचे उतराई होण्यासाठी नारो महादेव याने जोशी आडनाव टाकुन धन्याचे घोरपडे हे आडनाव स्वीकारले हा नारो महादेव म्हणजे कोल्हापूर जवळच्या इचलकरंजी या संस्थानचा संस्थापक होय. संताजीने एका ब्राम्हण पुत्रास आपला पुत्र मानावे व त्या ब्राम्हण पुत्राने धन्याचे आडनाव आपल्या कुळास जोडावे ही घटना सेनापती संताजी घोरपडे च्या व्यक्तिमत्वाचे आगळे दर्शन घडविले....... !!!
!! सेनापती संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुशीतून तयार झालेला सेनानी होता. आयेवारकुटीच्या लढाईत छत्रपती राजाराम महाराज व धनाजी जाधव या दोघांचाही पराभव केल्यानंतर दुसरे दिवशी संताजी घोरपडे आपले हात बांधून छत्रपती समोर उभा राहतो
याचा अर्थ स्वामींची व स्वराज्यावरील निष्ठा किती याचा उत्तर मिळाले !!
कारण २०/२५ हजार जंगी फौज बाळगणारा हा मराठ्यांचे सेनापती प्रत्यक्ष छत्रपती शी रूसला, भांडला एवढेच नव्हे तर लढलाही पण शत्रूस मिळाला नाही , १६९३ व १६९६ दोन्ही वितुष्ट प्रसंगी तो सेनापती सताजी घोरपडे छत्रपती राजाराम महाराज यांच्या पासून दूर झाला असतानाही मोगलाशी लढत राहिला
!!प्रतिशिवाजी सेनापती नेताजी पालकर शिवाजी महाराजांनीवर रुसून शत्रूला मिळाला पण त्याचा सोबत लष्कर गेले नाही पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात परिस्थिती बदललेली होती संताजी घोरपडे सारखा असामान्य सेनापती आपल्या २०/२५ हजार फौजेनिशी मोगलांना मिळाला असता तर !!
दक्षिणेला मोगल - मराठा युद्धातील लष्करी संतुलनच बिघडले असते व त्यांची फळे स्वराज्याला भोगावी लागली असती
कारण ५००/१०००हजार फौजा जवळ असलेल्या देशमुख, वतनदार, जहागिरीदार हे मोगलांचा सेवा कशाप्रकारे करतात याचा अनेक उदाहरणे देता येतील.....!!
!!संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेला "स्वराज्यनिर्मिनी, स्वराज्यसंरक्षण , व स्वराज्यनिष्ठा ही छत्रपती शिवाजी महाराजांचे शिकवणी संताजी घोरपडे विसरली नव्हतो ...//
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...