विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 23 June 2020

!!! राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठ पुत्र राजे दत्ताजीराव जाधवराव यांच्या वंशजशाखा !!!

!!! राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठ पुत्र राजे दत्ताजीराव जाधवराव यांच्या वंशजशाखा !!!

राजे लखुजीराव जाधवराव यांना एकुण चार पुत्र व एक कन्या होत.. राजे दत्ताजीराव, राजे अचलोजीराव ,राजे बहादुरजी ,राजे राघोजीराव व कन्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब .
यापैकी ज्येष्ठ पुत्र राजे दत्ताजीराव यांचा मृत्यू २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला. राजे दत्ताजीराव यांना दोन पुत्र ∆ राजे यशवंतराव ∆ राजे ठाकुरजी.
१) राजे यशवंतराव जाधवराव :- यांचा राजे लखुजीराव जाधवराव यांच्या हयातीत "युवराज" तसेच "The successor of family" असे उल्लेख आढळतात. राजे यशवंतराव हे आजोबा राजे लखुजीराव यांच्या प्रत्येक मोहिमेत सहभागी असल्याचे अस्सल साधनातील नोंदी उपलब्ध आहेत. यांचा मृत्यु २५ जुलै १६२९ रोजी आजोबा राजे लखुजीराव जाधवराव व चुलते राजे अचलोजीराव , राजे राघोजीराव यांच्या समवेत देवगिरीकर झाला.
**वंशजशाखा :- सिंदखेडराजा परीसरात राजे यशवंतराव जाधवराव यांच्या #मुख्य वंशजशाखा जवळखेड व उमरद देशमुख (रुसुमचे) असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त यांच्या मुख्य वंशजशाखा भुईंज, करवंड,करणखेड, वडाळी व सारवडी येथे आजही आहेत.

राजे लखुजीराव जाधवराव यांचे नातु युवराज राजे यशवंतराव ( ज्येष्ठ पुत्र राजे दत्ताजीराव यांचे पुत्र) यांचा युवराज उल्लेख असताना यांच्या मुख्यशाखा असताना काहीजण मराठी वाहिनीवर इतिहासाचे कुठलेही ज्ञान नसताना या थोरल्या वंशजशाखाना उप-शाखा म्हणण्याचा चुकिचा प्रकार केला...यापुढे ऐतिहासिक ज्ञान नसताना असले प्रकार करणे बंद करावे.अन्यथा आम्हालाही (राजे दत्ताजीराव जाधवराव यांच्या समस्त वंशजांना ) ऐतेहासीक कागदपत्रांची फुटपट्टी हातात घेऊन इतिहासाची मोजमापे करावे लागतील.

साभार राजे नरेश जाधवराव

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...