दाभाडे म्हणजे महादेवाचे उपासक होय हिंदवी स्वराज्यासाठी मोलाचे योगदान देणारे दाभाडे घराणे धार्मिक कार्यत देखील पुढे दिसून येते याचे मुख्य कारण म्हणजे तळेगाव दाभाडे येथील महादेवाचे अनेक
ऐतिहासिक मंदिरे होय श्रावण महिन्याला मराठी कालगणनेत विशेष महत्त्व आहे हा महिना चातू मासातील श्रेष्ठ महिना मानला जातो या महिन्यात प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत ब्राह्मणांना व गोर गरिबांना अन्नदान तसेच दक्षिणा देण्याची तसेच विद्वानना संत महाराजांचे
देव-देवतांची जप पाठ करण्याची आश्रमातील ऋषींचे आदरातिथ्य करण्याची प्रथा प्राचीन काळापासून अस्तित्वात होती या प्रथेला श्रावण मास पूजन विधी म्हणून ओळखले जाई तर एखाद्या धार्मिक स्थळी किंवा नदीच्या काठी कोटीच्या संकेत लहान-लहान शिवलिंग बनवून त्याचे विधीपूर्वक विसर्जन करण्याची प्रथा कोटी लिंगार्चन विधी म्हणून ओळखली जाई ही प्रथा
सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी सुरू केली मराठा कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजही श्रावण महिन्यात विद्वानांना तसेच गोरगरिबांना अशा प्रकारच्या दक्षिणा वाटत असे तळेगाव मधील राजघराण्यांच्या समाध्याच्या बाजूला शिव मंदिरे दिसतात त्यात बनेश्वरचे
मंदिर हे होय हे मंदिर इंद्रायणी नदीच्या काठी असून त्याच्या जवळच सेनापती खंडेराव दाभाडे यांची समाधी आहे त्याचप्रमाणे बनेश्वरच्या मंदिरासमोर घुमटाची विहीर आहे व समोरच सतीची समाधी आहे तेथे देखील प्राचीन पडकं शिवमंदिर होय परकीय आक्रमणाची साक्षी बनून
राहिलेल्या या मंदिराला आज खऱ्या अर्थाने जीर्णोद्धाराची गरज आहे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे सख्खे चुलत बंधू सुभेदार कृष्णाजी दाभाडे हे चऱ्होली वतनावर होते कृष्णाजी हे देखील शिवभक्त होते चऱ्होली येथील ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिराच्या दर्शनी भागावर दगडामधे कोरलेल्या शिलालेखात हे मंदिर
इ स 1726 मध्ये चऱ्होली या गावचे श्रीमंत सरदार कृष्णाजी दाभाडे यांनी बांधले असा उल्लेख दिसतो त्याच प्रमाणे इंद्रायणी नदी काठी असलेले खोलेश्वर मंदिरचा जीर्णोद्धार कृष्णाजी दाभाडे यांनी केला आहे कृष्णाजी दाभाडे यांचे मुद्रा देखील शिवाच्या नावाने आहे
सरसेनापती त्रिंबकराव दाभाडे दुसरे यांचा मृत्यू वेरूळ येथील घोणेईश्वराच्या जवळच झाला त्यांच्या शेवटच्या काळात त्यानी देखील घोणेईश्वराची भक्ती केली वरील सर्व दाभाडे घराण्याचा महादेवाच्या प्रती असलेल्या भक्ती पाहून दाभाडे हे घराणे शिवाचे उपासक होते हे यातून स्पष्ट दिसून येते
पोस्ट माहिती सांभार-
श्री सागर मारुती दाभाडे
चऱ्होली बु ⛳
श्री सागर मारुती दाभाडे
चऱ्होली बु ⛳
No comments:
Post a Comment