विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 25 July 2020

शाहू छत्रपती महाराज व शंभुछत्रपती यांचे दरम्यान वारणेचा तह

शाहू छत्रपती महाराज व शंभुछत्रपती यांचे दरम्यान वारणेचा तह
१७३१ साली शाहू छत्रपती महाराज व शंभुछत्रपती यांचे दरम्यान वारणेचा तह होऊन दोन्ही राज्यांच्या सिमा निश्चित झाल्या व आश्यारितीने दोन्ही राजबंधू मधील सत्ता स्पर्धा पूर्णतः संपुष्टात आली .
सातारचे शाहू छत्रपती व संभाजी राजे यांच्या दरम्यान १७३१ साली तहनामा झाला त्यातील काही कलमे
तहनामा चिरजींव राजश्री संभाजी राजे यांसि प्रति राजश्री शाहूराजे यांनी लिहून दिल्या
कलम १- इलाखा वारुण महाले तहत संगम दक्षिणतीर कुल दुतर्फा मुलुख दरोबस्त देखील ठाणी व किल्ले तुम्हांस दिले असत.
कलम २-तुंगभद्रेपासुन तहत रामेश्वर देखील संस्थाने निम्मे आम्हांकडे ठेऊन निम्मे तुम्हांकडे करार करुन दिले आहे.
कलम ३-किल्ले कोपाळ तुम्हांकडे दिला त्या बदल्यात तुम्ही रत्नागिरी आमच्याकडे दिला.
कलम ४- वडगावचे ठाणे (किल्ला) पाडून टाकावे.
कलम ५-तुम्हांसी जे वैर करतील त्यांचे परिपत्य आम्ही करावे आम्हांशी वैर करतील त्यांचे परिपत्य तुम्ही करावे
तुम्ही आम्ही एक बिचारे राज्यवृध्दी करावी
कलम ६-वारणेचा व कृष्णेच्या संगमापासुन दक्षिणत्तोर तहत निवृत्तिसंगम तुंगभद्रे पावतो दरोबस्त देखील गड ठाणी तुम्हांकडे दिली असत.
कलम ७- कोकणात साळशी पलीकडे तहत पंचमहाल अकोले दरोबस्त तुम्हांकडे दिले असत.
कलम ८-इकडील चाकर तुम्ही ठेऊ नये तुम्हांकडील चाकर आम्ही ठेऊ नये.
कलम ९- मिरजप्रांत - विजापूरची ठाणी देखील अथणी#,तासगाव. वगैरे तुम्ही आमचे स्वा्धीन करावी .
एकूण नऊ कलमे करार करून तहनामा लिहून दिल्हा असे सदर प्रमाणे आम्ही चालू यांस अंतरात होणार नाही
वारणेच्या तहा संर्दभात काही दिवसापूर्वी जागर इतिहासाच्या पृष्ठावर करवीर रियासत यांनी महान छत्रपती बंधूच्या आर्दश बंधू प्रेमाचा उल्लेख केला होता
तहातील कलमे आणि बाकीच्या घडामोडी वरुन ही बाब लक्षात येते.
महाराष्ट्र इतिहास मंजरी
निवडक ऎतहासिक उतारे
इचलकरंजी संस्थानचा इतिहास
#शाहूपर्व #

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...