विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 25 July 2020

#शाहुपर्व #शंभुशाहुजन्मउत्सव




#शाहुपर्व
#शंभुशाहुजन्मउत्सव
postsaambhar :संतोष गव्हाणे पाटील
(कोल्हापुरचे राजश्री शाहु महाराज आणि पाचवे छत्रपती थोरले शाहुजी महाराज वेगवेगळे व्यक्तीमहत्व आहेत कृपया समजुन घ्यावे )

मराठा सम्राज्य विस्तारक ,अजातशात्रु ,हिंदनृपती छत्रपती शाहुजी महाराजांचा जन्म गंगावली(मानगाव) येथे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी यशुबाई साहेब यांच्या पोटी १८ मे १६८२ रोजी झाला .तेच मराठा सम्राज्याचे पाचवे छत्रपती होते .
छत्रपती शाहुजी महाराजांनी ४२ वर्ष अखंड भारतवर्षावर आधिपत्य गाजवले.शाहुपर्वामधे मराठा घोडे अटक ते कटक पर्यंतचे पाणी प्यायले आणि शत्रुला धुळ चारली.शाहुछत्रपतींनी आष्टप्रधान मंडळाची निवड केली , सरंजम देऊण सर्व सरदारांना मोहीमा दिल्या आणि मराठा सम्राज्याची घडी बसवली .शाहुपर्वात कुठल्याही सरदारांनी बंड किवा वेगळा विचार केलेला दिसत नाही ,चौहु दिशांना प्रधान सरसेनापती सभेदार आणि सेनापती मातंबर सरदारांनी शाहुछत्रपतीच्या नियंत्रनाखाली दिलेल्या मोहीम फत्ते केल्या ,महारासम्राज्याचा अखंड भारतभर विस्तार केला .त्या महान राजाविषयी #शंभुशाहुजन्मउत्सव आंतरगत काही माहीती घेऊयात .
अखंड हिदुस्थानचे राजराजेश्वर,हिंदनृपती ,आजतशत्रु ,मराठा सम्राज्या विस्तारक शाहुछत्रपतींनी ४२ वर्ष अखंड भारतावर राजधानी आजिंक्यतारा येथुन राज्य केले .काही लोकांना शंका येते की शाहुछत्रपती दिल्लीच्या गादीवर का नाही बसले ? मराठा स्वराज्यामधे जेथे छत्रपती बसत तीच स्वराज्याची राजधानी आसतं हे लक्षात घेतले पाहीजे.शाहुपर्वात अखंड भारताची राजधानी सातारा हीच होती ,तिला वैभवशाली करण्यासाठी शाहु महाराजांनी प्रयत्न केले ,साताऱ्यामधे सावकार आणि व्यापारी वर्गाला बसवुन राजधानीची भरभराट केली .
एवढी दुरदृष्टी ,मुसद्दीगीरी आणि राजकारन शाहुछत्रपती कशे शिकले ? याचा विचार केल्यावर मात्र महारानी यशुबाई सरकार यांच्याकडे लक्ष जाते .राजमाता जिजाबाई आऊसाहेबांनी शिवशंभु घडवले,बिकट प्रसंगामधे जिजाऊ शिवशंभुछत्रपतीसाठी सतत प्रेरनादाई आणि शक्तीदात्या राहील्या,तसेच छत्रपती संभाजी महाराजांची सखी महाराणी यशुबाई सरकार मराठा सम्राज्या विस्तारक पुत्रास प्रेरनादाई आणि शक्तीदात्या ठरल्या.मुगलकडे राजकीय बंधीवासात महाराणी यशुबाई सरकारांच्या हाताखाली शाहु महाराज घडले आणि परिस्थीतीनीही त्यांना खुप काही शिकवले .औरंगजेबांनी शाहु महाराजांना मुसलमान करण्याचा प्रयत्न केला ,परंतु शाहु महाराजांनी त्याला तीव्र विरोध्द केला ती शक्ती महाराणी यशुबाईमुळेच शाहुजींनी मिळाली.त्याबद्दल्यात गुजर बंधु पुढे आले आणि औरंगजेबानी मुसलमान केले .शाहुछत्रपतींनी मुगल राजकारन जवळुन पाहीले.
मराठा स्वराज्य रक्षक दुसरे छत्रपती रणधुरंधर शंभुछत्रपतींच्या दुर्दैवी हत्येनंतर औरंगजेबांनी संपूर्ण स्वराज्य जिंकण्याचा प्रयत्न सुरु केला .मुगली सेना रागडाला वेढा देऊण बसलेले होते.संपूर्ण छत्रपती परिवार वेढ्यामधे आडकला होता .छत्रपती संभाजी महाराजांनंतर सर्व सुत्र महाराणी यशुबाई साहेबांच्या स्वत:कडे घेतले,त्यावेळेला शाहु महाराजांचे वय जेमतेम ७ वर्ष होते .महाराणींनी दुरदृष्टी दाखवुन आणि स्वराज्य वाचवीण्यासाठी २५ मार्च १६८९ ला राजाराम महाराजांना रायगडवरुन सुटका करुण जिंजीला जायचे आणि रायगड लढत ठेवायचा अशे नियोजन केले.त्यानुसार राजारामांनी रायगड सोडला आणि प्रतापगड गाठला.रायगड पडला आणि किल्ला मुघलांच्या ताब्यात आला .बाल शाहु महाराज, महाराणी यशुबाई साहेब ईतर १५० ते २०० लोक मुघलांच्या हाती सापडले,त्यांना बंदी बनवण्यात आले.मराठा स्वराज्य छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली जिंजींतुन मुघलांशी लढा देत राहीले.मराठा सरदारांनी मुगल प्रदेशावर हल्ले सुरु झाले.
शाहु महाराजांचे नाव "शिवाजी" होते .राजकीय बंदीवासात त्यांना शाहु नाव पडले.बंदीवासात औरंगजेबाची कन्या झीनत उन्नीसांने शाहु महाराज आणि त्यांच्या परीवाराची चांगली काळजी घेतली .बंदीवासात शाहु महाराजांच्या बरोबर महाराणी यशुबाई सावली सारख्या सोबत होत्या .शाहु महाराजांचा पहीला विवाह कैदेत आसतानाच मानसिंहराव रुस्तुमराव जाधवराव यांची कन्या आंबिकाबाई उर्फ राजसबाई यांच्याशी दिल्लीमधेच झाला .त्यांचा मृत्यु तेथेच झाला .१७०३ मधे औरंगजेबानी शाहु महाराजांचा दुसरा विवाह काण्हेरच्या शिंदे घराण्यातील मुलीशी लावुन दिला .१७०७ मधे औरंगजेबाचा मृत्यु झाला त्यांनंतर मुघल बादशाहा झालेला आजमने मराठ्यामधे आंतरगत कलह माजावा म्हणुन झीन्नत उन्नीसाबेगम आणि झुल्पिकार खानाच्या सल्ल्यानुसार शाहु महाराजांची सुटका केली .
शाहु महाराज महाराष्ट्रात आल्यावर प्रथम दर्शणी मुघलांची खेळी यशस्वी होतीनी दिसते.परंतु ज्येष्ठ पुत्र आसल्यामुळे स्वराज्याचे खरे वारसदार म्हणुन बहुसंख्यक मातंबर सरदारांनी शाहु महाराजांचा पक्ष धरला.आईन लढाईपुर्वी महाराणी ताराबाई साहेब पक्षातील मातंबर सरदार आणि लखुजी जाधवराव कुळातील धनाजी जधवराव हे शाहुपक्षात आले त्यामुळे ताराबाई पक्षाचा पाडाव झाला .स्वराज्याच्या दोन गाद्या निर्माण झाल्या.पुढे वारणे तह करुण वारना नदीपलीकडील सर्व किल्ले व प्रदेश कोल्हापुर गादीला देण्यात आला .कोल्हापुर गादीचे छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहु महाराजी यांची भव्य स्नेह भेट होऊण दोन्ही परिवारामधे सौख्य झाले.
१२ जानेवारी १७०८ मधे शाहु महाराजांनी आजिक्यातारा किल्यावर राज्याभिषेक करवुन घेतला आणि ते मराठा सम्राजाचे पाचवे छत्रपती "क्षत्रियकुलवंतस शाहुछत्रपती" झाले.त्यांची राजमुद्रा -
IIश्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः। सा मूर्तिरिव वामनी ।। शंभूसुतोरिव । मुद्रा शिवराजस्य राजते ।।
छत्रपती झाल्यावर शाहुछत्रपतीनी मराठा सम्राज्याची घडी बसवुन आष्टप्रधान मंडळाची नियुक्ति केली .सर्व मातंबर सरदारांना चौहु दिशांना विस्ताराच्या मोहीमा दिल्या.
शाहुछत्रपती पदरी आसलेल्या मतंबर सरदारांना मोहीमेवर धडत ,स्वत: ते सहसा मोहीमावर जात नसत.सर्व मोहीमांचा वृतांत मिळाच पाहीजे हा त्यांचा कटाक्ष आसत. बहुतेक एकमोडी इतिहासकारांनी शाहूछत्रपतींची कामगिरी झाकळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हाताखालचे प्रधानमंत्री, सेनापती आणि सरदार कितीही शूर असले तरी त्यांना योग्य कामगिरी देऊन त्यांच्याकडून राज्यहित साधून घेण्याचे कौशल्य राजामध्ये आसने गरजेचे आसते, ते शाहूछत्रपतींमधे असल्यामुळेच नागपुरकर भोसले, जाधव, शिंदे, होळकर, आंग्रे, दाभाडे, पवार, घोरपडे (यादी खुप मोठी आहे )सरदारांनी शाहुपर्वात मराठा सम्राजाचा व संस्कृती यांचा विस्तार अखंड भारतभर केला .
श्रीमंत प्रधान बाजीराव बल्लाळवर शाहुछत्रपतींचे विषेश प्रेम होते .मस्तानी-बाजीराव विवाह प्रकरनाला पेशवे परिवारच बाजीरावाच्या विरुध्द गेला .बाजीरावाला मानशीक त्रास होऊ लागला.त्यावर शाहुछत्रपतींनी चिमाजी आप्पास पत्र पाठवुन ताकीद दिलेली दिसते.त्यावरुन त्यांचे बाजीराववरील माया स्पष्ट होते,ते लिहितात ' रायास कोणे एकी बिलकुल खट्टे न करणे....रायाच्या मर्जी विरुद्ध होईल ऐसे वर्तन न ठेवणे.....'
त्रिंबकराव दाभाडे दाभाडेच्या खुन प्रकरणात श्रीमंत प्रधान बाजीराव बल्लाळ आणि चिमाजी आप्पांना त्रिंबकरावांची विधवा आई उमाबाईच्या पायी लोटांगण घालुन माफी मागण्यास लावली .तर कटकारस्थान केल्यामुळे नानासाहेबाचे पेशवेपद काढुण घेतले .नंतर पिळाजीराव जाधवरावांच्या मध्यस्तीनंतर पेशवे पद दिले.यावरुन मृत्युपर्यंत शाहुछत्रपती किती प्रभावशाली होते हे स्पष्ट होते .शाहुकाळामधे सरजांमशाही व्यवस्था आसल्यामुळे त्यांनी प्रधान ,सरसेनापती ,सुभेदार आणि सेनापती सरदारांना थोडे स्वतंत्र जरी दिलेले आसले तरी सर्वांवर शाहुछत्रपतींचे नियंत्रण होते .
शाहूछत्रपतींची रहाणी साधी होती.ते अत्यंत दयाळु आणि कुटूबवत्सल होते .त्यांनी रयतेच्या हितासाठी खुप कामे केली .जातीवंत घोडा ,हात्ती आणि कुत्रे ठेवण्याची त्यांना फार हावस आसत.शाहुछत्रपतींनी फुल आणि फळबागाही फुलवल्या आहेत .पावसाळा सुरु होण्या आधी लागवडीसाठी जातीवंत आंब्याच्या कोया शिवापुरमधुन मागवलेल्याही नोंदी आहेत .
शाहुछत्रपतींनी युवराज फतेसिंह भोसले यांना किल्लेश्वर राजधानी रायगड परत जिंकण्याची मोहीम दिली बरोबर प्रधान बाजीराव आणि चिमाजी आप्पा ,पिळाजी जाधवराव आणि ईतर मातंबर सरदार होते आणि ती त्यांनी फत्ते केली .रायगड मराठा सम्राज्यामधे परत आला . स्वराज्य संकल्पक महाबाहु शाहाजी महाराजसाहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचा जिर्नोधार केला आणि दिवाबत्ती-झाडलोटची व्यवस्था लावुन दिली व ती कामे करणाऱ्या व्यक्तींना ईनामे दिली .
टिप-पुढील भागात शाहुछत्रपतींची राजनीती आणि प्रशासन व्यवस्था संमजुन घेऊ , बरोबरच महत्वपुर्ण घटनांबद्दल माहीती घेऊ .मराठा मुगल सनद ,वारनेचा तह ,शाहुछत्रपतींची पराक्रमी रत्न याबद्दलही माहीती घेऊ .
मिनीनाथ रावराहेब गेरंगे पाटील
#शंभुशाहुजन्मोत्सव

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...