*सामुदायिक विवाह सोहळा ही संकल्पना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचीच*
-------------------------------------
14 जानेवारी 1761 रोजी पानिपतचे भिषण युध्द झाले या युध्दात कामी आलेल्या मराठा फौजेतील सरदार व सैनिकांचे अंत्यसंस्कार पानिपतच्या जनतेने केले नाही अक्षरशाः धड शिर हात पाय अशा मानवी देहाच्या भागाचा चिखल झाला होता रक्ताचे पाट वाहत होते परिणाम स्वरुप तिथं उगलेल्या झाडांची फळ फुलं देखील मातीत मुरलेल्या रक्तामुळे काळी झाली ज्या ठिकाणी हे युध्द झाले तेथील एका आब्यांच्या झाडालाआंबे देखील काळे झाल्याने त्या परिसराला कालाआम नाव पडले असुन
सडलेल्या सर्व मृतदेहावर ज्या त्या धर्माच्या चालीरितीप्रमाणे उत्तर क्रिया अहिल्यादेवी होळकरांनी करुन घेतली पानिपत शहरातील चांदणी बागेत मराठा सरदारांना अग्नीडाग दिला रितीरिवाजाप्रमाणे ओळख पटलेल्या सर्वांच्या परिवारांना सांत्वन पत्र पाठवले व होळकरांच्या फौजेतील शहीद सरदार सैनिकांच्या मुली व मुलांचा सामुदायिक विवाह सोहळा महेश्वर येथे घेवुन सामाजिक उत्तरदायित्व अहिल्यादेवीनी राजमाता लोकमाता म्हणुन पार पाडले तर तरुणांना पुन्हा फौजेत भरती करुन आधार देण्याचे काम अहिल्यादेवीनी केले आहे अशा अष्टपैलु व्यक्तीमत्व असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारताच्या इतिहासातील सुवर्ण पान असुन त्यांच्या 31 मे रोजी त्यांची जंयती साजरी होत असुन या निमीत्ताने त्यांनी केलेल्या लोकोत्तर कार्याला उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न
- *रामभाऊ लांडे वक्ता तथा अभ्यासक होळकर रियासत*
मो.क्र 9421349586
संदर्भ- 1)होळकर दरबारची कागदपत्र
2) पानिपत के युध्द -रमेश पानिपती
3)पानिपत युध्दातील शहीद सरदार वारसांच्या मुलाखती
#अहिल्यापर्व #जागर_इतिहासाचा
No comments:
Post a Comment