विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 July 2020

-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर



-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म चौंडी पूर्वीचे ता. आष्टी जि. बुलढाणा आताचे जि. अहमदनगर येथे 31 मे 1725 साली वडील मानकोजी शिंदे व आई सुशीलाबाई यांचा पोटी झाला. गावातील अहिल्येश्वर मंदिरा वरून त्यांचे नाव अहिल्या असे ठेवले गेले. वडील मानकोजी शिंदे हे चौंडी गावचे पाटीलकी करत असत. अहिल्यादेवी च्या लग्नाच्या बाबतीत अनेक दंतकथा सांगितल्या जातात पण आपण तिकडे जास्त वेळ न दवडता अहिल्यादेवींच्या ऐका अपरिचित भागा कडे लक्ष देऊ.
अहिल्यादेवींच्या आयुष्यावर जोना बेली ( Joanna Baillie ) यांनी स्कॉटलंडहून भारता मधे येऊन अहिल्यादेवींच्या मृत्युपश्चात एक 680 ओळींचे महाकाव्य लिहले आहे. त्याचा आपण परामर्श घेऊ. अहिल्यादेवींचे मूळ व विश्वासार्ह चरित्र आंग्लइतिहासकार सर जॉन माल्कम यांनी Memories of central india , including MALWA हा ग्रंथ 1824 साली लंडन येथे प्रकाशित केला. आणि या ग्रंथावरूनच प्रेरित होऊन जोना बेली या भारता मधे आल्या. व त्यांनीAhilyaabai A poem हा 680 ओळींचा काव्यसंग्रह लंडनहूनच 1849 साली प्रकाशित केले. एका परदेशी कवयित्री ने भारतील राजे वा शासक यांचा वर रचलेले हे प्रचंड महाकाव्य एकमेवाद्वितीय च म्हणावे लागेल.
जोना बेली या मूळच्या स्कॉटलंड च्या त्यांचा जन्म 1762 तर मृत्यु 1851 चा जोना बेली या संगीत कला व गणित यामध्ये निपुण होत्याच त्याच प्रमाणे त्या नाटककार देखिल होत्या. अश्या या जोना बेली यांनी जात पात धर्म देश भाषा यांचा पलीकडे जावून एका प्रजाहित कर्तव्यदक्ष माऊली वर " अहिल्याबाई " हे काव्य लिहून संत ज्ञानेश्वरांचे हे विश्वची माझे घर ह्या हे विधान सार्थ ठरवलं आहे.
जोना बेली यांची ही रचना इंग्रजी काव्यप्रकार Ballad या शैलीमधे आहे. तिची ही रचना तिची ही रचना इंग्रजी चे महाकवि जॉन मिल्टन अमरकृती ( Paradise lost 1667 A.D.) च्या परंपरेनुसार प्रारंभ केली आहे. संपूर्ण काव्यामधे एक निरंतरता आहे. प्रमुख प्रसंगाच्या मधे कुठे ही सीमा रेषा घातलेल्या नाहीत. त्यामुळे एकूण रचना बोधगम्य होत नाहीत. प्रमुख पात्र अहिल्यादेवींचे चे पुत्र मालेराव , कन्या मुक्ताबाई , तुकोजी राव होळकर यांची नावे दिली नाहीत. फक्त he किंवा she असा उल्लेख आहे. संपूर्ण रचनेत 15 प्रसंग आहेत. आपण एक - एक प्रसंग क्रमाक्रमाने पाहू.
प्रसंग - 1
A voice form sinai's sacred summit came , What time , enrobed and bid in smoke and flame , Israel's assembled hosts the the wonder saw from its extended base , a sight of awe.
In stilly silence waiting to behold what dreadful visioned change it might unfold ; with up cast ,fallid faces , shrunk with fear , They stood , the awful words of god to hear ;
They heard and felt that Israel's god alone , is lord of heaven and earth , And shares his power with none. The terrors of that awful day , though past , Have on the tide of time some glory cast ;
As when the sun , whom cloudy state conceals , from his pavilion's curtain'd side side reveals Some scattered rays , that through the general gloom , headline , or tower or desart rocks , illume ;
मराठी अनुवाद
सिनाई पर्वताच्या पवित्र शिखराहुन झाली एक गर्जना , अग्नीचे लोळ आणि धूरातून जशी काळाची सर्जना, ईस्त्राईलच्या लोकांनी पाहिले ते अद्भुत द्रूश्य , शिखरापासून पायापर्यंत झाला भयाचा एक स्पर्श !
वादळाच्या पूर्वी जशी एक शांती भासते , काळच्या गर्भात जसे एक रहस्य असते , भयाक्रांत चेहरे उठले आकाशाकडे , काय सांगतो ईश्वर , लक्ष द्या शब्दाकडे !
ऐकले होते त्यांनी फक्त ईश्वर आहे सर्वशक्तिमान , तोच आहे आकाश आणि प्रूथ्विचा चा स्वामी महान , आतंक त्या अद्भुत दिवसाचा ,हळूहळू ओसरला काळच्या प्रवाहात जसा तो सोहळा ओघळला !
सूर्याला जरी क्षणभरी एक लपवितो , त्याच्या तेजस्वी किरणांना न तो झाकतो , ती फुटून पडतात , तमालाही भेदुन पठार आणि मिनराना आलोकित करून !
सारांश : इस्राइल च्या पवित्र सिनाई पर्वत शिखरातून मेष पालक ( धनगर ) मोजेस याला ईश्वरी संदेश प्राप्त झाला हाच संदेश पुढे येशू ख्रिस्ताना मिळाला व अखिल मानव जातीचे कल्याण केले अगदी त्याचप्रमाणे अहिल्यादेवींचे कार्य आहे. ( मुळात कवयित्री ख्रिश्चन असल्याने त्यांनी हा संदर्भ वापरलेला दिसतो.)
काव्यसंग्राहाचा पुढील भाग क्रमशः
फोटो संदर्भ 1) अहिल्यादेवी होळकर 2) जोनी बेली 3) अहिल्यांजली प्रा. ना ग. काळे संदर्भ :
Ahilyaabaee A poem JOANNA BAILLIE
मराठी अनुवाद अहिल्यांजली प्रा. ना. ग काळे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...