कर्जबाजारी महादजी शिंदेंना
अहिल्यादेवींनी दिला मदतीचा हाथ
-------------------------------------------------
इंदौर संस्थानलगत उजैन संस्थान असुन त्याचे प्रमुख महादजी शिंदे यांना पानिपत युध्दानंतर अंत्यत बिकट अशा अवस्थेत कारभार चालवावा लागला होता सन 1761 ते 1767 अशी सात वर्ष ते कर्जबाजारीपणात बुडाले होते मराठ्यातील प्रतिष्ठीत अशा महादजींची आर्थिक अडचणीमुळे वाईट अवस्था झाली होती त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना पत्र लिहले होते या पत्रानंतर महादजीचे शौर्य व पराक्रम पाहुन आलेल्या अडचणीत धावुन जाणे हा आपला धर्म आहे म्हणुन त्यास तात्काळ तीस लाख रुपये कर्ज देऊ केले महादजींनी मिळालेल्या कर्ज परतफेडीविषयीची कागदपत्रे अहिल्यादेवींना लिहुन दिली होती अडलेल्या महादजींना मदत केल्यामुळे महादजी पुन्हा नव्या दमाने उभा राहु शकले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा महादजी शिंदेना कर्ज देण्याचा निर्णय महत्व पुर्ण होता अशा या लोकमाता -राजमाता -महान तपस्पी राणीची किर्ती अजरामर असुन 31 मे रोजी त्यांची संबध देशभर जंयती साजरी होत असुन त्यांच्या या मुत्सदीपणाला अभिवादन त्रिवार वंदन संदर्भ-रणरागिणी अहिल्यादेवी होळकर लेखक-उज्वलकुमार माने सोलापुर -रामभाऊ लांडे वक्ते तथा अभ्यासक होळकर रियासत (व्याख्यानाकरिता संपर्क 9421349586)
#अहिल्यापर्व #जागर _इतिहासाचा
No comments:
Post a Comment