विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 July 2020

#****"बादशहा मोठा नाही, मराठे मोठे आहेत"****

#****"बादशहा मोठा नाही, मराठे मोठे आहेत"****
त्या काळात दिल्लीचा बादशहा हिंदुस्थानात सर्वस्रेष्ठ समजला जाई. बादशहाच्या शब्दाला सर्व राजे, संस्थानिक मान देत , त्यांचा शब्द पाळत. त्या काळात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्या येण्यासाठी परवानगी घ्यावी लागे. एकदा दिल्लीहून काही लोक दक्षिणेत जात होते . बादशहाने त्यांना वाटेत कोणी अडवू नये म्हणून मार्गातील राज्यांना पत्रे दिली होती. ती पत्रे प्रवासी त्या त्या राज्यातील राजांना देत आणि आपला प्रवास सुकर करीत . त्या काळी बादशहाच्या पत्राचा सन्मान म्हणून राजे लोक उभे राहून, दोन पावले पुढे येऊन पत्राचा स्वीकार करीत. असेच काही प्रवासी महाराणी अहिल्यादेवींच्या दरबारात आले.त्यांनी बादशहाचे पत्र अहिल्यादेवींना देतांना "पत्राचा स्वीकार दोन पावले चालून, उभे राहून करावा" असे सांगितले. तेव्हा अहिल्यादेवी त्यांना स्पष्टपणे म्हणाल्या "ज्या बादशहाचे पत्र आपण स्वीकारा म्हणता त्या बादशहाला आम्ही मराठ्यांनी पातशहाच्या गादीवर बसवले, हे पाहता बादशहा मोठा नाही. मराठे मोठे आहेत" म्हणून त्यांच्या पत्रास एवढा सन्माम का द्यायचा ???
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर--लेखक: हरिभाऊ भ.कोळेकर
अहिल्यापर्व
#जागर_इतिहासाचा
#पुण्यश्लोक

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...