विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 July 2020

शाहूंची जिद्द आणि मराठ्यांचे तांडव - सिद्दीचे मुंडके छाटून रायगडवर पुन्हा भगवा फडकवला !



शाहूंची जिद्द आणि मराठ्यांचे तांडव - सिद्दीचे मुंडके छाटून रायगडवर पुन्हा भगवा फडकवला !
#शाहूपर्व
postsaambhar :Malojirao Jagdale
छत्रपती शाहूंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या घोडी नर्मदापार पोचल्या होत्या. माळवा ,गुजरात, कर्नाटक अगदी दिल्ली पर्यंतचे मुलुख टापाखाली आले होते.पण शिवरायांची राजधानी आणि मराठ्यांचे तख्त असलेला 'रायगड' आणि जिजाऊ राहत होत्या ते पाचाड १६८९ पासून म्हणजे ४४ वर्षे पारतंत्र्यात होते, हि सल शाहूंच्या मनात होती आणि मोठ्या मोहिमेचे नियोजन करून रायगड स्वराज्यात आणण्याचे मनसुबे होते.रायगड त्यावेळी जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात होता.
रायगड जिंकणे हा शाहू छत्रपतींनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. १७३३ साली मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेची आखणी त्यांनी स्वतः केली.मराठेशाहीची संपूर्ण ताकद त्यांनी रायगड जिंकण्यासाठी लावली, रायगड मोहिमे व्यतिरिक्त फक्त पानिपतातच इतके मोठे सरदार आणि सेनापती एकत्र उतरले असावेत.
राजपुत्र फत्तेसिंह भोसले, बाजीराव पेशवे,छत्रपतींची हुजुरातीची फौज,पिलाजी जाधवराव,सरखेल सेखोजी आंगरे,सरलष्कर दावलजी सोमवंशी,सेनापती दाभाडे, येसाजी गायकवाड, हिम्मतबहाद्दर उदाजी चव्हाण,श्रीपतराव पंतप्रतिनिधी, चिमाजी आप्पा, भुईंजकर जाधवराव,कृष्णाजी खटावकर,उदाजी पवार,महाडिक,घोरपडे असे दिग्गज सेनानी कोकणात उतरल्याने रायगड परिसराला रणांगणाचे रूप आले.१५-२० आघाड्यांवर युध्द सुरु झाले
मे महिन्याच्या आतच मोठे यश मराठ्यांना प्राप्त झाले बिरवाडी,अवचितगड, घोसाळगड, सुरगड, मदनगड,मंडणगड,विजयगड आणि बाणकोट हे किल्ले ताब्यात आले. फत्तेसिंह भोसले आणि प्रतिनिधी यांनी रायगडला वेढे दिले, मराठ्यांनी सिद्दीचा एक मुलगा आणि एक सेखजी नावाचा सरदार आपल्या बाजूने आणला होता, त्यांना पुढे करून रायगड फंदफितुरीने घेण्याचे प्रयत्न होते.
प्रयत्नास यश येऊन ६ जून म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकदिनीच रायगड वर भगवा फडकला. गड मराठ्यांनी जिंकल्याने सिद्दी चवताळला सिद्दी अंबर ने रायगड परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली, अनेक महिने चकमकी चालली, शेवटी १० जानेवारीला सिद्दी अंबर शी निकराचे युद्ध झाले. छत्रीनिजामपूर, पाचाड येथून रेटत मराठ्यांनी सिद्दी ला रायगड जवळ आणले, गडावरून खाशा फौज आली दोन्हीच्या मध्ये सापडून सिद्दी अंबर आणि त्याचे हजार भर सैन्य या युद्धात ठार झाले. शाहू छत्रपतींनी सिद्दी अंबर चे डोके कापून सातार्याला मागवले आणि जिवंत सापडेल त्या सिद्दी सैनिकांची डोकी कापावी,पाचाड व रायगड वाडी येथील सिद्धीचे वाडे तोफांनी उडवून टाकावे असे आदेश दिले.
सरदार कृष्णाजी खटावकर ,किल्लेदार जिवाजी लाड यांच्यासह अनेक मावळ्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घालून रायगड पुन्हा स्वतंत्र केला. शाहू छत्रपतींनी फत्तेसिंहबावा,बाजीराव,प्रतिनिधी यांचा मानाची वस्त्रे आणि मोठी बक्षिसे देऊन गौरव केला. अनेक मातब्बर मोहिमेत पहिल्यांदाच एकमेकांच्या बरोबरीने काम करत असल्याने चुरस निर्माण झाली त्यामुळे प्रत्येकाने पराक्रमाची शर्थ केली.
सिद्दीने अनेक जाचक कर प्रजेवर लावले होते,तेथील अनेक धार्मिक स्थळे उध्वस्त केली होती,लोकांना गुलामांच्या बाजारात विकण्यात येत.या छळातून प्रजेची कायमची मुक्तता झाली.रायगडचे तख्त पुन्हा ताब्यात आले होते, कैलासवासी छत्रपती शिवरायांची राजधानी स्वराज्यात आल्याचे अतीव समाधान त्यांचे नातू शाहू छत्रपतींना झाले.रायगडाचा सुवर्णकाळ पुन्हा चालू झाला होता.
#जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

भारताला इंडिया का म्हणतात?

  भारताला इंडिया का म्हणतात? सिंधू हि नदी भारताच्या प्राचीन इतिहासाचे एक फार मोठे सुवर्णस्थान आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा तीन नागरी संस्क...