postsaambhar::Raj Jadhav
१७-१८ वर्ष औरंगजेबाच्या कैदैत राहून स्वराज्याचे दूसरे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज कैदेतुन निघुन येतात, स्वराज्यात आल्यावर आपल्या संघटन कौशल्याने योग्य माणसांची पारख करत स्वराज्याची घडी बसवून स्वतास राज्याभिषेक करून छत्रपती होतात. हे सगळ एकदम अविस्मरणीय आणि अलौकिक आहे. स्वराज्यात सर्वात जास्त कालावधी छत्रपती म्हणून राज्यकारभार पाहणाऱ्या या भरतवर्षसम्राटास काही कपाळकरंटे लोक मोगलांचे मांडलिक म्हणवतात तर गुलाम म्हणवतात पण या छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी तत्कालीन प्रतिकूल परिस्तिथिचा सामना करत, महसुल प्रशासन आणि लष्करी प्रशासन याची योग्य सांगड लावत अवघा हिंदूस्थान आपल्या छत्राखाली घेतला हे मात्र त्या लोकांना दिसत नाही, यासाठी आपल्याला छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या महसुल प्रशासनाची विशेषता १७ व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि १८ व्या शतकाच्या सुरुवातीची माहिती असणे आवश्यक आहे.
मुळात दक्षिणेतील सहा सुभ्यांची सरदेशमुखी ही थोरले शाहुंची मिळकत होती, जो ऐन वसूल होईल त्यापैकी शेकडा १० टक्के वसूल हा राजाकडे जमा होई आणि बाकिचा सरकार खजिनाकड़े जमा होई. ज्या मुलखातून चौथाई वसूल केली जाई त्या मुलखावर मराठा सरदार स्वारी करत, जितका ऐवज मिळवता येईल तितका घेऊन सरकारकडे येणे राहील त्याच्या वसुलीसाठी दुसऱ्या वर्षी मुलुखगिरी करत, स्वार्या करून जो मुलुख स्वराज्यात आला त्याच्या वसुलीचा जो चौथ आहे तो राजाची बाब ( राजबाबती - शेकडा २५ ) आहे त्यावर राजाचा हक्क असे ठरवले. मोकासामध्ये ही साहोस्त्रा ( शेकडा ६) आणि नाडगौड़ा (शेकडा ३) हे दोन नवीन हक्क तयार करुन आपल्या मर्जीनुसार मराठा सरदारास लावून दिले. आता राहिलेले ६६ टक्के वसूल हा निव्वळ मोकासा होता आणि तो मराठी तिजोरीत जमा करायचा, अशा मुलुखगिरीसाठी निरनिराळ्या सरदारांना निरनिराळे प्रदेश वाटून दिले. मोगल प्रदेशात चौथाई वसूल करण्याच्या निमित्ताने मुलुखगिरी स्वार्या सुरु झाल्या आणि जो जो प्रदेश ज्या ज्या सरदारांनी जिंकला तो तो त्यांना सरंजाम म्हणून लावुन दिला. अशा रीतीने सबंध हिंदुस्तान मराठ्यांच्या सत्तेखाली आला. या सरदारांचे मराठा मंडळ झाले आणि थोरले शाहू महाराज जीवंत असेपर्यंत हे मंडळ जबाबदार राहिले ..
माणसांची योग्य पारख, स्वराज्याच्या विस्तारासाठी महसुल प्रशासन व लष्करी प्रशासन यात केलेले बदल, प्रशासनावर असलेली मजबूत पकड़ हे सगळ छत्रपती थोरले शाहू महाराज हे कुशल प्रशासक आणि सेनानी असल्याची जणु काही इतिहासास ग्वाही देतात ...
संदर्भ > १) महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ ( १७०७ ते १८१८ ) - डॉ. वि गो खोबरेकर , महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
२) छत्रपती थोरले शाहू महाराज चरित्र - आसाराम सौंदणे
#जागर_इतिहासाचा
#शाहुपर्व

No comments:
Post a Comment