postsaambhar :Ketan Puri
शाहू छत्रपती म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक दुर्लक्षित पण महान छत्रपती..मध्यांतरी शाहू पर्वामुळे शाहू छत्रपती सर्वांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचले.आजही 1-2 पुस्तकांच्या वर शाहू छत्रपतींविषयी हवी तितकी माहिती मिळत नाही..शाहू दफ्तराची कित्येक पुस्तके आज पुनःप्रकाशित करण्याची खरी गरज आहे.
महाराष्ट्राला इतिहास सशोधकांची फार मोठी परंपरा आहे.त्यातीलच एक सुपरिचीत नाव म्हणजे ग.ह.खरे होय.खर्यांनी अनेक पुस्तके लिहून मराठ्यांचा अपरिचीत इतिहास पुढे आनन्याचे काम केले.पण हे करताना त्यांनी काही चूका ही केल्या.
भारत इतिहास संशोधक मंडळ यांच्यातर्फे प्रकाशित झालेले एक पुस्तक ‘इतिहासकर्ते मराठे’..लेखक खरे..मराठ्यांच्या इतिहासात पराक्रम करणारे छत्रपती आणि काही महान लढवय्ये यांची सचित्र 1 पानाची माहिती..पुस्तक छोटेखानी असले तरी चांगले आहे.
पुस्तकातील एक प्रकरण शाहू छत्रपतींवर आहे.त्यात खरे यांनी शाहू छत्रपतींविषयी जे मत मांडले आहेत,ती वाचून हसावे का रडावे तेच समजत नाही.
‘बालपन कैदेत गेल्यामुळे शाहूला शिक्षण आणि राज्यकारभाराचा अनुभव नव्हता’
कशावरून?एका खंडप्राय देशावर राज्य करणाऱ्या मराठ्यांच्या छत्रपतीला राज्यविस्ताराचे आणि राजकारणाचे धड़े माहीत नसतील काय?
लहानपण कैदेत गेले होते,पण शाहू छत्रपतींच्या वाढत्या वयात त्यांना राजकारणाचे धड़े आणि शिक्षणाच्या महत्वाच्या मुलभुत गरजा येसूबाई राणीसरकार यांनी पुर्ण केल्या होत्या,हे खर्यांना माहीत नसावे काय?
पुढे खरे म्हणतात,
‘त्याने 30 वर्षे खटपट करुन राज्यप्राप्ती केली.’
हा अजून एक हास्यास्पद प्रवाद..1720 पर्यंत अगदी उत्तरेत मराठे आपल्या पराक्रमाने पोहोचले होते.1708 साली गादीवर आलेल्या छत्रपतींनी 1749 पर्यंत अवघ्या भारतावर मराठ्यांचा जरीपटका फडकावला.नेमके हे लिहिण्यामागे खरे यांचा काय उद्देश असू शकतो?
‘मृदु स्वभावामुळे हाताखालच्या सरदारांवर आणि नोकरावर त्याचा वचक बसला नाही.’
शाहू छत्रपतींना त्यांची रयत शिवाचा अवतार मानत.शिवछत्रपतींच्या पावलावर पाऊल टाकून शासन करणारा शासनकर्ता अशी ओळख शाहू छत्रपतींची होती.रयतेपासून ते प्रधान पेशवे शाहू छत्रपतींविषयी आदर बाळगुन होते.
कित्येल सरदारांना पाठवलेली ताकीदपत्रे ही शाहू छत्रपतींच्या सरदारांवर किती वचक आहे,हे पटवून देण्यास पुरेशी आहेत.बाजीराव यांना जेव्हा पुण्यात मस्तानी प्रकरणात त्रास होत होता,तेव्हा खुद्द छत्रपतींनी ताकीदपत्रे पाठवली होती.पेशव्यांच्या दफ्तारातील कागदपत्रे नुसती वरवर चाळली,तरी शाहू महाराजांचा त्यांच्या सरदारांवर किती वचक होता यची पुर्ण कल्पना येते.
शाहू छत्रपतींच्या ताकदीची जाणीव पोर्तुगीज,इंग्रजांपासून सर्वांना होती.उगाच काय मलाबारचा राजा जेम्स प्लांटेन शाहू महाराजांच्या आश्रयाला आला होता..संपूर्ण देशभरात त्यावेळेस सर्वात ताकदवर असणारा छत्रपती,आणि त्याला आपल्या सरदारांवर वचक ठेवता आला नसेल?
त्यातच खाली इंग्लिश मधे असणाऱ्या उताऱ्यात मात्र याउलट लिहीले आहे.इतर लेखांमधे वरी मराठीमधे जे आहे त्यालाच इंग्लिश मधे भाषांतरित केले आहे.फ़क्त शाहू छत्रपतींच्या बाबत मात्र अगदी विरुद्ध लिखाण केले आहे.मग मराठीमधून विरोधी मत मांडायचे,आणि इंग्लिश मधून चांगले लिहायचे..तेही साली..का बरे?
एकूणच काय..
आज शाहू छत्रपतींचा झाकोळ लेला इतिहास लोकांसमोर मांडायची खरी गरज आहे..कित्येकांना मोठे करण्यासाठी शाहू महाराजांना झाकन्याचे काम केल्या गेले..पण शाहू छत्रपतींचे कर्तुत्वच इतके मोठे आहे,की त्यांचा इतिहास मांडण्यासाठी कुणाला कमीपना दाखवन्याची गरजच नाही..
बाकी ग.ह.खरे यांचे काम मोठे आहेच..पण शाहू छत्रपतींविषयी त्यांचे आजवर झालेले एकुन लिखाण हे विरोधातीलच आहे..या पुस्तकाच्या बाबत बोलायच झाले तर पुस्तकाचे फोटो खाली देत आहे..वाचकांनीच ठरवायचे नेमके खरे काय..





No comments:
Post a Comment