रवि पार्वती शिवाजी मोरे
Visual storyteller ·
एखाद्या व्यक्तीला सामर्थ्य प्राप्त होते ते त्याचे चारित्र्य , त्याग आणि आपल्यातील प्रखर आत्मविश्वासाने . बाजीराव पेशव्यांची शाहू महाराजांच्या बद्दलची निष्ठा अशीच होती . जगेन तर महाराजांच्या साठी मरेन तर महाराजांच्या साठी अशा भावनेतुन बाजीरावांनी शाहू महाराजांच्या वर प्रेम केले . शुद्ध प्रेमात भावना असते ती निरपेक्ष व उदात्त आत्मसमर्पणाची . ही निष्ठा त्यांच्या असंख्य पत्रात दिसते . पत्रांच्या शेवटी बाजीरावांनी शाहू महाराजांच्या विषयी दाखवलेला आदर अनेक भावनिक शब्द प्रयोगातुन दिसुन येतो .
- 1) सेवकाचे साह्य करावे . सेवकावर कायम कृपादृष्टी ठेवावी .
2) सदैव आशिर्वादपत्र पाठवावयाविशी आद्न्यापिले पाहिजे .
3) जालें वर्तमान सेवेसी निवेदिले आहे . निवारण करणार स्वामी धणी समर्थ आहेत .
4) स्वामींच्या पायाखेरीज दुसरा अवलंब सेवक जाणत नाही . कूर्मदृष्टी करून सेवकाचा सांभाळ करीत असले पाहिजे .
5) आता पदरी पडलो . धनी स्वामी आहेत . मी सेवक जास्त काय विनवू ! आमचे सर्व संकट स्वामीसच आहेत . जैसे स्वामी आद्न्या करतील तैसे सेवक वर्तणूक करील . येविसी विस्तारे काय लिहिणे .
6) कृपा वर्धमान केली पाहिजे . उत्तर पाठवावयाविशी आद्न्या करणार स्वामी समर्थ आहेत .
7) साहेबांचा अन्नाचा प्रताप आहे तेथे चिता नलगे .
8) कळेल त्या रितीने सांभाळ करुन इजतीस चढविणार स्वामी समर्थ आहेत .
9) वडील मायबाप सर्व स्वामी आहेत . आमची शरम , लज्जा साहेबास आहे . विशेष लिहावे तरी सुद्न्य असा .
10) आपण पदरीचे ठेवणाईत पूर्वी पासून आहो . उर्जित करणार स्वामी समर्थ आहेत .
11) आपणास स्वामीवाचून कोणाचा आसरा नाही . एकनिष्ठपणे चाकरी करतो . स्वामी सर्वजाण आहेत .
12) स्वामी सर्वद्न्य आहेत . आपण सेवक आद्न्या धारक आहो . कृपेस अंतर केले न पाहिजे .
13) आपले समाधानपुर्वक आशिर्वादपत्र आले . म्हणजे चित्तातील हळहळ दूर होईल .
14) स्वामींनी बरा विचार चित्तात आणून आद्न्या करणे ते करविली पाहिजे .
15) सदैव पत्रार्थी स्नेहभिवृद्धि केली पाहिजे .
16) आमचे लाड आणि लिहिणे चालविता म्हणोन इतके लिहिणे . वरकड वर्तमान स्वामींच्या कृपेने यथास्थित आहे .
17) पायाशी चाकरी करुन आल्यावर सेवकास सर्फराज करणार स्वामी समर्थ आहे .
18) निरंतर याच अन्वये वडीलपणे परमार्श करावा .
19) सदैव पत्री साकल्यार्थ लेखन करुन परामर्श घ्यावया अंतर न किजे .
20) हरघडी स्वकीय कुशलार्थ लेखन करुन संतोषवीत असावे .
21) जिवंत आहों तो यत्नास चुकत नाही . पोटास देणार स्वामी समर्थ आहेत . यश स्वामींचे आहे .
22) आपणाखेरीज दुसरे आम्हास कोण आहे ? वडीलपणे जे आमचे बरे ते करावे .
23) चरणरजाची विनवावया प्रार्थना की आम्ही स्वामींचे पदरचे स्थापित आहोत .
24) सेवक पुरातन पदरीचे आहो . आमचे हाते सेवा घेऊन उर्जित करणार स्वामी वाचून दुसरा कोण आहे ? सुटले केश पाठीस शरण .
25) सेवकाची विनंती उदास न करावी . साहेबांचे आद्न्ये पेक्षा येथील कार्य विशेष नाही .
संदर्भ - छत्रपती थोरले शाहू महाराज - आसाराम सैंदणे
#शाहुपर्व
#जागर_इतिहासाचा
🙏🚩🚩


No comments:
Post a Comment