#शाहूपर्व
#जागर_इतिहासाचा
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Saturday, 25 July 2020
अक्कलकोटचे भोसले. -
अक्कलकोटचे भोसले.
---------------------------------------------------------------------------
मोगल कैदेतून सुटल्यानंतर छ. शाहू महाराज (इ.स 1707) अहमदनगरवरून पारद, परगणे,शिवणे येथे आले.या गावात एक लहानशी गढी होती.शाहुंची काही माणसे आवश्यक सामान आणण्यासाठी गावात गेली होती.गढीच्या आश्रयास असलेल्या पाटलाने सारासार विवेक न करता त्यांच्यावर हल्ला केला.झाल्या प्रकाराने शाहू बिथरले व हल्ला करून गाव फत्रा केला.पाटलाचे भाऊ शहाजी लोखंडे पडले,बाबाजी पाटील यांचे वडील कामास आले.गावाचा सत्यानाश झाला.त्यावेळी निराश्रित झालेली पाटलाची बायको हिने मूल घेऊन शाहूच्या पालखीत टाकले व म्हणाली,'यास वाचवावे.अन्यायी होते ते मारले गेले.हे मूल आपणास वाहिले आहे.'त्यावरून समाधान पाऊन शाहूने त्या मुलाचे संगोपन केले.ठाणे फत्ते झाले म्हणून मुलाचे नाव फत्तेसिंग असे ठेवले.त्याचे आईस आश्वासन देऊन ,लुटपाट बंद करून मुक्कामास आले.पुढे काही दिवसांनी शाहूने ह्या फत्तेसिंगास अक्कलकोटची जहागिरी दिली.ती अद्यापही चालत आहे.
--------------------------------------------------------------------------
छ. शाहूंनी फत्तेसिंगास दिलेल्या इनामपत्रात 'राजपुत्र' केल्याचा उल्लेख.
"तुमचे बाप व भाऊ मोगलाई तर्फेने कसा करून चीज जाहले.तुम्हावर कसीला पडला त्याबद्दल स्वामी कृपाळू होऊन तुम्हास मौजे मजकूर हा इनाम गाव दिला आहे.याप्रमाणे स्वामींनी तुम्हास कुलांत घेऊन राजपुत्र केले.महाल गाव सरंजाम दिले.तर परगणे अक्कलकोट इनाम खाने. राज्यपदारूड होतील ते तुम्हाकडे अकसई चालवितील.तुम्ही त्याजपाशी राहुन राज्यसाधन सेवा करणे.आशीर्वाद"
---------------------------------------------------------------------------
संदर्भ:-छ. थोरले शाहूमहाराज (सातारा)
लेखक:-आसाराम सैंदाणे
Subscribe to:
Post Comments (Atom)
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी १७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
-
°°°छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजांना पत्र °°° छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस व्यंकोजीराजांना लिहिलेली चार पत...

No comments:
Post a Comment