विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 25 July 2020

#बारा_जानेवारी_शाहूछञपती_राज्याभिषेक

#बारा_जानेवारी_शाहूछञपती_राज्याभिषेक

संपूर्ण भरतवर्ष हिंदनृपती ज्या छञपतींची ख्याती म्हणून आठराव्या शतकात लाभली असे शाहू छञपती 1689 रोजी रायगडावर बादशहाकडून कैद झाल्यानंतर बादशहाच्या 1707 ला मृत्यूपर्यंत शाहू महाराजांनी सतरा वर्षे कैदेतच गेली.

बादशहापुञ आजमशहाने शाहूंना सोडवण्यासाठी करार करून सोडून दिले. पण शाहूंचा काहीच दोष नसताना या स्वराज्यासाठी सतरा वर्षे कैद मोजून परत आल्यावर ही हवे ते सुख मिळाले नाही . शाहू परत येऊन आपल्या पित्याने राखलेले राज्य ताराऊंना मागितले पण शंभूराजे नंतर राजाराम महाराज व राजाराम महाराजा नंतर हे राज्या ताराऊंनी सांभाळले म्हणून ताराऊंनी नकार दिला आणि सरदारांना शाहूविरूध्द लढावयास तयार केले.

चाकण खेड येथे थोडीशी चकमक झाली या दोन्ही फौजांची धनाजीराव व खंडे बल्लाळ मुत्सद्दींनी फौजेतून शाहूंकडे गेली शाहूंचा जय झाला. यामुळे अनेक सरदार शाहूंकडे आली. याचा शाहूंनी लगेच फायदा घेऊन सातार्यावर चाल केली आणि सातारा काबीज केला. डिसेंबर 1707 .

छञपती शिवाजी महाराज यांचा नातू छञपती संभाजी महाराज यांचा पुञ अशा दोन नावे घेऊन कैदेतून आलेले शाहू 30/40 हजारी फैज धारण केली होती सतत सरदारांना पञे पाठवून आपल्याकडे वळवण्याचे काम सुरू होतेच.

जानेवारी 12 1708 शाहू महाराज यांनी विलंब न करता आपला राज्याभिषेक किल्ले सातारी करून घेतला. 12 जानेवारी जिजाऊंच्या जन्म दिन आणि शाहूंचा राज्याभिषेक हा नुसता योगायोगच नव्हता. शाहू छञपती यांनी छञपती राज्याभिषेक झाल्यापासून राज्यास वाढती लागली.

आपल्या कतृत्वान पित्यास शोभावा असा पुञ जे शंभूराजे यांच्याकडून त्यांच्या मृत्यूमुळे बादशहाची गादी बरखास्त करण्याचे काम अपुरे राहिले होते तेच काम शाहू छञपती यांनी 1718 ला सरसेनापती खंडेराव दाभाडेंच्या अधिपत्याखाली मुत्सदी सरदार मंडळी आणि भरपूर फैजफाटा देऊन शाहूंच्या नेतृत्वाखाली मातोश्री येसुबाईंना सोडविण्यासाठी आणि चौथाई सरदेशमुखीच्या सनदा घेण्यासाठी दिल्लीत पहिल्यांदाच छञपतींचे घोडे तलवार घेऊन धावले आणि दिल्लीपतीस जेरीस आणून मातोश्रीस सोडवून सनदांचे नुतनीकरण करून मराठ्यांची पहीली घोडी दिल्लीवर दौंडली.

या 1708 ते 1749 हा काळ शाहू छञपतींमुळे सुवर्णकाळ ठरला. याच काळात शाहूंनी अखंड हिंदुस्थान जिंकून मराठ्यांचा जम अख्ख्या हिंदुस्तानात बसवून अखेर सातारी 15 डिसेंबरी देह ठेवला.

#शाहूपर्व
#जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...