इतिहासाच्या पानांत हरवलेले एक दुर्लक्षित सोनेरी पान """"जमादार बापू लक्ष्मण लामखडे """
😪 यांची माहिती नसेल तर जरूर वाचा "ज्यांचे नाव ऐकले की मुंबईच्या स्मगलर्सना धडकी भारत असे
*ज्यांनी चौतीस वर्षांच्या आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्या काळात लाखो रुपयांचा स्मगलिंगचा माल पकडला. ज्याची किंमत आज अब्जावधी रुपयात होइल. *****
****त्यांच्या अनेक गाजलेल्या कामगिर्यांपैकी एक म्हणजे दिनांक २०/९/१९५७ रोजी व्हिक्टोरिया डॉक मध्ये तीन चीनी खलाशांकडून जप्त केलेले तिनशे तोळे सोने कि जे त्यांनी आपल्या गुप्तांगामध्ये लपवले होते. स्मगलिंगच्या जगातील हि पहिलीच अनोखी घटना. बापून,कुठल्याही खबरीशीवाय केवळ आपल्या तीक्ष्ण निरीक्षणाच्या व दीर्घ अनुभवाच्या जोरावर उघडकीस आणून, अगदी सिंगापूर hongkong पर्यंतच्या गुन्हेगारी विश्वात खळबळ उडून दिली होती. ***
६०-७० च्या दशकातील, हीच स्मगलर्स, gangsters मंडळी ज्यांचे नाव ऐकताच थरकापत असत, तो योद्धा म्हणजेच जमादार बापू लक्ष्मण लामखडे. १९६०/७० चे दशक म्हणजे मुंबई अंडरवर्ल्डचा सुवर्ण काळ होता तो. ह्या काळात दारू, मटका, स्मगलींग सारख्या अवैध धंद्यातून अनेक गुन्हेगार सम्राटांचा उदय झाला. व त्यांनी मुंबईला वेठीस धरले होते. असे ह्या प्रत्येक सिनेमातून दाखवले आहे. परंतु हे सर्व खरे आहे काय? तर नाही. सत्य हे आहे की, आपल्या अतुलनिय धाडसाने ह्या सगळ्या भाई मंडळींच्या छातीत धडकी भरवणारा एक आवाज मुंबई कस्टम्स मधून निनादात होता, तो म्हणजे जमादार बापू लक्ष्मण लामखडे.
सध्या बोल्लीवूड मध्ये gangsters, स्मगलर्स या मंडळींवर सिनेमे बनविण्याची जणू लाट आली आहे. हि लाट तशी ह्या इंडस्ट्रीला नवीन नाही. बिच्चारे… ते तरी कुठून आणणार रोज-रोज नवीन-नवीन 'स्टोर्या'. मग जेव्हा-जेव्हा बोल्लीवूड मध्ये नवीन कथानकांचा दुष्काळ असतो त्या-त्या वेळेस हि प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शक मंडळी बिनदिक्कतपणे १९६०/७० च्या मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा धांडोळा घेतात व कुणीतरी एखादा भाई किंवा स्मगलर शोधून काढतात. बस्स. सिनेमा तय्यार.
दिनांक २ जुलै १९२२ रोजी महाराष्ट्राच्या जुन्नर तालुक्यातील, मंगळूर-पारगाव या खेडेगावात बापूचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. बापू लहान असतानाच प्लेग च्या साथीमुळे पित्याचे छत्र हरपले. मोठा भाऊ चिमाजी मुंबईच्या गोदीमध्ये अत्यंत कष्टाचे काम करीत होता. इकडे बापू आईच्या करड्या शिस्तीत लहानाचा मोठा होत होता. आई बरोबर रानात शेळया चारता चारता, रांगड्या निसर्गाच्या कुशीत, दर्याखोऱ्यातून, उन, वारा, पाऊस झेलत बापू दिसामाजी मोठा होत होता. ह्याच रांगड्या निसर्गाने, शेळीच्या दुधान व आईच्या करड्या शिस्तीने बापूला अशी काही शरीर संपदा बहाल केली की, पुढील आयुष्यातील दैदीप्यमान कामगिरीसाठी नियतीच जणू बापूला घडवित होती.
यथावकाश आपल्या कुटुंबाला हातभार लावायासाठी, बापूने देखील मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन, मुंबईच्या गोदीची वाट धरली, तीन-चार वर्षे छोटी मोठी काबाड कष्टाची कामे करून, १९४४ साली वयाच्या २२ व्या वर्षी बापूने मुंबई कस्टम्स मध्ये, शिपायाच्या पदावर भरती होऊन, कस्टम्सच्या सेवेत प्रवेश केला. आणि इथूनच बापूच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
आपली बलदंड शरीरयष्टी, धाडसी स्वभाव, कुशाग्र बुद्धी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या गुप्त हेराच्या अंगी असणारी सर्व कौशल्ये नियतीने जणू बापूला बहाल करून टाकली होती. बापूला जेव्हा १९६४ साली त्यांचा पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तो कस्टममधील पहिलाच पुरस्कार होता, व दुसर्यांदा जेव्हा त्यांना १९७८ साली मरणोत्तर राष्ट्रपती पुरस्कार घोषित करण्यात आला. तेव्हा पुरस्कारासोबत भारतीय कस्टम्स ने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सरकारी पुस्तीकेमध्ये चक्क बापूला सहावे इंद्रीय असल्याची नोंद करण्यात आली आहे. इतके अजब असे हे रसायन होते. अन जोडीला होते रामसिंग, गाडेकर, गावडे, मेहेंदळे सारखे जीवाला जीव देणारे सहकारी व अधिकारी वर्ग व तसेच त्यांचे स्वतःचे खबर्यांचे एक अप्रतिम जाळे. त्रेच्याळीस वर्षे जीवापाड जपलेली एक सायकल, सतत प्रोत्साहन देणारे कलेक्टर मुगवे, सोनावणे, कमर काझी यांच्या सारखे उच्च पदस्थ अधिकारी. या सर्वांच्या सहकार्यामुळेच बापू हि असामान्य कामगिरी करू शकले.
अशा अनेक असामान्य कामगिऱ्या बापून सतत आपला जीव धोक्यात घालून, बहुतांश एक हाती, एकट्याने पार पडल्या होत्या. अस खुद्द भारतीय कस्टम्स खात्याने नोंदवित बापूला गौरविलय. त्यांच्या प्रत्येक कामगिरीवर एक सिनेमा होईल अस हे व्यक्तिमत्व. दिनांक ४ डिसेंबर १९७८ रोजी अचानक मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या दुःखद निधनानंतर मुंबई कस्टम्स ची मुख्य कचेरी ज्या चौकात आहे, त्या चौकाचे, केंद्रीय मंत्री मगनभाई बारोट यांच्या हस्ते 'जमादार बापू लक्ष्मण चौक' असे नामकरण करण्यात आलेय. त्याकाळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या एस. एम. जोशी व इतर मातब्बर नेत्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी पुढाकार घेऊन, त्यांच्या जन्म गावी त्यांचा ब्रोन्झचा पुतळा उभारण्यात मोठी मोलाची कामगिरी बजावलीय.
बापूंना श्रद्धानजली वाहताना शिवसेनेचे झुंजार नेते कै. प्रमोद नवलकर यांनी अंडरवर्ल्डमधील त्यांच्या सर्व कामगिर्यांमध्ये बापू लक्ष्मण यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठिंबा होता, हे नम्रपणे कबुल केलेले आहे. दिनांक १० डिसेंबर १९७८ रोजी आपल्या 'भटक्याची भ्रमंती' या त्या काळी गाजलेल्या लेखमालेतून बापूला श्रद्धांजली वाहताना प्रमोद नवलकरांची लेखणी सुद्धा गहिवरली. खर्या अर्थाने मुंबईला भयमुक्त करून, ६०-७० च्या दशकांतील गुन्हेगारी जगामध्ये आपल्या असामान्य धाडसाने, कायद्याचा वचक व जरब निर्माण करणाऱ्या या खाकी वर्दीतील शूर विराला समस्त मुंबईकरांकडून मानाचा मुजरा!!!""
**
No comments:
Post a Comment