विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 July 2020

🚩"पुतळा मातोश्री 🚩

🚩
"पुतळा मातोश्री 🚩

पुतळा मातोश्री या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत. पालकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. १६५३ रोजी पुतळा बाईंचा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत विवाह झाला होता.पुतळाबाई राणीसाहेब या एक निष्ठावंत पत्नी म्हणून राजेंच्याबरोबर राहिल्या.शिवाजी महाराजांच्यानंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांचे मोठेच योगदान होते.सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर राजांना एकच आधार वाटत होता ,तो म्हणजे धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळा बाई राणीसाहेब यांचा. पुतळा राणीसाहेब यांनी संभाजी महाराजांना आपल्या पोटच्या मुलासारखे जपले,वाढवले.संभाजी राजांच्या वरती संस्कार करत असताना त्यांच्या कडून कोणतीही चूक होणार नाही, याची त्या काळजी घेत असत.पुतळा बाई राणीसाहेब अत्यंत प्रेमळ, भावनिक, मायाळू आणि छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम करणार्या राणीसाहेब होत्या.आयुष्यात राजांना या राणीसाहेबांचा खुपच आधार होता.राजांनी कित्येक वेळा आपली व्यथा या राणीसाहेबांच्याकडे कथित केली होती. अवघे आयुष्य राणीसाहेब यांनी राजांच्या नुसत्या चरणांकडे पाहून व्यथित केले होते.आजूबाजूच्या शंभूराजे यांच्या विरुध्दच्या कारवाया पाहून त्या हतबल होत ,परंतु शंभूराजे यांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही. संभाजी महाराज यांना आपल्या आई आठवत नव्हत्या. जिजाऊ साहेबांच्या नंतर शंभूराजे यांच्यावर खरे प्रेम कोणी केले असेल तर पुतळा बाई राणीसाहेब यांनी.राजांच्या मृत्यूनंतर पुतळा बाई राणीसाहेब शिवरायांचे जोडे घेऊन सती जायला निघाल्या.त्यावेळी शंभूराजे यांच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले होते. कंठ दाटून आला.शंभूराजे म्हणतात "आई साहेब ,तुम्ही जाऊ नका .आमची अशी माणस उरली नाहीत.तुम्ही राहिलात तर आम्हाला जगण्याच बळ येईल.आम्ही शंभूदेवांची शपथ घेऊन सांगतो ,ज्या निष्ठेने आबासाहेब मासाहेबांकडे पाहात होते ,त्याच निष्ठेने आम्ही राहू .तुमच्याविना आम्ही या जगात एकटे होऊ...." छत्रपतींच्या निधनानंतर रायगडावर अनेक घडामोडी घडत गेल्या.
संभाजी महाराज अनेक संकटांवर मात करतात न करतात तोच शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई ‘सती’ जाणार असं म्हटल्यावर अंगावर सरसरून काटा उभा राहिला. महाराजांच्या निधनानंतर रायगड जरा कुठे सावरतोय तोच हे संकट पुढे येऊन ठेपलेले. पुतळा मातोंश्रींचा सती जाण्याचा हा निर्णय कुणालाही मान्य नव्हता. संभाजी राजांनी पुतळाबाई राणीसाहेबांच्या पायावर मस्तक ठेवले. अश्रुंनी पुतळा राणीसाहेब यांचे पाय भिजत होते.पुतळा बाई राणीसाहेब यांनी शंभूराजे यांना आशिर्वाद दिला .त्या म्हणाल्या मी जाते म्हणून वाईट वाटून घेऊ नका. मरण चुकवू म्हणून चुकत नाही - मृत्यू अटळ आहे. मी कधी मरणाचा विचार केला नाही. मला कधी त्याच भयही वाटले नाही. तुम्हालाही मृत्यूचे भय कधी वाटू नये ,हा माझा आशिर्वाद आहे....." महाराजांच्या पाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय मनाशी अगदी ठामपणे बांधून ठेवल्यामुळे महाराजांच्या निधनानंतर रायगड पुन्हा एकदा गहिवरणार असल्याचे स्पष्ट दिसत होते.

उभा सह्याद्री ढसढसा रडत होता, अवघे स्वराज्याचे मुलुखच काय पण निसर्गही क्षणभर स्तब्ध झाला होता..

अवघ्या मावळ्यांचा तारणहार, निश्चयाचा महामेरू, बहुजनांचा आधार, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, सह्याद्रीचा सिंह जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज अचानक सोडून गेले होते,

आयुष्यभर राजांना मोठा आधार फक्त जिजाऊचां नंतर राणीसाहेब सईबाईंचा तद्नंतर एकच राजांना आधार वाटत होत्या ,त्या म्हणजे धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब..

राजांच्या या अशा अकाली जाण्याने राणीसाहेबांवर आभाळच कोसळले होते, अवघा मावळ कावराबावरा झाला होता, सह्याद्रीचा बांध फुटला होता, एव्हडेच काय पण पागेमध्ये गजेंद्र तसेच मोतीसोबत अक्खी पाग सुद्धा अश्रू ढाळत होती... अवघे आयुष्य ज्या राजांच्या नुसत्या चरणाकडे पाहून वेचले होते आणि राजांनी घातलेले जोडे हेच दैवत मानून जीवन जगत असलेल्या राणीसाहेब पुतळाबाई..

निश्चल स्तब्ध आणि भयान दिसत होत्या, राजांच्या व्यथा राजांनी स्वतः राणीसाहेबांजवळ कैक वेळा कथित केल्या होत्या, त्या सर्व नुसत्या व्यथांचा भडीमार पुतळाबाईंच्या मनावर घाव घालीत होता, दिवस भकास वाटत होता, राजांशिवाय जगणे हाच मोठा गुन्हा असल्यागत सर्वांना वाटत होते..

आयुष्यभर ज्या पायांशी नजर जडलेली होती ती नजर शेवटपर्यंत सुटू नये याजकरिता राणीसाहेब पुतळाबाईंनी राजांचे जोडे हातात घेतले, श्वासाश्वासात शिवरायांची प्रचीती होती, राणीसाहेबांचा पाय जराही अडखळत नव्हता, त्या नवजीवनाची नांदीच असल्यागत भासत होत्या, जणू शिवरायांची ओढ त्यांना लागलेली होती, या नश्वर आयुष्यापेक्षा शिवसंजीवणी कधीही श्रेष्ठच..

राजांचे जोडे उराशी कवटाळून त्यावरील नजर न ढळू देता श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या आणि जीवनाचे कल्याण झाले..
🌼जय भवानी🚩 जय जिजाऊ🌼
🌼जय शिवराय🚩जय शंभुराजे🌼

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...