postsaambhar :Udaykumar Jagtap
पेशवाईंतील एक प्रसिद्ध मुत्सद्दी. याचें पूर्ण नांव सखाराम भगवंत बोकील. हा हिंवर्याचा कुलकर्णी होता. सखाराम भगवंत बोकील यांचा जन्म १७१६ मध्ये झाला .पेशवाईमध्ये प्रसिद्धीस आलेल्या साडेतीन शहाण्यांपैकी एक अक्खा शहाणा म्हणून गणना करण्यात येते
. बोकिल घराणे पूर्वी सासवड जवळील हिवरे गावत राहत होते . अफजलखान आणि शिवाजी महाराजांची प्रतापगडावर बोलणी करण्यासाठी छत्रपतींचे वकील म्हणून गोपीनाथपंत बोकील याच घराण्यातील होत . स्वराज्याच्या सुरवातीपासूनच बोकीलघराणे महाराष्ट्राच्या शेवेशी रुजू झाले . महाराजांची वकिली पंताजी पंत बोकीलांनी केलेली होती.
"वकालात " हा फारसी शब्द आहे.राज दरबारी वकिली करणे हा त्यांचबोकील घराण्याचा अनुवांशिक गुण दिसतो . त्या वकील शब्दाचा अपभ्रंश " बोकील" झाला असावा असे वाटते . " बोकील" हा शब्द कदाचित बाक्षस प्राकृतबोक्ख + ईल =बोक्कखील (निधड्या छातीचे लोक ) याची प्रचिती सखाराम बापू बोकीलांनी सार्थ ठरवली आहे त्यांनी समशेर व बुद्धी दोन्हीही चालवलेली इतिहासात दिसून येत आहे .
सुरवातीच्या काही काळात सखाराम बापू बोकील हे सरदार महादजी पुरंदरे यांच्याकडे कारकुनी करत होते सरदार पुरंदरे यांनीच बोकिलांना पेशव्यांच्या दरबारात प्रवेश मिळवून दिला . या संधीचा फायदा बापूनी पुरेपूर उठवलेला दिसतो . " "सख्या ,देवा ,विठ्ठला ""हि त्रयी पेशवेकाळात खूप गाजली
. सख्या -सखाराम बापू बोकील,
देवा-दिवाकर चोरघडे ,
विठ्ठल-सुंदर परशुरामी ,
हे अक्खे तीन शहाणे आणि नाना फडणवीस हा फक्त बुद्धी चातुर्य असल्यामुळे अर्धा शहाणा असे साडेतीनशहाणे मराठ्यांच्या इतिहासात मशहूर झाले
. पूर्वज पणतोजी गोपीनाथ यास शिवाजीकडून हिंबरें गांव इनाम मिळालेला होता (१६५९).
. इसवी सन १७४६ सालीं बाळाजी बाजीराव पेशव्यानें याला सदाशिवरावभाऊच्या बरोबर देऊन, कर्नाटकच्या स्वारींत पाठविलें. इसवीसन १७५४ त सखारामबापू राघोबादाद बरोबर गुजराथच्या स्वारींत गेला होता. पुढें दोन वर्षांनीं बापूची राघोबादादाच्या दिवाणगिरीच्या जागेवर योजना करुन, पेशव्यांनीं त्याला आपल्या बंधूबरोबर उत्तर हिंदुस्थानांत पाठविलें. थोरल्या माधवरावाच्या कारकीर्दीच्या सुरुवातीस राघोबादादा राज्यकारभार पाहत असतांनां, राघोबानें सखारामबापूस आपला कारभारी करुन त्यास ९ लाखांची जहागीर दिली (१७६२)
.इसवीसन १७६४ त सखारामबापूनें आग्रह धरून हैदरअल्लीवरील पहिल्या स्वारीचें आधिपत्य राघोबादादाकडून माधवराव पेशव्यासच देवविलें. या स्वारींत पेशव्यांनीं सखारामबापूस आपल्याबरोबर घेतलें होतें, व ते युद्धच्या हालचालीसंबंधांत याचाच सलज घेऊन त्याप्रमाणे चालत होते.
श्रीमंत भाऊसाहेब पेशव्यांनी एकदा पुणे शहरा भोवती कोट बांधण्याचे ठरवले काम चालू झाले बापुना पेशव्यांनी विचारले" बापू तुम्ही कोट पहिला आहे कि नाही ? "
बापूनी उत्तर दिले "कोट पहिला पण अकलेची मजबुती फारच कमी दिसली "
. श्रीमंत म्हणाले "का" ?बापू म्हणाले" कोटाचा उपयोग शत्रू जवळ आल्यावर .. पण जो राजा शे- दोनशे कोसावर शत्रू आहे तोच त्यावर नजर ठेऊन बंदोबस्त करतो तो शहाणा,
कोटा पर्यंत शत्रू न येऊ देणे हे कोणते लक्षण मानावे ?"श्रीमंतांच्या लक्षात चूक आली. कोटाचे काम बंद पडले .
कोटाच्या खुणा पुण्याच्या काही भागात पाहावयास मिळत होत्या पण आता या पिढीस दिसणार नाहीत.
नारायणरावाच्या कारकीर्दीत सर्व राज्यकारभार हाच पाहूं लागला. सखाराम बापू राघोबाबरोबर निजामावरील स्वारींत गेला होता, परंतु कांहीं तरी निमित्तानें हा स्वारींतून निघाला व" बारभाईच्या कारस्थानांत" सामील झाला . (१७७४). याचें दरबारांतील वजन जाणून नानाफडणिसानें राज्यकारभाराचा मुख्य अधिकारी याजकडेच सोंपविला होता (१७७४).नारायणराव पेशव्याचा खून करविण्यांत याचें अंगें नव्हतें

माधवराव पेशव्यांना दिलेले वचन आपण पळू शकलो नाही याचे दुःख वाटून "आपणास मरण येईल ते बरे "असे उद्गार त्यांनी काढले .
नाना फडणवीसांच्या सांगण्यावरून बालाजी पंत ठोसर यांनी वटेश्वर समोरील आज जेथे कस्तुरबा गांधी आश्रम आहे तेथे असलेल्या सखाराम बापू बोकीलांचचा वाडा खणून काढला हिवरे व सासवड येथील वाड्यांमधून नाना फडणविसाने ५० लाखाची संपत्ती त्यात सोने मोहोर यांचीच किंमत ३० लाहक होती १३उंटाच्या पाठीवरून गोण्यात लादून उंची भरजरी कापडाच्या गाठीशी लादून नेल्या
वडगांवच्या तहानंतर नानाफडणिसानें सखारामबापूस कैद करून सिंहगडावर पाठविलें (१७७९). येथून त्याची पुढें उचलबांगडी होऊन त्याला प्रतापगडावर नेण्यांत आलें. त्यानें पळून जाऊं नये किंवा बंड करूं नये म्हणून, त्याची अटकेची जागा याप्रमाणें वेळोवेळीं बदलण्यांत येत होती

नगरच्या किल्ल्यात बापुना ठेवले असता त्यांनी एक चिट्ठी नाना फडणवीसांना देण्यासाठी दिली कि 'शिंद्यांकरवी तुम्ही माझा जसा शेवट केलात तसा शेवट शिंदे तुमचा शेवट करतील . तुम्हीही याच किल्ल्यात कैदी म्हणून याला . बोकिलांची भविष्यवाणी खरी ठरली १७९८ मध्ये नाना फडणवीसांना जेंव्हा बंदिवास प्राप्त झाला तेंव्हा किल्लेदाराने हि चिट्ठी नानांना दिली नानास रडू कोसळले .
शेवटीं रायगड किल्ल्यावर अटकेंत बापुना अतिसाराच्या विकाराने २ ऑगस्ट १७८१ रोजी वयाच्या ६५ वर्षी मरण पावले नानांना चहा पिण्याची सवय होती . हे व्यसन बहुदा मॉस्टिन, ऍप्टोन या इंग्रजांच्या सहवासाने लागले असावे . रायगड येथे बापूंच्या खोलीत चार पौंड चहा ,चहादानी, अशा वस्तू सापडल्या बापू रोज संध्याकाळी सासवड मधील वटेश्वराचे दर्शनघेऊन कऱ्हेकाठी संध्यायात ५ ते ७वेळ घालवीत असत . संध्याकाळी सखाराम बापू बोकिलांची आठवण वटेश्वर मन्दिराच्या आवारात गेल्यावर हटकून होते .
मराठी दौलतीच्या रक्षणासाठी डोळ्यात तेल घालून जगात पहारा करण्यस्वा हि मराठी सल्तनत राखण्याचे कऱ्हे पठाराच्या या सुपुत्राचा महत्वाचा हातभार लागला याचा सर्व सासवड कारांना सार्थ आभिमान आहे

No comments:
Post a Comment