postsaambhar :Udaykumar Jagtap
महादजी विसाजी हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची वतनदारी वंशपरंपरेने चालत आली होती.
ही शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार ही १४७८ च्या सुमारास मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथाचे वडील व आजोबा शिवाजीच्या सेवेत असावेत असेही रियासतकार म्हणातात. १५७५ च्या सुमारास महादजीकडे ही परंपरागत वतनदारी होती.बाळाजी विश्वनाथाचा जन्म १६६२ मध्ये श्रीवर्धन रायगड येथे झालेला होता
बाळाजीस मोडी वाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांचे शिक्षण मिळाले. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्याशी त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे संभाजीच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली, त्यामुळे बाळाजीला श्रीवर्धन सोडावे लागले.
त्यातच भट घराणे आंग्ऱ्यांना सामील आहे या संशयाने सिद्देने भट घराण्याचा छळ चालू केला. .
.बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणून आपल्या सेवेस घेतले.
. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळून सगळे अनुभवत होता. १७०५ च्या दरम्यान त्याने देखील आपली समशेर गाजवली.ती बहुतेक जास्तच परजली असावी, कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली.
आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखील मिळाली.
या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे -
"श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"
छत्रपती राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले गेले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. विशाळगडासाठी तर बाळाजी विश्वनाथाने तहात त्या काळी २ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये संताजी धनाजी बरोबर राजगड व तोरणा घेतला.
१७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणून प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडित" म्हणजेच बाळाजी गेला होता
. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कमी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्यासंबधीचे पत्र त्याने "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहिलेले आढळते
.२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. ही बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहूंची सुटका केली. मात्र येसूबाईंना त्याने कैदेतच ठेवले.
धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आणि नारो राम यांनी शाहूंचा पक्ष बरोबर असून त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहूंच्या बाजूने गेले.
शाहूंनी बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणून नेमले आणि' सेनाकर्ते' असा किताबही दिला..
राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहूंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजू शकतील हे आंग्ऱ्यांना बाळाजीनेच पटवून त्यांना शाहूंच्या पक्षात आणले.
त्यांनी सय्यदबंधूंबरोबर तह घडवून आणला, मग त्यांच्याच साहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करून रफिउद्दौरजात याला गादीवर बसवले.
याच तहानुसार बाळाजींनी शाहूच्या पत्नींची सुटका करवून घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडू नये म्हणून बाळाजीने केलेली राजकारणे भल्याभल्यांची मती गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्दसामर्थ्यावर घडवून आणले होते हे महत्त्वाचे.
१७०७पासून पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले.
पेशवेपद प्राप्त झाल्यानंतर बाळाजी विश्वनाथ( भट ) पेशवे सासवड मध्ये राहू लागले ." पेटीचा वाडा" म्हणून तो प्रसिद्ध आहे . हा वाडा श्री. श्री . दत्तात्रय पांडुरंग जगताप यांच्या वाड्या शेजारी बाळाजी विश्वनाथ पेशवा यांचा वाडा आहे.
त्यांची दोन मुले (१ )दिल्ली दरवाजाकडे ज्याने आपला घोडा सतत फेकला व शत्रूस दे माय धरणी ठाय करून सोडले. त्या राणबहादूर" बाजीराव पेशवे" (२) व त्यांचे बंधू जिद्दीने वसई सर राहणाऱ्या रणशार्दुलचे " चिमाजी आप्पा" यांचे बालपण याच वाड्यात गेले आह
बाळाजी विश्वनाथाना दोन मुलीही होत्या भिऊबाई आणि अनुबाई . .
पेशवाईचा सर्व राज्यकारभार सासवड मधून सुरु झाला .आज जेथे ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची इमारत आहे तेथे पेशवांचे दफ्तरग्रह होते .पूर्वी येथे प्राथमिक शाळा भारत होती तिचे नाव "" काळी शाळा"' होते . मराठ्यांची एकेकाळची राजधानी सासवड होती . सासवड चा बराचसा विस्तार बाळाजी पेशवे यांनी केलेला होता .
अशा या थोर मुत्सद्दी चतुर राज्य कर्त्या पेशव्याचे देहावसान सासवड येथे २ एप्रिल १७२० साली सासवड झाले . यांची समाधी कऱ्हेच्या काठावरती असून हा पेशवा चिरनिद्रा घेत आहे




No comments:
Post a Comment