विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 25 July 2020

मराठे सरदारांच्या राजमुद्रा व छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान..



मराठे सरदारांच्या राजमुद्रा व छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान..
छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत प्रतिनिधी,प्रधान,सरदार, आपला शिक्का करण्यापूर्वी त्यांच्या मुद्रेत छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला अग्रक्रमाचे स्थान असे. त्याचा तपशील खालील प्रमाणे..
१)श्री शाहू नृपतिप्रित्या तुकोजी तनु जन्मन:|| कान्होजी सरखेलस्य मुद्रा जयती सर्वदा || आकार लंब वर्तुळाकार.
२)श्री शंकर श्री शाहू छत्रपती कृपानिधी | प्रल्हादसुत गदाधर प्रतिनिधी - आकार लंब वर्तुळाकार.
३) श्री राजा शाहू चरणी तत्पर | बाबाजी भांडवलकर (हवालदार) - आकार वर्तुळाकृती.
४)श्री शाहू नरपती निधान, मोरेश्वरसूत माधवराव (सुभेदार) - आकार लंब वर्तुळाकार.
५)श्री राजा श्री ||श्री आई आदिपुरुष|| श्री राजा छत्रपती स्वामी कृपानिधी तस्य श्रीनिवास,परशराम प्रतिनिधी| - आकार अष्टकोणी.
६)स्वस्ती श्री सुखदा मुद्रा प्रतापोत्कार्षे वर्धिनी | सरदेशमुख स्यैए शाहू राजस्य जायते (सरदेशमुख) आकार - चौकोनी.
७)श्री राजा शाहू नरपती हर्षनिधान + बाळाजी बाजीराव प्रधान - आकार पिंपळपानी.
८) श्री श्री आई आदिपुरुष - श्री राजा शाहू छत्रपती स्वामी कृपानिधी तस्य श्रीनिवास, परशुराम प्रतिनिधी. - आकार लंबवर्तुळाकार.
९)श्री राजा शाहू चरणी तत्पर| फत्तेसिंह भोसले राजकूमर ।
१०)श्री शाहू चरणी तत्पर सरदार बाळोजी साळोखे-डुबल निरंतर
११)श्री राजा शाहूचरणी तत्पर माहादाजी यादव निरंतर..
१२)श्री राजा शाहू छत्रपती चरणी तत्पर उदाजी आटोळे निरंतर..
१३)श्री राजा शाहू नरपती हर्ष निधान माधवराव नारायण मुख्य प्रधान.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...