विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 25 July 2020

छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा शहरात केलेल्या पाण्याच्या सोयी -




छत्रपती शाहू महाराज यांनी
सातारा शहरात केलेल्या पाण्याच्या सोयी -

रवि पार्वती शिवाजी मोरे



1)पिण्याच्या पाण्याची सोय - नवीन शाहू नगरीच्या जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी सातारा शहराच्या पश्चिमेकडील डोंगरावर यवतेश्वराच्या पूर्व व उतरणी वरील पाण्याचे झरे एकत्र करुन खापरी नळाद्वारे पाणी शहरात आणले व ठिकठिकाणी पाण्याचे दगडी हौद बांधून त्यात पाणी सोडले तसेच खापरी नळाद्वारे पाणी रंगमहाल राजवाडा व अदालतवाडा या ठिकाणी आणले . छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या दगडी हौदापैकी एक हौद मंगळवार पेठेत आहे व दुसरा तख्ताचा वाड्याच्या पश्चिमेस शनिवार पेठेत जोड हौद बांधण्यात आला होता . तिसरा हौद नातु वाड्यापुढे बांधला होता .
2) बाजीरावाची विहीर - शुक्रवार पेठेत एक मोठी विहीर बांधली होती . तिची खोली 100 फुट असुन आकार शंकराच्या पिंडी प्रमाणे आहे . विहीरीत थेट पाण्याच्या खालच्या पातळी पर्यंत जाण्यासाठी लांब व रूंद दगडी पायर्या असुन त्यावर सुरेख दगडी कमानी उभारण्यात आल्या आहेत . ही बारव अद्यापही सुस्थितीत आहे . या विहीरीतुन शुक्रवार पेठेतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली होती .
3) मंगळवार तळे - मंगळवार पेठेत श्रीपतराव पंत प्रतिनिधिंनी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी खुप मोठा तलाव खोदला त्यास श्रीपतरावचे तळे असेही नाव होते .
4) बनसापुरी गोसाव्याची विहीर - महादर्याच्या बाजुस बनसापुरी गोसाव्याच्या मठात एक विहीर होती . त्या विहीरीस भरपूर पाणी होते . उन्हाळ्यात मंगळवार तळ्यातील पाणी आटल्यास या विहीरीतुन मोटाने बाहेर काढलेले पाणी खापरी नळाद्वारे मंगळवार तळ्यात आणण्याची सोय करण्यात आली होती . त्या मुळे उन्हाळ्यातही पाण्याची कमतरता भासत नसे .
5) तख्ताच्या वाड्याची विहीर - तख्ताच्या वाड्यात व शेजारी बांधलेल्या सरदार नोकर चाकरांच्या वापरासाठी विहीर काढण्यात आली होती .
क्रमशः
#शाहुपर्व
#जागर_इतिहासाचा
फोटो - 1) मंगळवार तळे
2) फुटके तळे
3) तख्ताची विहीर
4) छत्रपती थोरले शाहू महाराज

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...