साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. साहुकराकरिता राज्य अबदान होते.न मिळे वस्तुजात राज्यात येते. राज्य श्रीमंत होते. पडिले संकट परिहार होते. साहुकारांच्या संरक्षणामध्ये बहुत फायदा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवर छोटेखानी ग्रंथ असलेल्या आज्ञापत्रातील ही वाक्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सावकार आणि व्यापार याविषयाचे धोरण स्पष्ट करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा दृष्टिकोण समोर ठेऊन छत्रपती थोरले शाहू महाराज यांनीही पाऊले उचलेले दिसतात.
व्यापारी आणि सावकार लोकांना जोखमीचा व्यवहार करताना सुरक्षित राज्यकारभाराचे पाठबळ असणे आवश्यक असते आणि ते छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी त्यांना दिलेले दिसते. सावकरांनी आपल्या राजाधानीतच येऊन सावकारीचा व्यवहार करावा म्हणून त्यांना प्रोत्साहनपर पत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी लिहलेले आहे. त्याचा आशय असा की -
" मनोहरदास सावकार वसती सूरत यांस दिल्हे अभयपत्र ऐसे जे - तुम्ही साताऱ्यास येऊन सावकारी करावी ऐसी उमेद धरून भवानीशंकर व मेहेरमहंमद यांची हुजूर येवून विदित केले. ऐशास तुम्हास सावकार लोकांचा संग्रह करावा. हे स्वामीस अगत्य आहे. तरी कोणी विशी शंका न धरिता येथे सावकारी व्यवसाय करून सुखरूप रहाणे, कोण बाबे आजार लागणार नाही " (१९ मे १७२५)
या पत्रावरुन असे समजते की छत्रपती थोरले शाहू महाराजांना सातारा राजधानी वैभवसंपन्न करावी अशी इच्छा होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जापत राज्यकारभार, राज्याची प्रगती आणि सुधारणा याचा दूरदृष्टीकोण छत्रपती थोरले शाहू महाराज जपत होते याचेच हे उदाहरण..
#जागर_इतिहासाचा
#शाहूपर्व

No comments:
Post a Comment