## चांगा वटेश्वर ##
रम्य करा मूर्त शंभू ।सासवडी हा स्वयंभू ।।
सासवड किल्ले पुरंदर रस्त्यावरील एक रमणीय, पुराण सिद्ध, पुरातन,
आल्हादायक परिसरात प्राचीन अप्रतिम शिलाची साक्ष देत असलेले मंदिर.हे मंदिर
स्वयंभू शंकराची तपोभूमी आहे.
जे चरणांबुज अंकुरले या ।
अखिल चराचर-रुचिराभरण ।
स्वयंभू जागृत लिंग निरकृत ।
सिद्ध कऱ्हातटी पतितो द्वरणा ।
संत सोपानदेवांच्या समाधी प्रसंगी देवांनी महोत्सव करून मस्तकी अभयंकर ठेऊनसोपानदेवास सांगितले .
तू ते ना भी विसंबे ।
संवत्सरी असें स्वयंभे ।।
वटेश्वरी प्रतिभे प्रतिवर्षी भेटी देईन ।।
सिद्ध साधकाचे स्थळ।
हा वटेश्वर प्रतीमुळं ।।
यासी म्हणे सोज्वळ|
नीलकंठ प्रथम नाम ।।
प्रचिनकाळी हि सिद्ध साधकांची तपोभूमी होती . याचस्थळी ब्रह्मदेवाने
श्री शंकराची आराधना केली .गहन तपाने संतुष्ट होऊन कैलासपती त्यास प्रसन्न
झाले .
महातिर्थे व्रत दैवते ।
ब्रह्म झाला निर्मिते ते स्थळ ।।
ज्ञानेश्वरांपासून ते सर्व संतांनी जागृत महादेवांच्या तपोभूमीतच समाध्या
घेतल्या आहेत . सोपानदेव महाराजांनीही सासवड स्थळी समाधी घेऊन या
महादेवांच्या जागृत स्थळांना अबाधित व चिरस्मरणीय केले आहे.
जे रम्य स्थान सोपानसमाधीपाशी ।
भगवान स्वयंभू तुल्य आत्मरुपाशी|
जे पवित्र स्थळ ते कऱ्हा बाईचे काठी|
तेथे तप करिता होय जिवाशिवा भेटी ।।
किती भाग्य कथावे तेथील ग्रामस्थांचे ।
सानिध्य लाभले स्थानची गिराजेशाचे ।।
हे पुण्यस्थान पाहूनच सोपानदेवांनी सासवडी समाधी घेतली आहे श्री क्षेत्र सासवड हे माहात्म्यपूर्ण आहे .याची पुरेपूर खात्री व ग्वाही समकालीन संतांनी त्यांच्या अभंगाद्वारे वेळोवेळी उद्धृत केली आहे .
धान्य कऱ्हेचे पठारी।
इंद्रनील पर्वत महागिरी ।
जैसे अलंकापुरी ।
तैसे पुण्य क्षेत्र हे ।
ऐसे अनुमानिलें स्थळ ।
पूर्वापार निर्मळ ।
सिद्धी पाववी आळ ।
माय बाप ।।
मग सुमुहूर्त अमृतयोग|
सिद्ध संकेत ज्ञानमार्ग ।।
पहिला चंद्र स्वाग ।
गमन केले योगीराजे ।।
निवृत्ती सोपान मुक्ताई ।
अलंकापुरीहून आले पाही ।।
मृदूंग वाजते घाई ।
कीर्तन नवाईकाय सांगू ।।
समाधी सावधान।
सुखी ज्ञानेश्वर निधाज ।।
झाला पास्थिर सोपान ।
भेटीलागी ।।
संत नामदेव हे स्थान प्राचीन असल्याचे त्यांच्या अभंगातून सांगतात प्रत्यक्ष भगवान शंकर म्हणतात
वटेश्वरे वृत्तांत सांगितला सकळ ।
पूर्वी आमुचे थळ याची क्षेत्री ।।
येथूनि वाट जातसे पाताळा ।
उघडली शिळा समाधीची ।।
असं मनोहर मृग छलावर ।
पाहती ऋषेश्वर आनंदाने ।।
सोपान वटेश्वर करती एकांत ।
कळले मनोगत नामा म्हणे ।।
हे ठिकाण सर्प ,नाग ,जंगलाने वेढलेले होते त्यामुळे येथे येण्याचे कोणी धाडस करीत न्हवते." उटगीकर 'महाराजांनी या दुरावलेल्या स्थळाचा उत्कर्ष केला व वटेश्वर सूर्याच्या प्रकाशात उजळून निघाले .
मग शिवदेवाला स्मरण जे झाले ।
कशी इ क्ष प्रेरणा होऊनिया त्यावेळे ।
महाराज साधू उटगीकर त्याच स्थळी गेले ।
ते रम्य स्थान मग त्वरित सुशोभित करुनि ।
तो कैलाससेश्वर जागृत केला त्यांनी ।
मग रीघ लागली भाविक भक्तजनांची ।
किती कार्ये झाली अज्ञमूढ जीवांची ।
या वटेश्वराजवळ एक" पापहारक' तीर्थकुंड आहे . हे तीर्थकुंड नदी पात्रात असून कऱ्हामाईने वटेश्वरास उजव्या बाजूने प्रदक्षणा घातली आहे .
श्री स्वयंभू शंभूलिंग जे वटेश्वर|
नाती दूर जवळची ते स्थळ कऱ्हेवर ।
कुंड तेथे एक पाप-हार शुभंकर ।
स्फूर्तीच दे मूर्तिमंत भक्तमंडळा ।।
वटेश्वराचे पूर्वी नाव" नीलकंठ "असावे असे वाटते . कारण एक अभंगात खालील उल्लेख आढळतो
महासिद्ध साधकाचे स्थळ ।
तो हा वटेश्वर सानुकूळ ।।
यासी निळकंठ म्हणती सुचळ अचळ ।
शीतल प्रथम नाम ।।
ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले चांगदेव महाराज हे महान योगीराज
परिसरात राहिले वाढले .आयुष्यातील बराच काळ श्री वटेश्वराच्या सानिध्यात
गेला. श्री चांगदेवांचे आई वडील लहानपणीच निवर्तले त्याचे पालन पोषण या
वटेश्वराने केले.
चांगा जन्माला माध्यान काळी ।
मायबापें दोन्ही नाहीशी झाली . ।।
मुळीच चांगा नाहीसा झाला ।
मुक्ताई म्हणे चांगया भला भला ।।
वटेश्वर चांगा मुळी लागला ।
पोषण घेतला मुक्ताईने ।
श्री चांगदेवांनी तपश्यर्या केली तीर्थाटन केली ते योगविशारद झाले मुक्ताईने त्यांना दीक्षा दिली.
वटेश्वरी चांगी जिव्हाळा ।
सोहं शब्द राहिला ।
वटेश्वरी दीक्षा घेतल्यानंतर चांगदेव ब्रम्हविद्या संपन्न साधू पुरुष बनले.
चांगावटेश्वररूप झाला वटेश्वरी चांगा अवघाचि आहे . ।
आवघेनशी पाहे वटेश्वरी ।।
शेवटी चांगा सोयधारी ज्ञान वटेश्वर ।
मुक्ताई जिव्हारी बोध करी ।।
अशारितीने चांगदेव वटेश्वराशी इतके एकरूप झाले कि हे स्थळ चांगा वटेश्वर या नावाने प्रचलित व प्रसिद्ध झाले व आजही याच नावाने ते प्रसिद्ध आहे . आशा या चांग वटेश्वरास भेटणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून उद्गार निघतात.
पुनित धन्य धन्य ते सासवड ग्राम |
प्रगटे जेथे वटेश्वर पावन ।
सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांच्या नावे मंदिर व परिसराची जागा आहे .
"वटेश्वर सुधार समिती "या नवे एका समितीने अनेक वर्ष या वटेश्वराची सेवा
केली आहे.
या समितीत श्री. परशुराम अरविंद जगताप ,नितीन कृष्णराव
जाधव ,प्रसाद बापूसाहेब जगताप ,शशांक मधुकर जगताप, धनंजय गाडेकर,विशाल
जंगम, बाळासाहेब चव्हाण, संजय चव्हाण, संजय वांढेकर, अमित सांबरे,अक्षय
बेलसरे ,अमित केसकर,सोमनाथ शिळीमकर, रोहन जगदाळे या व्यक्तींचे मनापासून
आभार.
आणखी एका व्यक्तीचे नाव आवर्जून घेतले पाहिजे कि ज्या
व्यक्तीने आपले तन,मन,धन व वटेश्वराला अर्पिले आहे त्याच नाव श्री सुनील
सोपान कामथे . . . . . .
या मंदिराची देखभाल पूजा-अर्चा ,वडस्कर घराणे पूर्वीपासून पाहत आले होते .
या वटेश्वराच्या कऱ्हा तीरी सरदार सखाराम बापू बोकील यांनी सुंदर घाट
बांधला असून .बोकील हे जेंव्हा जेंव्हा सासवडमध्ये मुक्कामास होते तेंव्हा
तेंव्हा संध्याकाळी ५ ते ७ या काळात वटेश्वर मंदिर परिसरात घालवत असत
.या घाटावर अर्ध्य देत असत .
वटेश्वरास संध्याकाळी घाटावर बसल्या नंतर सखाराम बापू बोकिलांची आठवण
आल्याशिवाय राहत नाही .घाटावरून मागे वळून बघितल्या नंतर त्यांच्या
वाड्याच्या भिंतीचे दगड दिसतात आजही संध्याकाळी सखाराम बापू बोकील यांची
वाट बघत असतील काय ?





No comments:
Post a Comment