विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 21 July 2020

## सरदार माणकोजी जगताप ## म्हणजेच ## संत माणकोजी बोधले महाराज ##








## सरदार माणकोजी जगताप ## म्हणजेच ## संत माणकोजी बोधले महाराज ##
postsaambhar :Udaykumar Jagtap
सासवड मधील सरदार भानजीराव जगताप हे आपल्या कुलदेवी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात असताना त्यांचा मुक्काम बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला या गावी पडला . त्यांच्या बरोबर ५०० घोडेस्वार होते . मुक्कामी असताना धामणगावी त्यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला त्याचे नाव" माणकोजी "सन १६०४ मध्ये माणकोजी यांचा जन्म झाला . त्यांनी याच गावी राहण्याचा निश्चय केला त्या गावची पाटीलकी मिळवली .सरदेशमुखी हि मिळाली . भानजीराव जगताप याना शिवाजी हा थोरला मुलगा होता . पुढे चोराखळीस शिवाजी जगताप रहावंयास गेला. त्याचा वंश चोराखाली ,डिकसळ ,येरमाळा ,या गावांमध्ये वाढला . ते पांडुरंगाचे भक्त असल्याने पुढे वारकी झाले.माणकोजी धनुर्विद्येत प्रवीण होते पुढे त्यांना उपरती होऊन ते वारी करू लागले माणकोजी जगताप यांची १५ दिवसांची पंढरपूरची वारी होती पहिल्या भेटीतच त्यांना पांडुरंगाने त्यांना" बोध "केला पांडुरंगाचा साक्षात्कार झाला.
विठूच्या एकांती बोधिले । म्हणू जगींनाव बोधले म्हणे तू मज बोधिले ।। आवडीने ठेवले नाम माझे ।।
माणकोजी जगताप यांचे नाव माणकोजी बोधले झाले. संत माणकोजी बोधले यांनी आगळा वेगळा परमार्थ न मांडता समाजात मिसळून जगोद्धार केला. उत्तमापासून ते अंत्यजांपर्यंत सर्वाना एका पातळीत आणले .
बोधला म्हणे जगलो । जीव प्राणासी हा बांधलो ।। आतासोडिता न्हावेंसी भालारे । कोन्होबा पूर्वीची भाक सांभाळी ।|
एकदा मानकोजींना जीवनात मोठा दुष्काळ अनुभवायास मिळाला . महाराष्ट्रात दुष्काळ पडला . गुरेढोरे मारू लागली मग "सर्व भूती द्यावे अन्न "या संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे आपल्या सर्व संसाराचे त्यांनी दान केले . पेवे लुटवले ,संतांनी खरेतर त्यांचे महत्व वाढावे यासाठी चमत्कार केलेले नाहीत तर त्यांची ती सहज वृत्ती होती .
तुमच्या सहज स्थिती । निर्जीव चालवली भिंती ।।
संत माणकोजी हे कळवल्याच्या जातीतले असल्याने त्यांना समाजाचा कळवळा होता . म्हणून तर प्रत्यक्ष पांडुरंगास या भक्तासाठी" वाळवंटात अन्न शिजवावे लागले ,पांनगे करावे लागले,कीर्तनात मेलेले माणूस जिवंत करावे लागले ,भोपळ्यात गहू दाखवावे लागले . "पुढे राहे सांभाळीत "माणकोजी महाराज पंढरीच्या वारीचा नेम संभाळण्याकरिता उभे पीक टाकून वारीस निघून गेले . त्यांच्या पिकांची राखण पांडुरंगास करावी लागली .
भक्तासाठी तू जगजेठी बसून माळ्यावर । पाखरे उडवी सारंगधर ।। संत माणकोजी बोधले यांची वंश परंपरा धामणगाव दुमाला येथे वाढली आहे .माणकोजी महाराजांना तीन पुत्र झाले लाखमोजी,यमाजी,विठोजी या तिघांची वंश परंपरा चालू आहे . महाराजांची शाखा वाकावं,बोरगाव,पिंपळगाव, वडापुरी ,श्री क्षेत्र पंढरपूर येथे आहे . संत माणकोजी बोधले (जगताप)हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते .महाराजांचा संपूर्ण काळ हा १६०४ ते १६९४ असा होता . त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा २५ अध्याय व ५२२४ ओव्या असलेला ग्रंथ आहे याचे नाव "बोधलीलांबरी " हा ग्रंथ १७७४ मध्ये शिवराम यांनी लिहिलेला असून . गुरु गुंडाराज व लखमोजींचे वंशज तुकाराम या यांच्या साक्षीने व विचाराने लिहिला आहे . . माणकोजी महाराज यांनी १६९४ जेष्ठ वद्य ३ गुरुवारी उत्तरायणात संजीवन समाधी घेतली . ज्ञानदेवांनी संस्कृतचे गहणे । मोडोनिया शब्द सोपाने । रचिली निधाने । श्री निवृत्ती देवे ।। अशी शब्द सोपाने सर्व सामान्यांना खुली केली आणि मग सर्व ईश्वर निष्ठांची महाराष्ट्रात अवतार घेण्याची परंपरा सुरु झालेली दिसते आहे .
पांडुरंगाने पंढरपूरला त्याच्या मंदिरातील ओवरीत स्थान दिलेला हा संत माणकोजी बोधले (जगताप) सासवडचे मुळचे होते .या पेक्षा अभिमानाची गोष्ट सासवडकर वासियांना दुसरी काय असू शकते ?

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...