' पेशवा ' हा परकीय भाषेतील शब्द आहे , या मातीशी त्याचा संबंध मुसलमानी आक्रमणातून आला .
दिल्लीच्या बादशाहीत अथवा दक्षिणेत प्रथम बहामनी पातशाहीत ' पेशवा ' या नावाचे सहावे पद सांगितले आहे . मुसलमानी शाह्यातून मुसलमानीच असलेला हा ' पेशवा ' वरिष्ठ अधिकारी नाही , तेथे दिवाण , वजीर वरिष्ठ आहेत . या ' पेशवे ' पदास अंमलबजावणीचा अधिकार नव्हता .
मुसलमानी राज्यात ' पेशवे ' होते त्याचप्रमाणे देशमुख , देसाई , देवसंस्थाने याजकडेही ' पेशवे ' होते .
शिवकालात ' पेशवा ' हा शब्द अथवा पद कारभारात नव्हते . अमात्य रामचंद्र पंडितांनी ' सरकारकून ' या शब्दाला प्राधान्य देऊनच सर्व विवेचन केले आहे . स्वत: शिवरायांनी ' सरकारकून 'असाच शब्दप्रयोग सर्वत्र केला आहे .
इतिहासकालीन प्रधानांच्या ज्या मुद्रा आहेत त्यात सर्वत्र ' प्रधान ' हीच संज्ञा आली आहे . आणि ज्या ' पेशवा ' ह्या शब्दाच्या जागी ही ' प्रधान ' संज्ञा आहे तो ' पेशवा' शब्द मुद्रातून कोठेच नाही .
मुसलमानी अंमलात सहावे पद असणारा , देशमुख , देसाई यांच्या संस्थानात व इतर देवसंस्थानात काम करणारा , अंमलबजावणीचे अधिकार नसलेला , ' पेशवा' , शिवकाळातील 'सरकारकून ' पुढे ' पेशवा ' , ' प्रधान ' राज्यकारभार प्रमुख कसा झाला , व त्या कालखंडाला ' पेशवाई ' , स्वत: राजा नसताना , का संबोधले जाऊ लागले हे स्पष्ट आहे .

No comments:
Post a Comment