छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रम आणि राजनीतीने पोर्तुगीजांवर आपला दरारा आणि वचक बसवला होता हे सर्वश्रुत आहे तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांचाही दबदबा पोर्तुगीजांवर होता याच्या काही नोंदी आहेत. नोव्हेंबर १७३० साली पोर्तुगीज व्हाईसरॉयने मोगल दरबारातील पोर्तुगीज वकिलाला पत्र लिहून काही सुचना केल्या होत्या या पत्रातील नोंदीचा सारांश असा -
"शाहूराजे इतके बलाढ्य झाले आहेत की त्यांच्यापासून बादशाहच्या साम्राज्याला धोका निर्माण झाला आहे. फक्त पोर्तुगीजांनीच तेवढा त्यांच्याशी तह केलेला नाही, कारण शाहूराजे हे बादशाहचे शत्रु आहेत हे पोर्तुगीजांना माहीत आहे. मराठे दरवर्षी पोर्तुगीजांच्या प्रदेशात आक्रमण करतात ते जर शिरजोर झाले तर अजिंक्य झाल्यावाचून राहणार नाहीत कारण त्यांच्यापाशी बरेच गड आणि किल्ले आहेत "
वरील पत्रातील ही नोंद पाहता छत्रपती थोरले शाहू महाराजांनी मोगलांबरोबर परकीय सत्ताविरूद्ध ही आपला दबदबा आणि वचक बसवलेली दिसते ...
◆ संदर्भ - १) मराठ्यांची इतिहासाची साधने पोर्तुगीज दप्तर - खंड तिसरा - स. शं. देसाई
२) पोर्तुगीज - मराठा संबंध
२) पोर्तुगीज - मराठा संबंध

No comments:
Post a Comment