विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 25 July 2020

सुभेदार मल्हारराव होळकर यांची समाधी

सुभेदार मल्हारराव होळकर यांची समाधी
पेशवे पहिले चार,
जुना सरदार जिणे झुंजार !!
चढी सुरवार खडी तलवार,
आलमपुरी करतो छत्र विहार !!
आत्माराम गातो जय मल्हार !
आपल्या संपूर्ण हयातीत मल्हाररावांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य आणि शाहू महाराजांनी त्याचे साम्राज्यात केलेले रूपांतर आणि हेच साम्राज्य निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठा साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठा साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.

मराठा साम्राज्याच्या या उत्तरेच्या बुरुजाला विनम्र अभिवादन !!!

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...