saambhar :📷
Udaykumar Jagtap
थोरल्या बाजीरावांची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या सेनानींनीं आपले आयुष्य खर्ची घातले झिजवले त्यात विठ्ठल शिवदेव यांचे एक वेगळे व्यक्तिमत्व इतिहासाला परिचित आहे . शिवदेव यांच्या जडणघडणीचे शिल्पकार पहिले बाजीरावच म्हणले पाहिजे .
विंचूरकर हे नाव त्यांना नाशिक जिल्ह्यातील लासलगाव जवळील एका छोट्याश्या गावावरून पडले आहे . पण खरे पाहता विंचूरकर हे मूळचे सासवड चे असून त्यांचा वाडा आजही सासवड मध्ये उभा आहे
. ते सासवड चे" दाणी "होते . म्हणजे पूर्वीपासून मराठीशाहीच्या काळात प्रत्येकास त्याच्या कर्तृत्व प्रमाणे इनाम, पदके,पद्व्व्या बक्षिसे देण्याची प्रथा होती. अशा प्रकारचे पद ते अभिमानाने वापरात असत . तेंव्हा सासवडच्या धान्य बाजारात धान्याचा नमुना म्हणून काही भाग घेण्याचा अधिकार विठ्ठल शिवदेव यांच्या वंशजांना होता . कालांतराने त्याचे नाव" दाणी" या नावानेच प्रसिद्धीस आले .
पुढे हे घराणे विंचूरला स्थायिक झाले . विठ्ठल शिवदेव यास लहानपणी मेढ्यास (मेंढा -जिल्हा सातारा )अमृतस्वामींच्या सेवेसाठी ठेवण्यात आले होते . विठ्ठल शिवदेव मध्यम उंचीचा पण बळकट शरीरयष्टीचा होता ते "अजानुबाहू "होते . त्याचे हात हे गुडघ्याच्या खालपर्यंत होते . घोडदौड आणि खेळांमध्ये विशेष आवड होती . शरीरयष्टी पिळदार आणि दणकट होती
. बक्षी नावाच्या एका शाहू महाराजांच्या चाकरीस असलेल्या सेवकाने त्यांना घोड्यांची देखभाल करण्यासाठी ठेवले . छत्रपती शाहूंना शिकारीचा नाद होता . एक दिवस रानडुकराची शिकार करताना महाराजांनी व त्यांच्या सहकार्यांनी एका रानडुकरास घेरले. रानडुक्कर सुटून जाण्याच्या तयारीत असताना विजेच्या चपळाईने विठ्ठल शिवदेव ने रानडुकरावर झडप घातली. आपल्या पायांमध्ये रानडुकराला पकडले आणि त्याचे कांन घट्ट पकडले . हे पाहून शाहू महाराज खुश झाले . त्यांनी आपल्या लष्करात भरती करून त्यांच्या हाताखालील १० घोडेस्वारांचे प्रमुख केले. वय होत अवघा २१. वर्ष . विठ्ठल शिवदेव यांनी केंजळ तालुका -वाईयेथील कुलकर्णी यांच्या मुलीशी विवाह बद्ध झाले व पेशवे दरबारी रुजू झाले .
सन १७२९ मध्ये बुंदेलखंडाचा राजपूत राजा छत्रसाल याने मोगलांचे वर्चस्व झुगारूनदिल्याने त्याचा पाडाव करून त्याच्या ताब्यातील प्रदेश आपल्या अमलाखाली आणावा व महत्वाकांक्षेने मागाल बादशाह मुहम्मदशाह याने आपला अलाहाबादचा सरदार मुहम्मद शाह बंगश याला चाल करून जाण्यास सांगितले . छत्रसालाच्या हे लक्षात आल्याने त्याने बाजीराव पेशव्यांना मदतीसाठी व मोगल बादशहास अद्दल घडवण्याच्या उद्देशाने बाजीराव पेशव्यांनी मदतीचा हात देण्याचे ठरवले . बाजीराव पेशव्यांनी विठ्ठल शिवदेव ,मल्हारराव होळकर , अशा मुख्य व पराक्रमी सरदारांना बरोबर घेऊन १२ मार्च १७२९ रोजी बंगशचा पराभव केला त्यावेळी विठ्ठल शिवदेव यांनी खूप तलवार गाजवल्याचे निदर्शनास येते
. सन १७५६ मध्ये अहमदशाह अब्दाली याचे भारतात आगमन झाले व तो परत गेल्याने पेशव्यांचे दिल्ली दरबारातील महत्व कमी झाले होते बादशाह आलमगीर ऐकेनासा झाला यासाठी राघोबादादा यास वित्तल शिवदेव याना बरोबर देऊनउत्तरेकडे पाठवले सन १७५७ मध्ये दिल्ली काबीज करण्याचे अवघड व जोखमीचे काम विठ्ठल शिवदेव सेनापती यांच्याकडेसुपूर्द केले . १५ दिवसांचा नाजीरखान रोहिल्यांबरोबर झगडा करून विजय संपादन केला व त्यास समज देऊन गाजीउद्दीनच्या साहाय्याने कारभार करण्याची समज दिली . . विठ्ठल शिवदेव याच्या जोखमीच्या कामगिरीबद्दल मोगल दरबारात बादशहाने त्यांचा गौरव करण्यात आला
. १७६१ मध्ये अब्दालीचा पाडाव करण्यासाठी सदाशिवराव भाऊ या सारख्या कसलेल्या सेनापतीच्या हाताखाली कसलेल्या सरदारांमध्ये विठ्ठल शिवदेव यांचा समावेश होता . विठ्ठल शिवदेव याचा हाती कसलेल्या १००० पठाणांचा समावेश सैन्यात करण्यात आला . सदाशिवभाऊरावांनी युद्ध आघाडी उभारताना महत्वाच्या ठिकाणी जबाबदारीची माणसे त्यांचे कर्तृत्व डोळ्यासमोर ठेऊन विठ्ठल शिवदेवना युद्धाची डावी बाजू सांभाळून पुढे जाण्याचे काम दिले परंतु मराठ्यांच्या दुर्दैवाने सर्वाना पराकाष्ठेचे प्रयत्न करूनही अपयश येण्याची चिन्हे दिसू लागल्यावर सर्वजण युद्धक्षेत्र सोडून निघून आले .
पुढील काळात पेशव्यां कडील एक कर्तबगार शूर सेनानी म्हणूनविठ्ठल शिवदेव यांची गणना होऊ लागली.
१७६२ च्या आळेगाव च्या लढाईत माधवराव यांच्या विरुद्ध राघोबादादास यश मिळवून देण्याच्या कामगिरीत विठ्ठल शिवदेव यांचा मोठा वाट होता . राघोबादादांकडे पेशवाईची सूत्रे आल्यानंतर त्यांनी महत्वाच्या ठिकाणी आपल्या मागितली माणसांची नेमणूक करण्यास सुरवात केली त्या वेळेस विठ्ठल शिवदेवची कामगिरी लक्षात घेऊन त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणून झाली . लोहगड व त्याच्या आसपासची जहागिरी त्यांना देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला . उत्तरेतील राघोबादादांच्या कारवायात विठ्ठल शिवदेवचे कार्य नेत्रदीपक आहे यात शंकाच नाही .
सर्व इतिहासकारांना एक गोष्ट मान्यच करावी लागेल कि प्रत्येक आघाडीतील एका आघाडीचे तुकडी प्रमुख सेनापती म्हणून विठ्ठल शिवदेव यांचे नाव पुढे येते . उत्तरेकडील अवघड कामगिऱ्यांवर त्याची नेमणूक झाल्याचे इतिहासातूनसमोर येत आहे . कार्य तत्परता आणि समयसूचकता हे त्यांचे गूण सांगता येतील. म्हणूनचजेंव्हा जेंव्हा स्वराज्य रक्षण व अमीवृद्धीकरता विठ्ठल शिदेव पुढे आलेले दिसतात . त्यांच्या पराक्रमाचा गौरव म्हणून त्याकाळी घड्याळ वापरण्याचा अधिकार व खर्च पेशव्यांनी केलेला दिसतो(१७५०-५१) .
याचा अर्थ वेळेचे महत्व युद्ध आघाडीवर महत्वाचे पेशवाईत ठरले असावे असे वाटते . थोरले बाजीराव राघोबादादा माधवराव यांच्या काळात मराठा राज्याची सेवा करणारा धडाडीचा सेनापती म्हनूणम्हणून विथ शिवदेव विंचूरकर यांनी विंचूरकरांच्या वंशात आणि सासवड च्या वैभवात भर घातली आहे ......
महाराष्ट्रातील कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी येथील मल्हारी मार्तंड||च्या भव्य मंदिराच्या पश्चिमेस मागील बाजूस जे उंच शिखराचे देऊळ दिसते ते" पंचलिंग" महादेवाचे असून विठ्ठल शिवदेव दाणी यांनी ते बांधले आहे . . अशा प्रकारे स्वतःच्या कर्तृत्वाने सासवडचे नाव इतिहासात अजरामर करण्यात या सेनानीनचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल .
विठ्ठल शिवदेव १७६७ मध्ये युद्धाच्या धामधुमीत आजारी पडले शेवटच्या घटक मोजत असताना त्यांनी आपल्या थोरल्या मुलास बोलावून सांगितले "आपल्या धन्याची सेवेसाठी , आपल्या जीवाची पर्वा करू नकोस " शिवाजी, नरसिंहराव, मल्हारराव, बाजीराव आणि खंडेराव अशी पाच मुले विठ्ठल शिवदेवना होती. स्वराज्यासाठी आपल्या जिवाचीही पर्वा ना करणाऱ्या विंचूरकरांपुढे आम्ही सासवड कर नतमस्तक आहोत .




No comments:
Post a Comment