# मुरारबाजी देशपांडे ##.
मुरारबाजी देशपांडे यांच्या वंशजांचे गाव जावळी तालुक्यात असावे असे वाटते. कारण त्यांच्या बरोबरचे भाऊबंद हे चंद्रराव मोरे यांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख आढळतो आहे.
काहींच्या मते शिवाजी राज्यांच्या स्वराज्यात सामील होण्यासाठी ते जावळी सोडून महाड मध्ये आले होते .
मुरारबाजी देशपांडे हा मराठा सैन्यातील वीर होता. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव.
इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. शिवाजी महाराजांचे राज्य नेस्तनाबूत करायचे म्हणजे पुरंदर किल्ला घेतला पाहिजे हे दिल्लीच्या बादशहाला वाटू लागले .
या कामगिरीसाठी त्याने दिलेरखान व मिर्झा राजे जयसिंग या बलाढ्य सरदारांना दक्षिणेत पाठवले . पुरंदरचा किल्लेदार होता मुरारबाजी देशपांडे .
दिलेरखानाने ३ अजस्त्र तोफा आणल्या होत्या . त्याने पुरंदर जवळील वज्रगडावर तोफा चढवल्या , मुरारबाजीच्या किल्ला लढवला
. खानाचे सैन्य अफ़ाट, लांब पल्ल्याच्या तोफां बाढीमार करू लागल्या , पुरंदरची माची दिलेरखानाने जिंकली. ५००० पठणासमवेत तो बालेकिल्ल्यावर चढाई करू लागला.
खानाचा तो रोख बघून मुरारबाजी त्वेषाने उठला निवडक ७०० मावळे बरोबर घेतले. बालेकिल्ल्याचे दरवाजे उघडले हे वीर मराठे ५००० पठाणांवर तुटून पडले .
एकाच रानकल्लोळ झाला." हर, हर महादेव ". अशा आरोळ्यांनी सारी पुरंदरची दारी दुमदुमली . दिलेरखानाने मुरारबाजींचा त्वेष बघून अचंबित झाला. .आपल्या छावणीतून डोळे लाल झालेल्या मुरारबाजीकडे तो पाहत बसला .
मराठ्यांनी खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला . खानाच्या सैन्याने माघार घेतली ते दिलेरखानाच्या छावणी कडे पळत सुटले मुरारबाजीच्या त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला सैन्य दिलेरखानाच्या छावणीत शिरले . धावाधाव आरडा ओरडा .किंचाळ्या हाहाकार उडाला दिलेरखान घाईघाईत हत्तीवरील अंबारीत चढला .
मुरारबाजीचे तलवार सपासप कोणाच्या छाताडात, कोणाच्या मानेवर कोणाच्या मस्तकावर कंठात घुसत होती . मुरारबाजी कोणालाच आवारात न्हवता . दिलेरखान मुरारबाजीचे शौर्य पाहून थक्क झाला. मुरारबाजी ओरडत होता" कापा ,तोडा,मुडदे पाडा"
",मुरारबाजीच्या जो आड आला तो ठार झाला . या एकट्या वीराला चोहूबाजूने खानाच्या सैन्याने वेढले . खान अंबारीतून ओरडला.
" थांबा" मुघल क्षणभर थांबले मागे सरले .
तो मुरारबाजीच्या म्हणाला "मुरारबाजी, मी तुझ्या सारखा समशेरबहाद्दर पहिला नाही .तू आमच्या बाजूला ये . कौल घे. बादशहा तुला सरदार करतील. जहागिरी देतील. बक्षीस देतील."
मुरारबाजीच्या ते शब्द ऐकले.तापलेले शिसे कानात ओतावे तसे ते शब्द त्याच्या कानात घुसले ,तो ओरडला" अरे .तुझा कौल म्हणजे काय?मी शिवाजी राज्याचा शिपाई , तुझा कौल घेतो कि काय ?"
त्याचे डोळे आणखीनच लाल झाले . तो सरळ खानाच्या दिशेने धावत सुटला . आफत धुमश्चक्री झाली. बाजी तलवारीने लढत होता. पण खानाने कुटील डाव केला .
त्याने समशेरीस हात ना घालता धनुष्यबाण हातात घेतला .खरे म्हणजे तानाजी मालुसरे आणि उदेभान प्रमाणे समोरासमोर युद्ध व्हावयास हवे होते .पण तसे घडले नाही खानाच्या बाणाने सु ,सु करत खसकन बाजीच्या कंठात शिरला .
या स्वामीभक्तांची मन छेदली .मुरारबाजी पडला.... मावळ्यांनी त्याचे शरीर उचलून बालेकिल्ला गाठला .
महाराजांची एक दौलत लुटली गेली दिलेरखान मिर्झा राजे जयसिंग यांच्या बरोबर सुमारे २०००० फौज घेऊन आला होता .
महाराजांना खूप दुःख झाले जिजाऊमाताही खूप दुखी झाल्या . पुरंदर गेला असता तर पुन्हा जिंकता आला असता पण मुरारबाजी देशपांडेला परतवण्यास काय मोबदला देणार . ?
भारी मानसुब्याची दुधारी तलवार खानाच्या फौजेत विजेसारखा हल्लकल्होळ उडवून विजेसारखीच गुप्त झाली.
शूराला शूराचीच कदर दिलेरखान उद्गारला' यह कैसा सिपही खुदाने पैदा किया ?'
मुरारबाजी पडला तो दिवस होता १६ मे १६६५ . तरी मराठे शरण आले नाहीत शिवाजी महाराजांनी तह केला.
२३ किल्ले आणि ४००००० रुपये मोगलांना देऊन आपला पुत्र संभाजी यास औरंजेबाच्या दरबारी आणून सरदार बनवणे व हा काकर करण्यासाठी आग्र्याला औरंजेबाकडे जाणे असे तहाच्या अटी ठरल्या .
.जावळीच्या चंद्रराव मोर्यांशी झडलेल्या संघर्षात शिवाजीराजे भोसले यांना मोर्यांच्या सैन्यातून लढणार्या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले.
स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजीला मराठा सैन्यात दाखल करून घेतले.
पुरंदर फार शर्तीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्य फौजेच्या तोंडचे पाणी पळवणार्या मुरारबाजीचा या लढाईत अंत झाला. स्वराज्यासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली..........



No comments:
Post a Comment