## छत्रपती राणी इंदुमती साहेब. ## शंकरराव खाशाबा जगताप ##
इंदुमती राणीसाहेब राजर्षी शाहूंच्या घरात आल्या त्यावेळेस त्यांचे वय होत अवघं १० वर्ष . लग्नाआधी ती ९ वर्षाची" जमना जगताप " होती .सासवड मधील एक सरदार घराण्यातील शंकरराव जगताप. या सरदार घराण्यातील लोक शिवाजी महाराजांच्या सेवेत होते . पुरंदर गडावरील या सरदाराना इनामही शिवकालापासून मिळत होतं .
या घरात शंकरराव यांची मुलगी आणि चिमासाहेबांची धाकटी बहीण म्हणून" जमना " मोठी झाली राजर्षीच्या विश्वासू माणसांनी सून म्हणून तिचे नाव राजर्षींनी सुचवले. छत्रपतींचे चिरंजीव "शिवाजी राजे" यांचेसाठी राजर्षींनी जमनाची निवड केली.
नुसती मुलगी पाहून न्हवे तर त्या बरोबर घरदार पाहून, धनदौलत पाहून ,सत्ता, मा न प्रतिष्ठा, सौंदर्य यांचा विचार करून सोयर संबंध करण्याचा काळ होता . पण राजर्षी द्रष्टे होते .
त्यांनी कागलच्या" खासबागेत 'दिवाण सर रघुनाथराव सबनीसांकरवी जमनाची परीक्षा घ्यायचे ठरवले. दिवाण बहादुरानी जमनाला विचारले "बोका" चे स्त्रीलिंग काय ? जमनाने अचूक उत्तर दिले" भाटी"
" "चमचा' या शब्दाची विभक्ती सांग." चमचा हे नाम असल्याने तिथे चा हा षष्ठीचा प्रत्यय होत नाही" जमनाने प्रथमा असे उत्तर दिले. सर्वांचे समाधान झाले छोटीशी, रूपवान, बुद्धिमान ,चुणचुणीत या मुलीचे नाव ठेवले गेले" राणी इंदुमती "
१९१७ मध्ये मोठ्या थाटामाटात छत्रपतींची सून म्हणून राजर्षिंच्या घरात आली .पण एक वर्ष आणि सहा दिवसातच ती विधवा झाली
शिवाजीराजे रानडुकराची शिकार करताना घोड्यावरून पडले आणि मरण पावले .. इंदुमती अवघ्या ११ वर्षाची होती. राजर्षींनी अतीव दुःख झाले दुःख शिवाजी राजे गेल्याचेही आणि या चिमुरडीचेही' इंदुमतीचे'
.राजर्षी उद्गारले ",तोफखाने, मी काय करू या सुनबाईंचं ?" तोफखाने म्हणाले " आपणत्यांना शिक्षण द्यावे महाराज ". सर्वसामान्य कुटुंबातील स्रियांना शिक्षण म्हणजे त्याकाळी मोठी अवघड गोष्ट होती.
त्यात राजघराण्यातील स्रियांना शिक्षण घेण्यासाठी मर्यादाही होत्या. राजर्षी शाहूंनी निर्णय घेतला निर्णय सोपा न्हवता. कारण राजवाड्यातूनही त्यांना खूप विरोधास सामोरे जावे लागत होते पण त्यांनी आपला निर्णय ठाम ठेवला. इंदुमती राणी साहेबाना इंग्रजी , संस्कृत आणि त्या बरोबर साहित्य याचेही शिक्षण द्यावे असा विचार राजर्षींनी केला
. राजघराण्यातील स्त्रीयांचे नखही दृष्टीस पडू नये असा काळ होता .राणी येत जात पडदा दोन्ही बाजूस धरला जाई . पडदा धरणे त्याकाळी कुलीनपणाचे ,प्रतिष्ठेचे, शीलाचे लक्षण होते .
. छत्रपतींनी समाज काय म्हणेल? याचा विचार ना करता शिक्षणासाठी ५ शिक्षकांची निवड केली .सोबत म्हणून ४ मुलीही निवडल्या .राजवाड्यातील विरोध पाहता त्यांनी कोल्हापूर जवळील" सोनतळी' येथे त्यांच्या बंगल्यात राणीसाहेबांचे शिक्षण सुरु झाले .
राजाराम हाय स्कूल चे भार्गवराम हे कडक शिस्तीचे आणि विक्षिप्त स्वभावाचे शिक्षक म्हणून नेमले गेले. राजर्षी शाहू उद्गारले" त्यांनी माझा मान नाही राखला तरी चालेलमाझ्या सुनेला उत्तमशिक्षण दिलेतर मी त्यांना स्वतःहून नमस्कार करीन . "काय म्हणावं या शिक्षणप्रिय व मुलीपेक्षा जास्त प्रेम आपल्या सुनेवर करणारया या छत्रपतीला ?..."
. राजर्षींचा बगला आश्रमशाळा झाली .राजर्षींनी तिला डॉक्टर करायचे होते . राणीसाहेबाना त्यांनी घोडेस्वारी,ड्रायविंग बंदूक चालवणे या बरोबर शिकारीचेही शिक्षण दिले .
राजर्षी शाहूंनी त्यांच्या पाश्च्चत राणी साहेबांची राहण्याची, दागदागिन्यांची ,पैसे यांची सोय मृत्यूपूर्वी करून ठेवली होती. राजर्षिंचे डॉक्टर करण्याचे स्वप्न त्यांच्या अचानक १९२२ मध्ये झालेल्या मृत्यूमुळे पूर्ण होऊशकले नाही .
राणी साहेबानी मॅट्रिकची परीक्षा मुलांमध्ये बसून पेपर सोडवणे हे राजघराण्याच्या प्रतिष्ठेला साजेसे न्हवते त्या परीक्षेला बसल्या. कोल्हापूर केंद्रात दुसऱ्या आल्या .
त्यांचे शिक्षण पक्क्या रूढी आणि आणि समजुतीमुळे तेथेच थांबले. पण त्यांनी धर्म ,इतिहास,राज्यशास्त्र,हि पुस्तके शिक्षणशास्त्र ,प्राणिशास्त्र हि पुस्तके वाचुन काढलीच
. आयुष्यातील दुःखाला ,उदानसीतेला. वैफल्याला मनाच्या तळाशी ठेऊन त्या सदैव उदार शांत,प्रसन्न. व दुसऱ्याला मदत करत राहिल्या,.
साहित्य ,संगीत,, चित्रकला निसर्ग यातील दर्शनाने सुखावत राहिल्या .
त्यांनी स्रियांना एकत्र करून "लेडीज क्लब वनिता समाज" काढून स्त्रियांना बेडमेंटन ,टेनिस सुरु करून स्त्रीयाना जोडण्याचे व मोकळेपणा आण्याचे काम केले.
दुसरे एक मंडळ स्थापन केले' ललिता विहार "स्त्री शिक्षणासाठी धडपड सुरु केली . स्त्रियांसाठी वसतिगृहाची सोया केली . शिक्षणविषयक उपक्रमांना पाठिंबा देत राहिल्या .आजही राणीच्या नवे" राणी इंदुमती गर्ल्स हायस्कुल " दिमाखाने "भवानी मंडप कोल्हापूर" येथे उभे आहे
.समाजाला व दैवाला दूषणे ना देता, दुसऱ्यांचे भले करणाऱ्या या राणीने आक्रोश,करून न्याय मागितला नाही त्यांनी विकासाच्या योगे स्वतःचे जीवन उन्नत केले व सन १९७१ मध्ये या जगाचा शांतपणे निरोप घेतला ....
. शंकरराव खाशाबा जगताप यांनी व त्यांच्या मुलीने "छत्रपती राणी इंदुमती राणीसाहेब" यांनी या सासवडचे नाव अजरामर करुनठेवले आहे .
सोपानदेवाला जाताना या वाड्यास लोक नमस्कार करतात.
पिढ्यान पिढ्या वारी करणारे लोक वाड्याच्या पाहिरीवर डोकं ठेवतात कारण या वाड्यात आषाढ वारीसाठी" संत तुकाराम महाराज "सासवड मुक्कामी वास्तव्यास राहत असत.
त्या वाड्याला तुकाराम महाराजांनी पदस्पर्श करून पावन व पवित्र केले आहे
या वाड्यासमोरून जाताना राणीची आठवणींबरोबरच तुकाराम महाराजांचे नाव ओठावर आल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही
आपोआपच हात जोडले जातात "ग्यानबा तुकाराम "म्हणत सोपानदेवाकडे मार्गस्थ होतो .





No comments:
Post a Comment