विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 July 2020

देवी अहिल्याबाई होळकर ( १७६६ - १७९५ ) ह्यांनी बांधलेल्या मंदिर , घाट आणि धर्मशाळांचा चा नकाशा .


देवी अहिल्याबाई होळकर ( १७६६ - १७९५ ) ह्यांनी बांधलेल्या मंदिर , घाट आणि धर्मशाळांचा चा नकाशा .
- अनिश गोखले यांची पोस्ट Aneesh Gokhale

आपण हे लक्षात घ्यायला हवे कि ही निव्वळ मंदिर आणि घाट नसून , त्या काळच्या मराठ्यांनी मिळवलेल्या राजकीय वर्चस्वा चे प्रतिक आहेत . जिथे राजकीय सत्ता नाही , तिथे हे कार्य घडवणे अशक्य . फक्त शंभर एक वर्ष अलीकडे औरंगझेब नी भारतभर मंदिरे तोडण्याचे फर्मान काढले होते . जिथे मंदिर आणि घाट बांधले गेले , तिथल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात पण सुधार झाले . हा नकाशा म्हणजे परकीय राजवट हटवून त्या वर पुन्हा स्वराज्य उभारण्याचे प्रतिक आहे .
नकाश्यातील जागा पुढील प्रमाणे : ( देव प्रयाग पासून clockwise )
१. देव प्रयाग ( धरमशाला )
२. गंगोत्री ( घाट )
३. केदारनाथ ( कुंद )
४. बद्रीनाथ (कुंड )
५. अयोध्या ( मंदिर , घाट )
६. प्रयाग ( घाट , धरमशाला )
७. वाराणसी ( मंदिर , घाट )
८. गया (मंदिर , घाट )
९. अमरकंटक ( धरमशाला )
१० . फातेह्गड ( घाट )
११. जगन्नाथपुरी ( मंदिर )
१२. ओमकारेश्वर ( मंदिर )
१३. महेश्वर ( मंदिर , घाट )
१४. रामेश्वरम ( धरमशाला )
१५. गोकर्ण ( अन्न क्षेत्र )
१६ . राजापूर ( मंदिर )
१७. पंढरपूर (मंदिर )
१८. जेजुरी ( मंदिर )
१९. पुणे ( धरमशाला )
२० . ब्राह्मणगाव ( मंदिर , घाट )
२१. इंदोर ( मंदिर )
२२. उज्जैन ( मंदिर )
२३. चीकाल्धारा ( मंदिर )
२४. नागेश्वर ( मंदिर )
२५. सोमनाथ ( मंदिर )
२६. द्वारका (धरमशाला )
२७. नाथद्वारा (मंदिर )
२८. पुष्कर (मंदिर , धरमशाला )
२९. धर्माराजेश्वर (घाट )
३० . भांपुरा ( छत्री )
३१ व्रीन्दावन (मंदिर )
३२. हरिद्वार ( घाट )
३३. ह्रीशिकेश (घाट )

#अहिल्यापर्व #जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...