#शाहुपर्व
रवि पार्वती शिवाजी मोरे
Visual storyteller ·
काल रात्रौ राजश्री स्वामी दरबारात बसले असता संभाजी राजांचे पत्र आले . त्यात मजकूर की पंत प्रधानांची फौज येऊन बहुत उपद्रव केला . पत्र वाचून महाराज बोलले , पंत प्रधानांच्या आगळिकी किती सांगाव्या ? एक आद्णेखेरीज उत्तरेत गेले . सार्वभौमाचे दर्शन घेऊन मनसबे करणार म्हणून वर्तमान ऐकतो . पुर्वी जंजीर्याचे हबशाचे संरक्षण केले . आंगर्यांचे घरात गृहभेद केला . सांप्रत फौज पाठवून आमचे बंधुशी युध्द करितात . तर मग हे प्रत्यक्ष आमच्याशी युध्द करण्यास अंतर करतील की काय ? असे भाषण दरबारात , शिकारीत वारंवार करितात , जवळचे लोक त्यास अनुमोदन देतात . ऐशियास आम्हीच पुर्वी आपणास लिहून रामचंद्र हरीस तिकडे पाठविले . परंतु आता येथे महाराजांची मर्जी अशी दिसते , तर फौज परत आणावी म्हणून लिहिले , त्या वरुन आपणही तिकडे परत येण्या विषयी कळविले . परंतु सांप्रत येथे हा प्रकार ऐकतो . तरी महाराजांचे मर्जी करिता रामचंद्र पंतास अवलिंबे परत आणविले पाहिजे . तिकडे व्यंकटराव घोरपड्याचे जे होणार ते सुखरूप हो . याविषी अनमान करू नये .
महाराजांची मर्जी सांभाळावी .
- शाहू महाराजांनी पिलाजी जाधवराव यांना भेटीस बोलावून त्यांचे मार्फत चिमाजी आप्पास खरमरीत लिहलेले पत्र .
त्या पत्राची तारीख होती - 7 मार्च 1736 .
#सरदार
#जागर_इतिहासाचा
🙏🚩🚩

No comments:
Post a Comment