ताराराणी ही इतिहासातील व्यक्तिरेखा मला प्रभावित करते. मुगलांविरुद्ध मराठी सैन्याचे नेतृत्व तिने खंबीरपणे केले. तख्तावर बसण्याचा तिला संपूर्ण नैतिक मान होता. पण शाहू महाराष्ट्रात परतल्यावर शंभूराजांचा मुलगा म्हणून समाजाने आणि धुरिणांनी शाहूंना छ्त्रपती केले.
मराठ्यांना पहिली महिला छ्त्रपती मिळू शकली असती. पण आम्ही महाराजांनी न शिकवलेल्या 'वारसाहक्कांना गुणांपेक्षा प्राधान्य' ह्या तत्वाचा आम्ही स्वीकार केला.
शाहूंनी कधीही राजकारणात पूर्ण लक्ष घातले नाही. आमच्या सुदैवाने तेंव्हा पेशवा पदी बाळाजी विश्वनाथ आणि नंतर पहिला बाजीराव असे धुरंधर योद्धे असल्याने मराठा साम्राज्य वाढले आणि शेवटी दिल्ली सुद्धा आम्ही जिंकली ती पेशव्यांच्या नेतृत्वातच.
पेशव्यांनी छ्त्रपतींच्या गादीला नेहमी मान दिला. पण अशा वेळी बाळाजी विश्वनाथ आणि पहिल्या बाजीरावांच्या पाठीशी ताराराणींसारखी शौर्या उभी असती तर मराठेशाही अधिक वृद्धिंगत झाली असती हे नक्की. बाळाजी विश्वनाथ, कान्होजी आंग्रे यांनी तर ताराराणींच्या नेतृत्वात मुघलांना नाकी नऊ आणले होते. त्यांनी तरी ह्या भद्रकाली च्या नावाला पाठींबा दिला पाहिजे होता. पण त्यांनीही शाहू महाराजांचीच निव केली.
कर्तृत्ववान महिलेला नेतृत्वाचा सन्मान देते तर मराठी साम्राज्य वेगळ्याच झळाळीने झळाळून गेले असते...
- हर्षद माने

No comments:
Post a Comment