postsaambhar :Varsha Mishra
अहिल्याबाई होळकराच्या कारकिर्दीत स्थापत्य, चित्रकला व कलेला प्रोत्साहन दिले गेले. वास्तुशास्त्रज्ञ चिंतामण कांड म्हणतात," मराठा राज्याच्या नावावर भव्य वास्तु देवळे किंवा राजवाडे नाहीत. दक्षिण भारत आणि राजस्थान येथील अशा वास्तु निर्माण केल्या. मोगलांच्या नावावर ही भव्य वास्तु आहेत पण मराठा राज्यानी आणि इतर राजांनी जे कार्य केले नाही ते अहिल्याबाई नी करून दाखविले. हे कार्य फक्त स्वतःच्या राज्यातच नाही तर इतरही राज्यात ,संपूर्ण हिंदुस्थानात (रामेश्वरम-काशिविश्वेशर) केले आहे. मराठी माणसांला याचा अभिमान असायला हवा" अहिल्याबाईस स्मृतीस त्यांनी तो लेख अर्पण केला आहे.
वास्तुकला शास्त्रज्ञाकडुन अहिल्यानी घेतलेला सल्ला व त्या द्रुष्टीने झालेल्या असंख्य घाट ,मंदिरे यांची निर्मिती (महेश्वर ते काशी) जी आजही टवटवीत आहेत.
दुष्काळात अनेकाच्या हाताला काम, कलादुष्टी असलेल्या कलाकारांच्या कलेला वाव व लोकांचे,प्रजेचे सार्वजनिक कल्याण हाच त्यांचा ऊद्दात हेतू, दुष्टीकोन होता. ऊदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातिल चांदवड (नाशिक) ऊपराजधानी ही त्यांच्या कारकिर्दीतील एक स्थापत्याची ऊत्तम नगरी मानली जाते.
चांदवडला अहिल्या बाईचे दोन वाडे आहेत एक जुना. वाडा,तर नवा वाडा म्हणजे 'रंगमहाल'आहे. रंगमहाल तीन मजली आहे. संपूर्ण काम लाकडात केले असून लाकडावर सुंदर नक्षीकाम आहे. रंगमहालाची चित्र अप्रतिम आहेत. सर्व राजपूत शैलीत असून रामायण, महाभारतातील प्रसंग आहेत. मात्र या चित्रांत स्त्री पुरुषांची वेशभूषा मराठे शाहीची आहे, युद्ध द्रूश्याचे चित्रांकणही मराठा मेवाड शैलीत आहे. वाडा १००फुट ऊंच आहे, दगडी कमान प्रवेशद्वार ला व आजुबाजुला ४ ऐकर परीसरात भव्य दगडी तटबंदी केलेली आहे. या वास्तुबरोबरच अनेक विहीरीचे बांधकाम केले आहे.
चांदवड येथे बांधलेल्या विहिरी वैशिष्ट्यपूर्ण असुन रंगमहालाच्या बाजूला असलेली विहीर सुंदर व प्रेक्षनिय आहे. मुख्य इमारतीच्या पश्चिमेला असलेली ही ऐतिहासिक विहीर कित्येक दुष्काळात चांदवडला, अनेक गावाला पाणी पुरविण्यात आले.विहीरीला एकदंरीत तीन कमाणी आहेत. विहिरीत उतरत जाणाऱ्या पायर्या चौकोनी चिरेबंदी हौदात संपतात. हा हौद २०/३० फूट खोल आहे नंतर ६×८ चा कुंड आहे. त्यातील कधीही न संपनार्या जलामुळे खोलिचा अंदाज येत नाही. नरोटी बारव,विठोबा बारव,गढीबाग ही विहिर दोन मजली असून ५० पायर्र्या आहेत. बांधकाम काळ्या घडिव दगडांचे आहेत. रेणुका मंदीराजवळील एक पायविहीर व शिलालेख कोरलेला आहे. अश्याच अनेक विहिरी लोकोपयोगी कर्तृत्व बुद्धी ने बांधल्या आहेत. एकुणच अहिल्याबाई ची दुरदर्शीपणा,कला व सांस्कृतिक जोड,दुष्टीकोन लोकहितार्थ व्यापक होता.......
संदर्भ-
History of Malwa- s.k.Bhatt.
चांदवड स्मरणिका- एस. के.पवार.
#अहिल्यापर्व
#जागरइतिहासाचा
No comments:
Post a Comment