प्रभु-पदवी- प्रभु हा एक अधिकार आहे. शिलाहारांच्या राजवटींत (१०७०) कोंकणांत या नांवाचे वतनदार अधिकारी असत. सांप्रतचे जसे देसाई, देशपांडे हे वतनदार अधिकारी आहेत, त्याच दर्जाचे शिलाहारकालीं जे अधिकारी कोंकणांत असत, त्यांनां प्रभु म्हणत. जमीनमहसुलाच्या संबंधाचा कोंकणांतील मोठयांतील मोठा हुद्दा म्हणजे प्रभुपणाचा होता. म्हणजे प्रभु हा शब्द जातिवाचक नसून अधिकारदर्शक आहे. हा हुद्दा ब्राम्हण व कायस्थ आणि पातेणे या सर्वांनां त्यावेळीं मिळत असे. क-हाडे ब्राह्मणांत प्रभुदेसाई हें एक आडनांव असून, त्या घराण्यापैकीं मूळ शाखेला देसाई (देशपांडे) पणाचे हक्क अद्यापि कोंकणच्या कांहीं भागांत मिळत आहेत. शिलाहार हे मूळचे विद्याधरवंशीय असून उत्तरेकडील रहिवाशी होते. जेव्हां दक्षिणेंत आले, तेव्हां त्यांच्याबरोबर कांहीं कायस्थांचीं घराणीं दक्षिणेंत आली असावीं. त्यांच्यापैकीं कांहींनां शिलाहारांनीं ब्राह्मणांप्रमाणेंच प्रभुपण दिलें. हा हुद्दा कायस्थांनीं जेव्हां मिळविला तेव्हां त्यांच्या ऐश्वर्याची परीसीमा झाली. हा हुद्दा कांहीं काल हातीं राहिल्यावर प्रभुपणाचा अधिकार असलेले सर्व चांद्रसेनीय आपणांस प्रभु या नांवानें कायमचे नांवाजूं लागले. यानंतर मुसुलमानी अंमलांत प्रभुपणाचा हुद्दा कायस्थांपेक्षां ब्राह्मणांनां जास्त मिळूं लागला. प्रभुपणा राजदत्त असे, गावंडयासारखा स्वयंभु नसे. गांवचा इजारदार, जमीनदार किंवा मोकासदार म्हणजे प्रभु होय. प्रभुपणा राजदत्त असल्यानें त्याची शाश्वति राजाच्या मर्जीवर राही. राजाची मर्जी फिरली, किंवा राज्यक्रांति झाली, तर हा प्रभु नवीन राजास आपल्या प्रभुपणाचा वंशपरंपरत्वाचा हक्क सांगे, नवा राजा तो वाटल्यास मानी अगर अमान्य करी. तथापि कित्येक इजारदार व त्यांचे वंशज आपलें वैशिष्टय दाखविण्यासाठीं प्रभुपणाचा अधिकार हातून गेला असतांहि आपल्या नांवापुढें प्रभु हें उपपद आडनांवादाखल जोडीत. मात्र क-हाडे ब्राह्मणांत प्रभु हें उपपद देसाई या आडनांवाच्या मागें जोडलें जातें, स्वतंत्रपणें आडनांव म्हणून किंवा जातिनाम म्हणून योजिलें जात नाहीं. चांद्रसेनीय कायस्थ व पाठारे हे मात्र स्वतःचें जातिनाम म्हणून प्रभु शब्द योजतात. प्रभु हा शब्द महाराष्ट्रांत अनेक वर्षे लुप्त होऊन परभू हा शब्दच रूढ झाला याला प्रमाण असें देतां येईल कीं, इतर जातिनामांचीं जशीं स्त्रीलिंगी रूपें आढळतात, तशीं प्रभु (हें जातिनाम धरल्यास) शब्दाचीं आढळत नाहींत. ब्राह्मण, ब्राह्यणीण; कायस्थ; कायस्थीण; तसें परभू, परभीण असें रूप आढळतें पण प्रभु, प्रभ्वीण असें रूप आढळत नाहीं. परभू हें नांव जातिवाचक असे शिवाजीच्या वेळच्या कागदपत्रांत आढळतें (राजवाडें खं. १६, पृ.२). (राजवाडे-भा.इ.मं. चतुर्थ सं.वृत्त, पृ. ४०; महिकावतीची बखर, पृ. ५२)
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Wednesday, 21 October 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी १७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
-
मराठा सरदार राजे वाघ घराणे #काठापुर_वाडा__________ लेखन माहिती : Nitin Kemse मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी होळकर शाहीने कंबर कसली होती.त्य...
No comments:
Post a Comment