विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 November 2020

यशवंत युग-यशवंत स्मृती यशवंतराव होळकर

 यशवंत युग-यशवंत स्मृती

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन (28/10/1811)
घोड्यावरील खोगीर
हेच माझे घर,हेच माझे सिहांसन




यशवंतराव होळकर
--------------------------------------------------------
शाहीर अमर शेख यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्य व पराक्रमाचा पोवाडा
न र फाटक लिखीत श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर चरित्र प्रकाशन सोहळा दि 12नोव्हे 1967 रोजी इंदौरच्या पंढरीनाथ पथवरील मंगल सदनात संपन्न झालेल्या कार्यक्रमात गायला हा पोवाडा फाटकांनी लिहलेल्या चरित्रात आहे या कार्यक्रमाला होळकरांचे तेरावे राजे महाराज तुकोजीराव होळकर (तिसरे)महाराणी शर्मीष्ठा देवी होळकर राजकन्या सौ श्रीमंत सिताराजे आणि होळकर राजपरिवार उपस्थित होता
कार्यक्रमाचे आयोजन धनगर सेवा संघ इंदौर ने केले होते यासाठी शंकर बाबुराव लांडे,शामराव होळकर ,बा.श.वारे,अ.भ.बारगळ,संजयराव बोराडे, दे.ज.जोशी ,परिश्रम घेतले त्यांचे आभार प्रस्तुत चरित्रात न.र फाटक यांनी मानले
डावाला प्रतिडाव होळकर टाकीत असे आगळा !
असुन पाण्यामध्ये मासा पायापाशी उपाशीच बगळा!!
खच खंदकामध्ये इंग्रज प्रेताचा पडला
नव शस्त्रास्त्रे असुन इंग्रज खंदकात सडला
शाहीर अमर शेख
करीन रक्तबंबाळ देश मी ब्रिटीशानो तुमचा
भारभुमीच्या तसुतसुवर हक्क फक्त अमुचा
फंदफितुरी बंद करा अन या मैदानाला
मेल्या आईचे दुध होळकर नाही हो प्याला
नेपोलियन युरोपात ह्यो होळकर हिकंड
अडकित्यातील जशी सुपारी करु तुकडं तुकडं
शाहीर अमर शेख
--------------------------------------------------------
हिंन्दवालो हलको हवो
तुरका रहयो न तंत
अंग्रेजा उछज कियो
जोखभियो जसवंत
राजस्थानी कवी चैनकरण सांदु यांनी महाराजांच्या निधनानंतर भानपुरा येथे काव्यातुन दुख व्यक्त केले
--------------------------------------------------------
"जसवंतराव भानपुरा को समर जित्यो,
मारे अंग्रेजजन लक्कीन सुधा फैल को"
महाराजा यशवंतरावांच्या किर्ती व शौर्याचे गुणगान राजस्थानी कवी बदन यांनी केलेले आहे
--------------------------------------------------------
"वाहवा जी यशवंतराव बहादुर,सवाई डंका बजा दिया
मंदसोर मे मारा फिरंगी जमना के पार किया "वाहवा जी यशवंतराव बहादुर,सवाई डंका बजा दिया
हरिबाला ने गाया पवाडा तमाम लष्कर खुश किया
मराठी कवी हरि बाळा यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांचेवर रचलेला शौर्य सन्मानाचा काव्य पोवाडा
--------------------------------------------------------
"दखनी दखणी पवन ज्युं ज्मे नह आतो जसवंत
फैल उत्तर कांठल किरण ,कुल लोपना किरंन्त
राजस्थानी कवी जसजी मैहारिया महाराजा यशवंतराव होळकर यांचे बद्दल काव्यातुन वर्णन करतात की महाराजा यशवंतराव होळकर इंग्रजाच्या विरोधात लढले नसते तर केव्हाच इंग्रजानी भारताला गिळले असते
--------------------------------------------------------
महाराजा यशवंतराव होळकर इंग्रजाशी एकाकी झुंज देतांना पाहुन दिल्लीचा बादशाह
शाह आलम यांनी महाराजांच्या बहादुरीवर खुश होवुन त्यांना राजराजेश्वर आलीजाह नुसरतगंज बहादुर ही उपाधी देवुन सन्मानीत करण्यात आले त्यावेळी वीरतेमधील सर्वोच्च सन्मान त्या उपाधीत होता
संदर्भ महान देशभक्त वीर श्रेष्ठ महाराज यशवंतराव होलकर -गणेश मतकर
--------------------------------------------------------
युरोपीय अमलदार विकर्स,डाँड,व रायन ह्या तिघांनी महाराजा यशवंतराव होळकरांच्या सेवेत नोकरीला असतांना इंग्रजाविरोधात न लढण्याची भुमीका घेतल्याने त्या तिघांचे उदयपुर जवळील मधान गावच्या वाघाच्या डोगंरावर शिरच्छेद केला ल त्यांची मुंडकी भाल्यावर लावुन सैन्यात मिरवली पुन्हा कोणी फितुर होवु नये म्हणुन ही जहाल शिक्षा युरोपीय अमलदारांस महाराजांनी दिली
संदर्भ -मराठे कालीन होळकर संस्थान प्रा डाँ शारदा बंडे माने
--------------------------------------------------------
-रामभाऊ लांडे अभ्यासक होळकर रियासत
9421349586

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...