विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 November 2020

दुसरे नानासाहेब/ धोंडोपंत पेशवे -


 दुसरे नानासाहेब/ धोंडोपंत पेशवे -

१८१८ मध्ये पेशवाईचा राजीनामा देऊन दुसरा बाजीराव पेशवा इंग्रज अधिकारी माल्कमच्या स्वाधीन झाला. त्याला
वार्षिक आठ लाख रुपये तनखा देऊन कानपूर जवळ बिठूर
उर्फ ब्रम्हावर्त येथे ठेवण्यात आले. त्या ठिकाणी सुमारे३३ वर्षे वास्तव्य करून १८५१ मध्ये रावबाजींनी आपला देह ठेवला.
बाजीरावास लग्नाच्या एकूण ११ स्त्रिया असून संततीही होती
परंतु पुत्र मात्र नव्हता. तेव्हा त्याने आपल्या सगोत्र भट वंशीय
कुटुंबातील ३ मुले दत्तक घेतली.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे- धोंडोपंत नानासाहेब, गंगाधर बाळासाहेब व सदाशिव दादासाहेब. पैकी धोंडोपंत व गंगाधर हे दोघे सख्खे भाऊ असून सदाशिव हा त्यांचा चुलतबंधू होय. धोंडोपंतचे मूळ गाव माथेरान जवळील वेणगाव हे असून बाजीराव जेव्हा दक्षिणेतून उत्तरेत रवाना झाला त्यावेळी धोंडोपंताचे वडील माधवराव भट हे सहपरिवार त्याच्यासोबत गेले होते.असोधोंडोपंताचा जन्म १८२४ चा असून ७-६-१८२७ रोजी बाजीरावाने त्यास दत्तक घेतले. त्याच्या भावांचे दत्तविधान
कधी झाले याची माहिती मिळत नाही. तीन मुले दत्तक घेऊन
बाजीरावाने वंशक्षयाचा प्रश्न निकाली काढला.
असो, बाजीरावास गंगाबाई नामक पत्नीपासून १६-१-१८४७ रोजी कन्यारत्न लाभले. तिचे नाव कुसुमबाई उर्फ बयाबाई. हिचा विवाह ग्वाल्हेर संस्थानातील आपट्यांशी १८५५ मध्ये झाला. ज्यावेळी १८५७ चा
वणवा पेटला तेव्हा ती धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशव्यासोबत होती. पेशवे घराण्याची अखेरची हालहवाल याच बाईकडून नंतर सर्वांस समजली.
नानासाहेब पेशव्यांचा 1857 च्या उठावात सहभाग असल्याने इंग्रजांनी त्यांचा पाठलाग केला. पुढे कानपूर नजीक झालेल्या संग्रामात हॅवलॉकने नानासाहेब पेशव्याचा संपूर्ण पराभव केला. तेव्हा नानासाहेब कानपूर सोडून बिठूरला रवाना झाला. तेथून १ ऑगस्ट १८५७ रोजी तो सहपरिवार अयोध्येस पोहोचला. तेथील बेगमेने नानाचे स्वागत केले खरे पण अयोध्येत फार काळ मुक्काम न करता नेपाळची सरहद्द गाठली. अयोध्येहून नानाचा मुक्काम हलल्यानंतर त्याच्या विषयी फक्त बातम्याच लोकांना ऐकायला मिळाल्या. त्यानंतर त्यास कोणी हिंदुस्थानात पाहिले नाही.
आता पुढे त्यांचे काय झाले याविषयी असलेल्या समज-गैरसमज जाणून घेणे गरजेचे ठरेल.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी संजय क्षीरसागर यांच्या peshwekalinitihas.blogspot.com या ब्लाॅगला भेट द्या आणि सत्य जाणून घ्या.
यात नानासाहेब पेशवे नेपाळवरून पुनश्च भारतात आल्याचा अजिबात उल्लेख नाही तसेच त्यांचा शेवट गुजरातमध्ये झाला किंवा ते महाराष्ट्रात येऊन साईबाबा बनले वगैरे थोतांडपणा असल्याचे दिसते.
©maratha_riyasat

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...