विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 November 2020

दुसरा बाजीराव पेशवा-


 दुसरा बाजीराव पेशवा-

(? १७७५ – २८ जानेवारी १८५१)
दुसरा बाजीराव हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठा साम्राज्याला
उतरती कळा याच्याच काळात आली. चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रूंशी केलेले नुकसानकारक समझोते, ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अशा अनेक कारणांनी याला 'पळपुटा बाजीराव' असेही म्हणतात.
'राज्यसंहारक' 'नादान' 'विषयलोलुप' 'लंपट' 'कपटी' 'नीच' 'विश्वासघातकी' 'उल्लू' इ. शेलक्या विशेषणांनी इतिहासकार रघुनाथपुत्र बाजीरावाची संभावना करतात. मराठी राज्याच्या इतिहासात थोरला बाजीराव हा 'बाजीराव' म्हणून नावाजला जातो तर दुसरा 'रावबाजी ' यातच सर्व काही आले!
सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर नाना फडणवीसांनी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजी याला पेशव्यांच्या गादीवर बसवले. परंतु पुन्हा काही दिवसांतच दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांनी छत्रपतींना सांगून बाजीरावास पेशव्यांची वस्त्रे दिली.
१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही. दुस-या बाजीरावाने सत्तेचा दुरुपयोग करुन आपल्या वडिलांच्या विरोधातील राजकारणी लोकांना भयभीत केले. त्यामुळे पिढ्यानपिढ्या मराठी सत्तेच्या कल्याणासाठी झटणारे सत्तेचे चाकर दुस-या बाजीरावाच्या काळात झपाट्याने राज्यकारभारामधून बाजूला झाले.
एका बाजूला सत्तापदावर बसलेला बाजीराव व त्याला साथ होती दौलतराव शिंदे याची या दोघा अपरिपक्व तरुणांनी बेबंद कारभार करून प्रजेला सळो की पळो करुन सोडले.
कोरेगावच्या लढाईनंतर जनरल स्मिथनी आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. ह्या युद्धात बापू गोखले मारले गेले. पेशव्यांसोबत असलेले छत्रपती इंग्रजाच्या ताब्यात सापडले.आणि ब्रिटिशांचे राजकारण साध्य झाले. ब्रिटिशांनी छत्रपतींमार्फत जाहीरनामा काढला. त्यात 'बाजीरावांचे पेशवेपद काढून घेतल्याचे' लिहिले गेले होते. १० एप्रिल १८१८ ला जनरल स्मिथनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. ३ जून १८१८ ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली. पुढे इंग्रजांनी बाजीरावास ब्रह्मावर्त येथे नेऊन ठेवले. तेथेच तो मरण पावला. (१८५१)
"शिवकालात जसे चारित्र्यसंवर्धन झाले व सर्वसामान्य माणसाचा देखील राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात उपयोग झाला ते चारित्र्य अखेरीस रसातळास गेले. प्रमुख राजकारणी मंडळी देखील यातून सुटली नाहीत. वाणीची सत्यता राहिली नाही. शब्दावर विश्वास राहिला नाही. थोडक्यात म्हणजे राज्य चालविण्याइतकी तपश्चर्या राजकारणी लोकांची राहिली नाही व मराठ्यांचे स्वातंत्र्य गेले"
©maratha_riyasat

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...