विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 December 2020

परशुराम श्रीनिवास पंतप्रतिनिधी


 परशुराम श्रीनिवास पंतप्रतिनिधी (जन्म १७७७ - मृत्यू १८४८)

हे औंध संस्थानाचे लोकप्रिय राजे होते..
दुसऱ्या बाजीरावाचे विश्वासू सरदार बापू गोखले ह्यांच्याशी मसुरेजवळ लढाई झाली, परशुराम पंतप्रतिनिधी यांना त्यांचा हात गमवावा लागला. म्हणून त्यांना लोक थोटेपंत ह्या नावाने देखील ओळखत. पुढे त्यांचे पुण्याला वास्तव्य असताना दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे हे त्यांच्या मागावर होते आणि त्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे पंतांना पुण्यातून पंत प्रतिनिधींची तत्कालीन राजधानी असलेल्या कराडला पळ काढावा लागला.
कर्मधर्मसंयोग असा की खुद्द दुसरा बाजीराव इंग्रजांपासून पळून जात असताना १८१८ साली कराड मुक्कामी होता.

संदर्भ

लोकप्रभा ५ नोव्हेंबर २००४ मधील प्रा. का.धों. देशपांडे ह्यांचा "संगमावरचा भुईकोट" लेख

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...