----------------------------------------------
इ.स. १५५८ दरम्यान अबुल फजल याने लिहिलेल्या ''आएने अकबरी'' या ग्रंथात त्यावेळी नरनाळा आणि गाविलगड येथे शस्त्रे आणि तोफा बनवीन्याचे काम उत्तम प्रकारे होत असे असा उल्लेख केला आहे. मध्ययुगीन इतिहासात लढाईतील तोफ हे अत्यंत प्रभावी,मारक आणि निर्णायक अस्त्र होते. याची जाणीव ठेवून त्याकाळी नरनाळा किल्ल्यावर तोफेचा कारखाना तयार करण्यात आला असावा. गॅझेटीअर मध्ये या वास्तुचा उल्लेख "गन-फाऊंडरी" म्हणुन केला आहे. सद्यस्थितीत हा तोफा बनवीन्याचा कारखाना अगदी उत्तम स्थितीत असुन दोन वेगवेगळ्या वास्तुत छोट्या व मोठ्या तोफा बनवीन्याची सोय आहे.त्यावेळेस तोफा बनवीन्याच्या दोन पद्धती प्रचलीत होत्या एक म्हणजे धातु वितळवुन साच्यात ओतिव तोफा बनवीने आणि दुसरी म्हणजे बांगडीतोफा बनवीने. या पद्धतीचा "फॅगोट सिस्टिम" असा उल्लेख केला आहे. म्हणजेच "गन्स मेड अप ऑफ राॅड्स ॲंन्ड रींग्स" असे त्याचे वर्णन केले आहे. त्याकाळी तोफा एका संपूर्ण साच्यात न बनविता प्रथम धातु ठोकुण गोल कडी बनविण्यात येत असे नंतर त्यांच्या आतुन आडव्या कांबा टाकून त्यावर कड्या ठोकुन एकजिव सांधन्यात येत असत. ओतीव साच्यातील तोफांपेक्षा बांगडीतोफा अधिक मजबूत आणि अधिक मारक क्षमता असलेल्या असत.त्याच प्रमाणे तोफा जर शत्रुच्या हातात सापडल्यास छिद्रात लोखंडी मेख किंवा खिळा मारुन त्या निकामी करण्यात येत असत अशावेळी बांगडीतोफांची दुरुस्ती लवकर होत असे. तोफा बनवीन्या साठी लोखंड, जस्त,शिसे आणि जास्त प्रमानात तांब्याचा उपयोग केलेला आढळतो. बारुदीच्या स्पोटामुळे तांबे हा धातू लवकर गरम होतो त्याच प्रमाणे थंडही लवकर होतो हा तांब्याचा गुणधर्म त्याकाळी माहीत असावा.
त्याच प्रमाणे तोफेच्या आतल्या आडव्या कांबांचा (राॅड्स) चा उपयोग भौतिकशास्त्राच्या नियमाप्रमाणे होत असे. फायर केलेला तोफेचा गोळा हा सरळ हवा कापत पुढे जातांना स्वत: भोवतीसुध्धा वेगाने फिरत जात असे त्यामुळे तोफगोळ्याचा टप्पा अधिक दुरवर पडत असे. सध्या प्रचलीत बंदुक आणि पिस्तुलामध्ये सुध्दा याच तंत्राचा वापर केलेला आढळतो, त्याला Rifiling किंवा Land असे नाव आहे.
तोफ चालविण्याची पध्धत अगदी साधी सोपी होती प्रथम तोफेच्या मागील बाजूस असलेल्या वरच्या छोट्या छिद्रात वात घालून समोरुन ठासुन बारुद भरीत असत, त्यावर तोफगोळा ठेवत असत, बारुदीच्या स्पोटामुळे तोफगोळा आपोआप बाहेर फेकल्या जात असे. तोफा लाकडी गाड्यांवर लादुन दुसरीकडे नेण्याची सोय होती. अनेक किल्ल्यांवरील बुरुजांवर दगडी किंवा लोखंडी मेखेच्या साहाय्याने तोफेचेतोंड वेगवेगळ्या दिशेने फिरवण्याची सोय होती.पुढे याहुन प्रगत अशा स्वयंप्रेरीत ( आपोआप उडणार्या) तोफांच्या शोध इ.स. १८८३ मध्ये हिरॅम मॅप्झिम या अमेरिकन माणसाने लावला.
नरनाळा किल्ल्यावर सध्यस्थितीत अकोट दरवाज्याजवळ दोन आणि नवगजी अशा तीन तोफा अस्तित्वात असुन कडक बिजली नावाची तोफ चंदनखोर्यात पडली आहे. पुर्वी नरनाळ्यावर अनेक लहान मोठ्या तोफा असाव्या . कालांतराने त्या इतिहासात गडप झाल्यात.
महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवरील वास्तुंपैकी नरनाळा किल्ल्यावरील तोफेचा कारखाना ही एकमेव वास्तु असावी.
संशोधन आणि संकलन :--- संदीप सरडे. 9822063916
No comments:
Post a Comment