अ】 इ सन १७१५-१६ या काळात सेनाखासखेल खंडेराव दाभाडे,सरलष्कर सुलतानजी निंबाळकर,नेमाजी शिंदे व कान्होजी भोसले आदी मराठा सरदारानी मोगलाच्या दक्षिण सुभैदार सय्यद बंधुपासुन पुणे,माळवा,कर्नाटक व माळवा हे प्रंआत पराक्रमाने जिंकुन घेतले... त्यामुळे या सय्यदबंधुस शाहु महाराजांसोबत करार करण्यास भाग पडले. तसेच याच काळात दिल्लीत देखिल सय्यदबंधुस विरोध होत होता....हा करार इ सन १७१८ साली झाला आणी तो खुद्द छत्रपती शाहु महाराज व सय्यद हुसेन यांच्यात झाला याची कलमे पुढील प्रमाणे..१) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळचे स्वराज्य,तमाम गडकोट सुद्धा शाहुंच्या हवाली करावे.
२) सय्यद अलीकडुन मराठा सरदारानी जिंकलेले प्रदेश म्हणजै खानदेश,गोंडवण,वर्हाड,हैद्राबाद,कर्नाटक व माळवा या भागातले नमुद केल्याप्रमाणे मोगलानी सोडुन देऊन मराठ्यंच्या स्वराज्यात सामील करावे.
३) मोगलांच्या दक्षिणेतील मुलुखावर चौथ,व सरदेशमुखी हक्क मराठ्यानी स्वतः वसुल करावे,या चौथाईचे मोबदल्यात आपली १५,००० फौज मराठ्यानी बादशहाचे मदतीस ठेवावी आणी सरदेशमुखीच्या मोबदलात मोगलांच्या मुलुखात चोर्या वगैरेचा बंदोबस्त करावा.म्हणजे संरक्षण करावे.
४) कोल्हापुरच्या संभाजी स शाहुनी उपद्रव देऊ नये.
५) मराठ्यानी बादशहास दहा लाख रु खंडणी द्यावी.
६) शाहुंचे कुटुंब ,बंधु मदनसिंह वगैरे दिल्लीच्या कब्जात आहेत त्याना मुक्त करुन स्वदेशी मराठ्यांच्या ताब्यात पावते करावे.
यात विशेष एक बाब अशी आहे की,या बाबतचे बादशहाचे लेखी फर्माण पुढे यायचे होते,शाहु महाराजानी मात्र हा तह ,लगेच अमंलात आणण्यास सुरुवात केली.त्या संबंधीचे शाहु महाराजंचे हुकुम १ ऑगस्ट १७१८ चे उपलब्ध आहेत....
यावरुन छत्रपती शाहु महाराज बादशहाच्या या लेखी फर्मानास काय किंमत देत होते हेच सिद्ध होते....
तसेच कलम दुसरे ,खुप महत्वाचे आहे... यात इ सन १७१५-१६ साली मराठा सरदारानी (खंडेराव दाभाडे,सुलतानजी निंबाळकर,कान्होजी भोसले, नेमाजी शिंदे आदी) जिंकलेले मोगल प्रदेश खानदेश,माळवा,पुणे ,गुजराथ व कर्नाटक हे मराठ्यांकडे ठेवावे...म्हणजे इ सन १७१५-१६ सालीच शाहु महाराजंच्या हुकुमाने मराठा सरदारानी मराठा स्वराज्याचा विस्तार चालु केला होता हेच सिद्ध होते.
दिल्ली दरबारात सय्यद अब्दुल्ला च्या विरोध्द बादशहाने त्याचा काटा काढण्यासाठी विविध कारस्थान रचली होती. बादशहाच्या या कारस्थानाना तोंड देण्याकरिता त्याने आपला भाऊ हुसेन यास दिल्लीत त्वरीत निघुन येण्यास २९ सप्टेंबर १७१८ रोजी कळवले. त्याप्रमाणे सय्यद हुसेन दिल्लीस जाण्यास औरंगबादेहुन नोव्हेंबर १७१८ मध्ये मराठ्यासह निघला.त्याच्याबरोबर स्वतःचे ८००० घोडेस्वार आणी मराठ्याकडील सेनापती खंडेराव दाभाडे याच्या नेत्रुत्वाखाली राघोजी शिंदे,प्रधान बाळाजी विश्वनाथ,संताजी भोसले,राणोजी भओसले,उदाजी चव्हाण,नारो शंकर,पिलाजीराव जाधवराव,केरोजी पवार, तुकोजी पवार, आदी प्रमुख सरदारासह आपल्या १६०००सैन्यासह हजर होते.हे मराठा सरदार व सैन्य छत्रपती शाहु महाराज यांच्या हुकुमानेच रवाना झाले होते. सय्यद बंधुस या मदतीच्या बदल्यात करार करवुन घेणै हे धोरण शाहु महाराजानी ठेवले होतै.....त्याप्रमाणे दिल्लीत सय्यदबंधुस मराठा सैन्यानी मदत केली व तेथे दोन बादशहा बदलवुन तिसरा आपल्या मर्जीतला बादशहा सय्यदबंधु,शाहु महाराज व अजितसिंहाने बसवला,त्या बदल्यात मातुश्री येसुबाईसाहेब,दुर्गबाईसाहेब,जानकीबाईसाहेब व मदनसिंह व इतर राजकैदीची सुटका ,तसेच करारावर शि्क्कामोर्तब शाहु महाराजानी सय्यद बंधुसोबत सेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेत्रुत्वाखाली सैन्य पाठवुन करवुन घेतले . यात वकिल यादव याने तेथे करारावर शिक्कामोर्तब करण्याचे व प्रधान बाळाजी विश्वनाथ यानी कागदपत्र दक्षिणेत आणण्याचे काम केले.
ब】 छत्रपती शाहु महाराज यानी मोगलांच्या आक्रमक चढाईस आळा घालण्यासाठी इ सन १७१५ च्या सुरुवातीसच खंडेराव दाभाडे,रायाजी प्रभु,राजजी थोरात याना गंगथडीच्या बाजुस मोगलावर पाठवले आणी त्यानी तेथे आक्रमण केले.
क】 २ एप्रील १७१५ रोजी शाहु महाराज यानी खंडेराव दाभाडे व कान्होजी भोसले याना ३०,००० सैन्यानिशी नर्मदा ओलांडुन माळव्यात घुसवले.तसेच आणखी मराठा सैन्य टोळी वढवाहजवळ नर्मदा उतरुन कंपेल परगण्यात घूसवली........येथे मोगल सरदार सवाई जयसिंह व मराठा सैन्य यांच्यात लढाई झाली....परंतु यात मराठा सैन्याचा पराभव झाला.जयसिंहाने या प्रांताची व्यवस्था लावली.परंतु ही व्यवस्था अल्पकाळच टिकली.
ड】माळवा मोहिमेनंतर खंडेराव दाभाडे,सुलतानजी निंबाळकर व दावलजी सोमवंशी याना खानदेश व गुजराथ प्रांतात शाहु महाराजानी पाठवले आणी खंडेराव दाभाडे यानी या दोन प्रांताचा दळणवळणाचा रस्ताच ताब्यात घेतला.तेव्हा हुसेन अलीने झुल्फिकारबेग या सरदारास खंडेराव दाभाडे विरोधात पाठवले.परंतु खंडेरावानी मोठ्या युक्तीने मोगलांचा पाठलाग करुन डोंगरी प्रदेशात झुल्फिकारबेगसह त्याची फौजच कापुन काढली. यासमयी त्यानी गुजराथवरील मोगलांचा अमंल काढुन शाहु महाराजांचा अमंल प्रस्थापीत केला. ही मोहिम जुन १७१५ सालची आहे.
ढ】 पुण्यावरील मोगलांचा अमंल दुर केला =
एप्रील १७१६ साली शाहु महाराजानी मराठा सरदार खंडेराव दाभाडे व सरलष्कर सुलतानजी निंबाळकर यास मोगलातर्फे पुण्याचा ठाणेदार रंभाजी निंबाळकर याच्यावर पाठवले. या सरदारानी रंभाजी निंबाळकराचा पराभव करुन त्याचा पर्यायाने मोगलाचा पुण्यावरील अमंल कायमचा दुर केला. यात रंभाजी निंबळाकर यांचा पुत्र जानोजी मारला गेला.
अशाप्रकारे पुण्यावर छत्रपती शाहु महाराज यानी खंडेराव दाभाडे व सुलतानजी निंबाळकर मार्फत ताबा मिळवला.
ण】अशाप्रकारे छत्रपती शाहु महाराज यानी आपल्या सरदारामार्फत मोगलचा दक्षिण सुभेदार हुसेन अली याची कोंडी केली आणी खानदेश,पुणे,गुजराथ,हैद्राबाद व कर्नाटक हे मोइलप्रांत आपल्या ताब्यात घेतले.या कोंडीमुळेच हा हुसेन अली शाहु महाराजांशी करार करण्यास तयार झाला.हा करार शाहु महाराजानी दक्षिणेतच करवुन घेतला व त्यावर बादशहाचे फर्मानासाठी दिल्लीत पाठवले.......परंतु छत्रपती शाहु महाराज यानी बादशहाच्या फर्मानाची देखिल वाट न पाहता आपल्या सरदाराना करार अमंलबजावणीचे आदेश दिले...
यावरुन छत्रपती शाहु महाराज यांची धाडसी व्रुत्ती व मुत्सद्देगिरीपणा दिसुन येतो.....तिकडे मातुश्री कैदेत आसताना देखिल शाहु महाराज बादशहाच्या फर्मानाची वाट न पाहता कराराची अमंलबजावणी करताना दिसतात........म्हणजे ते बादशहासास काय व किती किंमत देत होते हेच सिद्ध होते.......
त】
तसेच मराठा स्वराज्याचा विस्तार देखिल मोगल प्रांतातच करुन घेऊन मोगलासोबत करार करुनही मोगलासच शह देऊनच मराठा स्वराज्याचा विस्तार मराठा सरदारामार्फत करवुन घेत होते.म्हणजे बघा ज्याच्याशी करार करायचा त्याच्याच विरोधात जाऊन त्याच्याच प्रांतात मराठा स्वराज्याचा विस्तार करणे,म्हणजै शाहु महाराज यानी या कराराचा गनिमीकावा करुन राजकारणच केले.....यावरुन त्यांची राजकारणी व धुर्तपणा दिसुन येतो........वरती मोगलांच्या प्रांतात चौथ व सरदेशमुखी वसुली कुलबाबे (वंशपरंपरागत अधिकार) अशीच करत.......
Rajenaresh Jadhavrao
No comments:
Post a Comment