बहमनी साम्राज्याची स्थापना –
महमंद-बिन-
- तुघलकच्या संशयी स्वभावामुळे त्याच्या बर्यास सुभेदारांनी त्याच्या विरूद्ध बंड केले. त्यापैकी हसन गंगू बहमनशाह एक होता. त्याचे सन 1347 मध्ये स्वत:ला दौलताबाद येथे स्वत:चा राज्याभिषेक करून राजा म्हणून घोषित केले बहमनी वंशाची स्थापना केली.
- हसन गंगूने सत्ता स्थापित केल्याबरोबर दौलताबादची राजधानी गुलबर्गा येथे नेली.
- बहमनी वंशात खालील राजे होवून गेले.
हसन गंगू (1347 ते 1358) –
- गंगू हसन या राजाने बहमनी वंशाची स्थापना केली.
मुहंमदशहा पहिला (1358 ते 1373) –
- हा राजा कलेचा चाहता होता. गुलबर्गामधील शाही मशीद, व उस्मानाबादमधील शमशूद्दिनची कबर बांधली व प्रशासकीय सुधारणा केल्या.
- या राजाला इजिप्तच्या खलिफाने दक्षिण भारताचा सुलतान अशी मान्यता दिली होती.
मुहंमदशहा दूसरा (1377 ते 1997) –
- सन 1377 मध्ये महंमदशाह दूसरा सत्ताधीश झाला.
- त्याला दक्षिणेचा ऑरिस्टॉटल असे म्हणतात आणि प्रसिद्ध इराणचा कवी हाफिज त्याच्या दरबारात होता.
फिरोजशहा (सन 1397 ते 1422) –
- या काळात विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये सतत लढाया होत असे.
- यानंतरच्या काळात बहमनी वंशामध्ये अहमदशहा (1422 ते 1435), अल्लाउद्दीन दुसरा (1435 ते 57) इत्यादि सुलतान होवून गेले.
- याचा कार्यकाल विजयनगर साम्राज्याचा संघर्षात गेला.
हुमायू (1457 ते 1461) –
- सन 1457 मध्ये महमुद गवान नावाचा वजीर बहमनी वंशामध्ये आला. त्यास हुमायूने आपला वजीर म्हणून नेमले. यानंतरच्या काळात सन 1481 पर्यंत बहमनी वंशाची राज्यकारभाराची सूत्रे महंमद गवानच्या हातात होती.
- बहमनी राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रामध्ये विजापूर(आदिलशाही), अहमदनगरची (निझामशाही), गोवळकोडयांची (कुतुबशाही), बिदरची (बिदरशाही) आणि वर्हाडची (इमानशाही) ही पाच स्वतंत्र राज्ये उदयास आली.
No comments:
Post a Comment