विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 10 March 2021

विजयनगरचे साम्राज्य

 विजयनगरचे साम्राज्य :-

  • दिल्लीच्या सुलतान महंमद तुघलकच्या संशयित स्वभावामुळे प्रांताधिकारी नाराज झाले. या घटनेमुळे तुघलक साम्राज्याचा विघटनास सुरवात झाली.
  • या विघटनामधूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली.
  • सन 1336 मध्ये हरीहर आणि बुक्का या दोन भावांनी दक्षिणेत विजयनगरचे साम्राज्य स्थापित केले. हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.

विजयनगर साम्राज्याचे राजे :-

  • विजयनगर साम्राज्यात खालील पराक्रमी राजे होवून गेले.

हरीहर व बुक्का :-

  • हे दोन्ही बंधु पराक्रमी होते. त्यांनी दक्षिणेत तुंगभद्रा नदीपासून तेकेरळपर्यंतचा भाग आपल्या अधिकाराखाली आणला.
  • त्यानंतर आलेल्या बुक्काने रामेश्वरपर्यंत विजयनगर साम्राज्याचा विस्तार केला.
  • त्यानंतरच्या काळात त्यांना बरीचशी वर्षे बहमनी साम्राज्यासोबत संघर्ष कारअवी लागली.

कृष्णदेवराय :-

  • कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा सर्वात पराक्रमी राजा होवून गेला.
  • त्याने ओडिशाच्या राजाचा पराभव करून विजयवाडा आणि राजमेहंद्रीचा प्रदेश आपल्या राज्यात सामील केला.
  • या राज्याच्या काळात विजयनगरचे साम्राज्य दक्षिणेस हिंद महासागरापर्यंत आणि उत्तरेस रायचूर पर्यंत पसरले होते.

विजयनगर साम्राज्याच्या सांस्कृतिक विकास :-

  • विजयनगरचे राजे कला व साहित्याचे भोक्ते होते. तेलंगू भाषेतील साहित्याचा विकास यांच्याच काळात झाला.
  • आमुक्तमाल्यदा हा तेलंगू ग्रथ यांच्याच काळात निर्माण झाला.
  • विजयनगरमधील हजार राम मंदिर आणि पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर याच काळात बांधल्या गेले.

तालिकोटची लढाई (सन 1565) :-

  • कृष्णदेवरायनंतर विजयनगरच्या साम्राज्याला उतरली कळा लागली. सन 1565 मध्ये कर्नाटकच्या तालीकोट येथे विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निझामशाही, गोवळकोंड्यांची कुतूबशाही आणि बिरुदची बिरुदशाही या चारही सत्तेने एकत्र येवून विजयनगरच्या राजा रामरामराचा पराभव केला आणि हंपी शहराचा विध्वंस केला.
  • आजही हंपी येथे असलेले उध्वस्त अवशेष विजयनगरच्या प्राचीन वैभवाची साक्ष देते.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...